Link copied!
Sign in / Sign up
6007
Shares

बाळाचे वजन वाढवण्यासाठी पौष्टिक आहार

काही बाळांचे वजन त्यांचा वाढत्या वयानुसार वाढत नाही. काही पोषक द्रव्ये आणि जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे असे होऊ शकते. तर काही नवजात बालकांची भूक जन्मापासूनच काहीशी मंदावलेल्या अवस्थेत असते. ही पालकांची जबाबदारी असते की बाळाला आवश्यक ती पोषकद्रव्ये आहाराद्वारे योग्य प्रमाणात मिळाली पाहिजेत. हे सर्व त्याच्या त्या पोषकद्रव्य युक्त  पदार्थ किंवा धान्याचं स्वरूपामुळे अन्नाद्वारे बाळाला देणे नेहमी शक्य होईलच असे नाही, त्यासाठी त्याचे पीठ करून बाळाला दिले तर ते त्याला खाऊ घालणे सोप्पे होते. अशाप्रकारे बाळाच्या आहारावर तुम्ही लक्षही ठेवू शकता. बाजारात याच प्रकारचे तयार मिश्रण मिळतात पण त्यांच्यातून मिळणाऱ्या पोषणबाबत आपण खात्री देऊ शकत नाही .हे मिश्रण तयार करताना आपल्या बाळाला ह्यातील कोणते घटक चालतात , त्याला कशाची एलर्जी तर नाही ना याची खात्री करून घ्यावी.  
येथे दिलं आहे बनवायला सोप्पं आणि पौष्टिक असं पिठाच मिश्रण जे तुमच्या बाळाला वजन वाढवण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत करेल.

साहित्य पदार्थ:
१. बदाम (१०० ग्राम)
२. काजू  (१०० ग्राम)
३. अक्रोड  (१०० ग्राम)
४. पिस्ता (१०० ग्राम)
५. वेलची (१०)
६. उडीद डाळ (२०० ग्राम)   
७. मुग डाल (१५० ग्राम)
८. ओट्स (१५० ग्राम)
९. गव्हाचे सत्व (१५० ग्राम)  
१०. तीळ (१५० ग्राम)
११. नाचणीचे पीठ (५०० ग्राम)
१२. सोयाबीनचे पीठ (२०० ग्राम)

कृती:

उडीद डाळ, मुगाची डाळ, गव्हाचे सत्व आणि ओट्स वेगवेगळे करून कढईत छान भाजणीचा वास लागेपर्यंत भाजून घ्या. सगळा सुकामेवा भुरकट रंग येण्यासाठी एकत्र भाजा. भाजून झाल्यावर हे सर्व थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. प्रत्येक घटक हा कमीत कमी ३-४ मिनिटे भाजला गेला पाहिजे.

ह्यातील मुग डाळ, उडीद डाळ, गव्हाचे सत्व, ओट्स, तीळ, नाचणी, आणि सोयाबीन मिक्सर मधून काढून घ्या. ह्यांची बारीक पूड होईल असे बघा. ह्या सर्वांचे पीठ एकजीव करा. कमीत कमी ५-६ मिनिटे मिक्सर मधून फिरवा म्हणजे पीठ बारीक होईल. जर पीठ मऊ नसेल तर गरजेएवढे बारीक करा.

हे मिश्रण रेफ्रिजरेटर मध्ये ठेवा. काही काळानंतर येणारा खवट वास टाळण्यासाठी फ्रीज मधेच राहू दया.
हे पीठ थोडे गरम दुध आणि साखर एकत्र करून दिल्यास त्याची चव छान लागते आणि वासही छान येतो. यात वापरलेल्या घटकांमुळे बाळाला हे खायला देखील आवडेल.

बाळाच्या आरोग्याची तुम्हाला असलेली काळजी या  आहाराने नक्कीच दूर होईल. रोज हे पीठ योग्य त्या प्रमाणात तेवढे बाळाला खाऊ घाला. पौष्टिक आहाराने त्याच्या वजनात सकारात्मक वाढ दिसेल.


         

Click here for the best in baby advice
What do you think?
53%
Wow!
43%
Like
2%
Not bad
2%
What?
scroll up icon