Link copied!
Sign in / Sign up
65
Shares

बाळाची अंगठा चोखण्याची सवय आणि त्यावर काय करता येईल ?

             काही तान्हा बाळांना अंगठा चोखण्याची सवय असते. आणि त्यांची ही सवय लवकरसुद्धा जात नाही. त्यासाठी आईवडिलांना खूप प्रयत्न करावे लागतात. आणि ती सवय बाळांना नैसर्गिकपणे लागत असल्याने त्यात खूप काही चिंता करण्याची गरज नसते नाहीतर काही पालकांना हाच प्रश्न पडतो की, माझ्याच बाळाला कशी ही सवय आहे. सहा महिन्यानंतर बाळांना ह्याची सवय लागायला लागते, त्याचे अंगठा चोखणे हे काही कारण नसताना असते किंवा त्याला काही सांगायचे आहे. असेही असू शकते की, त्यांना भूक लागली असेल आणि त्यांना बोलता येत नसल्याने ते अंगठा चोखत असतील. ही अंगठा चोखण्यामुळे बाळावर काय परिणाम होत असतात त्याविषयी.

१) ह्या सवयीमुळे बोलण्याच्या उच्चारात फरक पडतो कारण त्यांचे शब्द हे व्यवस्थित येत नाहीत. आणि ही सवय जर अगदी लहानपणापासून असेल, तर त्यामुळे बाळाचे दात पुढे येतात. जर ही सवय राहिली, तर कायमस्वरूपी दात पुढे राहू शकतात. दुधाचे दात पडल्यावर पक्के दात येताना या सवयीमुळे त्याच्या दाताचे आणि हनुवटीचे आकारात बदल होऊ शकतो.

२) बाळ जसे मोठे होत जाते तसे त्याच्या हाताचा आणि पर्यायाने अंगठ्याचा, जमिनीशी, मातीशी, धुळीशी आणि घरातल्या अनेक गोष्टींशी संपर्क येऊ लागतो. अशा वेळेस त्याच्या हाताचा अनेक प्रकारच्या जीवाणूंशी, विषाणूंशी संपर्क येतो. ह्या बोटातील कणांमुळे बाळाला पोटदुखी किंवा इतर समस्या येऊ शकतात.

३) खूप बाळांमध्ये ही सवय जेव्हा ३ वर्षांपर्यंत सुटत नाही, तेव्हा त्यावर उपचार करावे लागतात. मात्र, मुलांचे दात पुढे दिसू लागले, त्यांच्या बोलण्यात दोष निर्माण झाले तर मात्र इतर गोष्टी नसल्या, तरी पालकांनी पुढाकार घेऊन त्याचे उपचार करावेत.

४) लहानपणातच जेव्हा बाळ अंगठा चोखत असेल, तर बाळाच्या चित्तवृत्ती जाणून घेऊन, त्याला अन्य मार्गाने शांत करण्याची आवश्यकता असते. पालक जर त्याला रागावले, अंगठा चोखण्यापासून त्याला बळजबरीने थांबवले, तर त्याची उत्सुकता आणखीनच वाढून, ते अजून जास्त प्रमाणात अंगठा चोखू लागते. लहानग्यांना अशा सवयींपासून परावृत्त करत राहिल्यास त्यांच्यात बंडपणाची वृत्ती वाढते.

५) तुमचा तान्हा कुठल्यावेळेस अंगठा चोखते याकडे लक्ष दयावे. एकदा त्याची सवय आणि कारण बाळाच्या आई-वडिलांना माहीत झाल्यावर त्या सवयीला सोडविता येते. त्याने तोंडात अंगठा घातला की त्याचे लक्ष विचलित करावे. बाळ टीव्हीसमोर बसून अंगठा चोखत असेल, तर त्याला हातात एखादे खेळणे किंवा बाहुली, चेंडू अशा गोष्टी द्याव्यात. जेणे करून त्याचे हात व्यग्र राहतील आणि तो तोंडात बोट घालणार नाही. झोप आल्यामुळे तो असे करत असेल तर त्याला अंगाई गाऊन, कधी एखादी गोष्ट सांगून शांतपणे निजवावे.

६) समज आलेल्या तीन वर्षे वयाच्या मुलांना हातात ग्लोव्हज् घालणे, त्यांच्या अंगठ्यावर चिकटपट्टी लावणे अशा गोष्टी करून पाहाव्यात. एखादे कॅलेंडर घेऊन त्याने अंगठा न चोखलेल्या दिवसांवर वर्तुळ करावे. ते त्याच्या समोरच लावावे. म्हणजे त्याला आपली सवय दूर करण्याबाबत अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळते. अगदी लहान मुलांच्या अंगठा चोखण्याबद्दल जास्त चिंता करू नका, ही सामान्य बाब आहे; परंतु त्याच्या चोखण्याच्या जोरावर लक्ष द्या. सुरुवातीला सगळीच मुले हळूहळू अंगठा चोखतात; परंतु नंतर त्यांची जिभेची आणि दातांची हालचाल जोर धरते. या हालचालींकडे लक्ष राहू द्या आणि शक्यतो बाळ ३ वर्षांचे होईपर्यंत त्याची ही सवय मोडली जाईल त्यासाठी प्रयत्न करावा. 

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon