Link copied!
Sign in / Sign up
19
Shares

बाळाच्या गर्भाशयातील हालचालींबद्दल काही प्रश्न आणि उत्तरे

गरोदरपणाचे दुसरे त्रैमासिक म्हणजे होणाऱ्या आईसाठी थोडासा मजेचा काळ असतो. याच काळात तुम्ही गर्भातल्या बाळाशी अप्रत्यक्षपणे बोलू शकता, त्याच्याशी संवाद साधू शकता. अनेक स्त्रिया या काळात गर्भात बाळाच्या लाथा आणि त्याचे गर्भातच फिरणे अनुभवू लागतात. जेंव्हा तुम्ही तुमच्या पोटाला स्पर्श करता तेंव्हा बाळसुद्धा तुमच्याशी बोलण्याच्या मूड मध्ये असेल तर याचे उत्तर देण्यासाठी गर्भात हालचाल करते, आहे की नाही मजेशीर गोष्ट ?

सगळ्याच मातांना गर्भात बाळाची हालचाल जाणवते असे नाही. अनेक मातांना उशिरा जाणवते. साहजिकच प्रत्येक आईला आपल्या बाळाच्या सुरक्षिततेची काळजी असणारच. त्यामुळे तुमच्या मनात बाळाच्या हालचालींविषयी अनेक प्रश्न देखील येत असणार. आम्ही इथे यासंबंधी सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी दिली आहेत.

१) माझे बाळ अपेक्षेपेक्षा कमी हालचाल का करत आहे?

अजिबात काळजी करू नका, आधी शांत व्हा! कदाचित तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचाली अजून जाणवल्या नसतील, पण बाळ आतमध्ये हालचाल करत असते. बाळाचे लक्ष वेधण्यासाठी थोडे गार किंवा काहीतरी गरम पेय घ्या आणि एखाद्या नरम अंथरुणावर पडा.

तुम्हाला बाळाची हालचाल जाणवली तर ती त्याच्या लाथांच्या स्वरुपात किंवा त्याने गर्भात आपली स्थिती बदलल्यास त्या स्वरुपात जाणवेल. असे असले तरी, जर तुम्हाला अगदीच काहीच हालचाल जाणवत नसेल तर तुमच्या डॉक्टरांना दाखवा.

२)  बाळाची हालचाल किती वेळा जाणवते?

बाळाच्या हालचालींची अशी एक संख्या किंवा वेळ नसते. हे सर्व तुमची प्रसूतीची तारीख कधी आहे आणि बाळ आतमध्ये किती वेळ झोपले आहे यावर अवलंबून आहे. बाळ झोपेतून जागे झाले कि लाथा मारते किंवा हालचाल करते. तुम्हाला ही हालचाल काही वेळात जाणवेल. जर तुम्हाला खूप वेळासाठी हालचाल जाणवली नाहीच तर लगेच डॉक्टरांना कळवा.

३) बाळ गर्भात दिवसभर काय करते?

जर तुम्हाला बाळाला पाहण्याची इच्छा झालीच आहे तर तुमची तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन अल्ट्रासाऊंडद्वारे बाळाच्या गर्भातील हालचाली सहज पाहू शकता. जर बाळ झोपले असेल तरीही त्याच्या बारीक बारीक हालचाली सुरु असतात. बाळ अनेकदा हळूहळू पोटात गोलगोल फिरते, चेहर्‍याला हात लावते, त्याचे हातपाय फिरवते, तोंड उघडते अशा अनेक गोष्टी ते तुमच्या पोटात रोज करत असते. हे सर्व तुम्ही अल्ट्रासाऊंड मध्ये पाहू शकता.

तुम्हाला जर बाळाचे अजून लक्ष वेधून घ्यायचे असेल तर तुमच्या पोटावर एक फ्लॅश लाईट धरा. तुमच्या गर्भात अंधार असल्यामुळे बाळ जरी लाईट व्यवस्थित पाहू शकले नाही तरीही किंचित उजेड त्याला आतमध्ये जाणवेल आणि त्याला ते प्रतिसाद देईल. सगळे करूनही जर तुम्हाला बाळाची हालचाल जाणवत नसेल तर तुम्ही दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दाखवलेलेच बरे.

तुमच्या गरोदरपणात काही वेगळी स्थिती उद्भवली असेल आणि त्यामुळे बाळ हालचाल करत नसेल तर त्याचे निदान डॉक्टर करतील.

सामान्यतः जर बाळाची हालचाल जाणवत नसेल, तर बाळाच्या हृदयाचे ठोके, गर्भातील पाण्याची पटली, बाळाची वाढ, लठ्ठपणा, या सर्वांची चाचणी केली जाते. बाळाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवा. तुम्हाला जाणवणाऱ्या या हालचाली जर कमी झाल्या असतील तर तुमचे बाळ गाढ झोपणारे असू शकते. अजिबात काळजी करू नका.!   

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon