Link copied!
Sign in / Sign up
60
Shares

बाळाच्या पोटात लाथ मारण्याबाबत काही आश्चर्यकारक गोष्टी

मुल होणे ही आपल्या आयुष्यतील खूप आनंदाची गोष्ट असते आणि गरोदरपण हे खूप सुंदर अशी प्रक्रिया असते. गरोदरपणात स्त्रियांच्या आत वेगवेगळे गोष्टी घडत असतात. या मधील काही त्रासदायक असतात तर काही आनंदायक असतात. यापैकी एक त्रासदायक नाही तर अदभूत आणि आनंदायक गोष्ट म्हणजे बाळाचं पोटात असताना लाथ मारणं. बाळाच्या अस्तित्वाची जाणीव यामुळे सतत होत असते. या बाळाच्या पोटात लाथ मारण्याबाबत काही आश्चर्यकारक गोष्टी आहेत. ज्या आम्ही सांगणार आहोत.

१.बाळाची लाथ म्हणजे वातावरणाला दिलेला प्रतिसाद

ज्यावेळी तुम्ही हालचाली करता. तसेच तुमच्या आसपास असणारं वातावरण, आवाज, संगीत , तुम्ही खाल्लेले पदार्थ याला बाळ प्रतिसाद देत असतं. आणि प्रतिसाद म्हणून लाथ मारणे म्हणजे पाय हलवणे हातची हालचाल करणे किंवा इतर हालचाली करणे अश्या प्रकारे ते प्रतिसाद देत असतं.

२ . डाव्या अंगावर झोपल्यावर बाळाची हालचाल(लाथ मारणे) वाढते.

हे वैद्यकीयदृष्ट्ट्या आढळले आहे की जेव्हा आई तिच्या डाव्या बाजूवर झोपते त्यावेळी तिला बाळाच्या हालचालींचा आणि लाथ मारण्याचा अनुभव जास्त वेळा येतो. कारण जेव्हा आई डाव्या अंगावर झोपते त्यावेळी त्या बाजूवर जास्त दाब टाकला जातो आणि गर्भाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढतो. .त्यामुळे डाव्या अंगावर झोपल्यावर बाळाच्या जास्त हालचाली जाणवायला लागल्या तर त्यात घाबरण्यासारखे काही नाही.

३. बाळाच्या लाथा आणि बाळाची वागणूक

संशोधनातून असे आढळून आले आहे की बाळाच्य लाथ मारण्याच्या वारंवारतेचा थेट मुलाच्या मेंदूच्या विकासाशी संबंधित आहे. तसेच, गर्भधारणेदरम्यान अत्यंत सक्रिय असलेले बाळ असे दर्शवतात की आपल्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये ते तुम्हांला चांगलेच पळवणार आहे. अशी बाळं अत्यंत क्रियाशील असतात.

४. ९ व्या आठवड्यानंतर या लाथा आणि हालचाली जाणवतात. 

गरोदर असताना तुम्ही १६ ते २५ आठवड्याच्या दरम्यान तुम्हांला बाळाच्या लाथांचा अनुभव येतो. परंतु हा अनुभव तुम्हाला ९ व्या आठवड्या नंतर देखील येऊ शकतो. त्यामुळे तुम्हांला गर्भारपणाच्या १६व्या आठवड्यापूर्वी आणि ९ व्या आठवड्यानंतर बाळाच्या काही हालचाली जाणवल्या तर काळजी करू नका.तसेच या हालचाली जसा जसे आठवडे पुढे जातील तसं तसे जास्त प्रमाणात जाणवतील.

५. ३६ व्या आठवड्यनंतर या लाथा कमी होऊ शकतात.

जसं -जसं प्रसूतीचा काळ जवळ यायला लागतो आणि बाळाची वाढ पूर्ण होते तसं-तसं बाळाच्या या हालचाली कमी होण्याची शक्यता असते. परंतु या काळात जर तुम्हांला अनेक तास बाळाची हालचाल जाणवलीच नाहीतर ही गोष्ट डॉक्टरांना सांगणे आवश्यक असते

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon