Link copied!
Sign in / Sign up
38
Shares

तान्ह्या बाळाच्या नाभीची, कानाची, नाकाची, जिभेची आणि नखांची स्वच्छता अशीच करायची ?


नव्याने पालक झालेल्या सर्वच जोडप्यांना आजूबाजूचे लोकं अनेक सल्ले देत असतात. लहान बाळांची काळजी कशी घ्यावी, त्यांना जेवू कसे घालावे, त्यांना झोपवावे कसे, आजारपणात त्यांची काळजी कशी घ्यावी इथपासूनचे सगळे सल्ले तुम्हाला मिळत असतात. पण हे सल्ले खरच योग्य असतात का ? 

बाळांना स्वच्छ ठेवणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचे आहे. त्यांचा आजारापासून बचाव करण्यासाठी त्यांच्या स्वच्छतेची काळजी आपल्याला व्यवस्थितपणे आणि जरासेही दुर्लक्ष न करता घ्यावी लागते. बाजारात बाळांसाठी नानाप्रकारचे अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. यातील योग्य उत्पादने निवडून आपल्या बाळासाठी उत्तम तेच निवडणे गरजेचे ठरते.

डायपर असे बदलायचे

बाळाचे डायपर किंवा नॅपी बदलणे सुरवातीला अवघड वाटू शकते पण जर एकदा तुम्हाला हे काम जम्लास मग नंतर ते सोप्पे वाटायला लागते. पालकांनी बाळाचे डायपर बदलण्याची गरज आहे की नाही हे दर ४५ ते ६० मिनिटांनी तपासून पाहावे. जर बदलण्याची गरज असेल तर, आधी डायपर काढा आणि बाळाच्या पार्श्वभागाची कोमट पाण्याने कापूस घेऊन स्वच्छता करा. बाळाचे पाय व सर्व त्वचा पूर्णपणे कोरडी होईल व ओलावा राहणारनाही अशाप्रकारे नीट पुसा. यानंतरच नवीन स्वच्छ डायपर घाला.

नाकाची स्वच्छता कशी करायची

तुम्ही नाकाच्या स्वच्छतेसाठी नसल सक्शन पंप वापरू शकता. या पंपाला दाबून यातील हवा बाहेर काढून टाका, बाळाच्या नाकपुडीजवळ पंप ठेवून हाताचा दाब सोडा. काळजी घ्या की तुम्ही हा पंप नाकात घालणार नाही. नाकात आत गेल्यास आतील नाजूक अवयवांना इजा होऊ शकते. यात आलेली नाकातील घाण टीश्यु पेपरवर काढून घेऊन या पंपाला स्वच्छ धुवा. प्रत्येक वापरानंतर यास घुणे गरजेचे आहे.

कानाची स्वछता कशी करायची

लहान बाळाला अंघोळ घालणे हे एक अतिशय नाजूक काम असते. कधी कधी अंघोळ घालतांना बाळाच्या कानात पाणी जाऊ शकते. बाळाच्या कानात पाणी गेल्यास घाबरून जाऊ नका. हे पाणी बाहेर काढण्यासाठी बाळाच्या कानात क्यू-टिप्स घालू नका. त्याने त्यांच्या एयरड्रम्सला इजा होऊ शकते. फुंकर घालून पाणी वाळवण्याचा प्रयत्न देखील करू नका . केवळ बाळाला ज्या कानात पाणी गेले आहे त्या कानावर झोपवा, जेणेकरून पाणी आपोआप बाहेर येईल. यानंतर हळुवारपणे कानाच्या बाहेरील बाजू कोरडी करून घ्या.

जिभेची स्वछता कशी करायची

सर्वात आधी बाळाच्या जिभेच्या स्वच्छतेसाठी कोणतेही टंग क्लीनर किंवा ब्रश वापरणे टाळा. बाळाची जीभ अतिशय नाजूक असते तुमच्या प्रयत्नांनी त्यास इजा पोहोचणार नाही याची दक्षता घ्या. थोडेसे खडबडीत असणारे कॉटनचे कापड वापरल्यास फायदा होईल. तुमचे हात स्वच्छ धुवा, बोटाला हे कापड गुंडाळून त्यास कोमट पिण्याच्या पाण्यात बुडवा आणि हळुवार पणे बाळाच्या जिभेवरून फिरवून जीभ स्वच्छ करा. सोबतच वरच्या आणि खालच्या दातांच्या हिरड्या देखील स्वच्छ करा.

नखांची स्वछता कशी करायची

बाळाच्या हाताच्या बोटांची नखे दर ५ ते ६ दिवसांनी कापणे आवश्यक आहे. स्वतःच्या नखांनी बाळाने स्वतःलाच इजा करून घेऊ नये म्हणून नखे कापणे गरजेचे आहे. लहान बाळांसाठी मिळणारे खास नेलकटर किंवा कात्री बाजारात मिळते. याने हळुवार नखे कप. झोपलेले बाळ तुम्हाला हे काम शांतपणे करू देईल. नखे कापून झाल्यावर नखांच्या कोनात जर थोडा धारदारपणा असेल तर त्यास मऊ करून टाका. छोटासा ब्रश घेऊन त्याला कोमट पाण्यात बुडवा आणि त्याने बाळाच्या हाताच्या बोटांच्या नखातील असलेली घाण तुम्ही स्वच्छ करू शकता.

नाभीची स्वच्छता कशी करायची

एक स्वच्छ कॉटनचे कापड थोड्याश्या गरम पाण्यात बुडवून पक्क पिळून घ्या. या कापडाने बाळाच्या नाभीच्या आसपास असलेल्या त्वचेस स्वच्छ करून घ्या. गर्भनाळ वर धरून खालील पोटाचा भाग देखील स्वच्छ करा. गर्भनाळ नैसर्गिकपणे तुटून पडेपर्यंत तिला स्वच्छ आणि कोरडी ठेवणे योग्य आहे. हा भाग नंतर कोरड्या कापडाने पुसून घ्या. स्वच्छ झालेली बेबी खूप छान आणि सुंदर दिसते ना. मग तुमचेही बाळ स्वच्छ आणि सुंदर ठेवा. तुमच्या बाळाच्या निरोगी आरोग्याची  tinystep मराठीची जबाबदारी आहे. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon