Link copied!
Sign in / Sign up
113
Shares

तुमचे बाळ ह्याप्रमाणे वाढत आहे ना ? तपासून घ्या !

 


बाळाच्या जन्मापासून ते त्याच्या चालण्या –बोलण्या पर्यंतच्या प्रवासात आपण त्याच्या सोबतच असतो. आत्ता बाळ तुमच्या कुशीत झोपलेले असते आणि दुसऱ्या क्षणी त्याला रांगता येऊ लागलेले असते. बाळाच्या पहिल्या वर्षात अनेक महत्वाचे टप्पे येतात, जेंव्हा बाळ पालथे पडते, बसायला लागते, रांगू लागते, बडबड करायला लागते, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चालू लागते. या सगळ्या त्याच्या झपाट्याने वाढण्याच्या प्रवासाला टिपून ठेवण्यासाठी एक छानसे फोटो जर्नल बनवण्याची कल्पना उत्तम असू शकते, नाहीका?

१ ते ३ महिनेतुम्हाला वाटत असेल की २-३ महिन्यांचे बाळ झोपणे आणि धुध पिणे याशिवाय अजून दुसरे काय करणार..पण जरा निट निरीक्षण करा. बाळ नुसतेच झोपते आणि दुध पिते असे नाही. बाळ सोबतच अशा अनेक गोष्टी करते ज्या तुम्हाला गोंडस वाटतीलच पण सोबत अचंबित सुद्धा करतील. या फोटोतल्या बाळाला आंघोळीचे पाणी उडवायला आवडते आणि सोबतच सगळ्यांच्या नजरेला नजर मिळवत हे आजूबाजूला काय चालले आहे याचे निरीक्षण करत बसते.

४ ते ६ महिने

तुमचे बाळ आता मोठे आणि सशक्त झालेले असते. काही माता ६ महिन्यानंतर बाळाला दुधाशिवाय दुसरे अन्न द्यायला सुरवात करतात. यामध्ये कधी गाजराचा रस, कधी कुस्करलेले केळे (मुलांना केळे खूप आवडते) असे पदार्थ दिले जातात. बाळ आता त्याच्या आई ला चांगलेच ओळखायला लागते आणि शक्ती आल्यामुळे आजूबाजूला पसरणे, लाथा मारणे, पालथे पडणे अशा त्याच्या क्रीडा सुरु होतात.

७ ते ९ महिने

आता बाळ स्वतः हून एका जागेवर उठून बसू लागते. त्याला बसण्यासाठी आधाराची गरज लागत नाही. ही त्याच्या वाढीची खरच खूप मोठी पायरी आहे. बाळ रडते, हसते आणि त्याला वेगवेगळ्या रंगान्माध्ला फरक देखील कळायला लागतो. ९ व्या महिन्याच्या शेवटी बाळ रांगू लागते. त्याचे इवलूसे पाय घरात इकडे तिकडे सगळ्या वस्तूंचा शोध घेऊ लागतात. बाळाला आजूबाजूच्या गोष्टींबद्दल अतिशय उत्सुकता असते.

१० ते १२ महिनेबाळाचे दुधाचे दात आता दिसायला लागतात. दातासोबत नवीन शब्द देखील बाळ शिकते. तुम्ही रोज जे शब्द त्याच्यासमोर बोलता किंवा जास्त वापरात येणारे शब्द बाळ ऐकून ऐकून शिकते. (याचमुळे बाळासमोर वाईट शब्द किंवा शिवी उच्चारणे टाळा). बाळ आता त्याच्या आई बाबांना गर्दीतही ओळखू शकते. त्याला नावे नावे खेळणे आवडतात. आजूबाजूच्या वातावरणात मिसळून आणि तुमच्या हावभावावरून ते शिकते.

तुमचे बाळ आता १ वर्षाचे झाले आहे. थोड्याच दिवसात बाळ शाळेत जाऊ लागेल. त्याहे छोटेसे दप्तर आणि पाण्याची बाटली घेऊन त्याचा प्रवास परत सुरु होईल. त्याच्या या खास पहिल्या वर्षाला टिपून ठेवा कारण हा काळ कसा सर्रकन निघून जाईल तुम्हालादेखील कळणार नाही. यासाठी उत्तम फोटो जर्नल तयार करता येईल. तुम्ही तुमच्या कल्पना वापरू शकता. बाळ मोठे होऊन त्याचा हा प्रवास बघेल तेंव्हा त्यालाही  आनंदच होईल !Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon