Link copied!
Sign in / Sign up
42
Shares

तिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली

तुमचा विश्वास बसणार नाही  पण खरंच जसं हिंदी सिनेमात दाखवतात हि केरळ मधील कोट्टायम इथे घडलेली गोष्ट घडलेली गोष्ट आहे. आपल्या बाळाचं रडणं हे आईला कोमातून देखील बाहेर घेऊन आलं. बेटीना हीचा कोट्टायम मध्ये जानेवारी मध्ये अपघात झाला आणि  या अपघातात ती कोमामध्ये गेली. पण जेव्हा तिचा अपघात झाला त्यावेळी ती ३ महिन्यांची गरोदर होती.. आणि तिचे बाळ या अपघातातून वाचले होते. अपघातानंतर काही दिवस बेटीनाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. थोडे दिवसाने तिची प्रकृती किंचित सुधारली आणि तिला व्हेंटिलेटर वरून अतिदक्षता विभागात हलवण्यात आले.

साधारणतः गरोदर असताना जी औषधे देऊ नये अशी औषधे तीला देण्यात येत होती ज्यामुळे तिचा नैसर्गिकरित्या गर्भपात होण्याची शक्यता होती. पण तरीही बाळाच्या वाढीमध्ये काही अढथळा येत नसल्याचे दिसल्यावर डॉक्टरांनी दोघांना वाचवण्याचा प्रयन्त सुरवात केली बाळाच्या वाढीला समस्या निर्माण करणारी औषधे  करण्यात आली. तिला द्रवपदार्थ देण्यास सुरवात केली आणि जून १४ ला म्हणजेच अपघातानंतर ६ महिन्याने बाळ ३७ आठवड्याचे झाल्यावर सिझेरियन पद्धतीने तिची प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर ज्यावेळी बाळ पहिल्यांदा रडले त्यावेळी बेटीना ने आपल्या पापण्या हलवल्या आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू यायला लागले आणि नंतर तिने बाळाला  घेण्यासाठी हात पुढे केले आणि तीला बाळ जवळ देण्यात आले. जसे हिंदी सिनेमात आईला बाळाचा स्पर्श झाल्यावर किंवा मुल समोर दिसल्यावर आई बरी होते तसेच अगदी फिल्मी वाटवे असे काहीसे घडले. बाळाच्या जन्मानंतर त्याचे रडू ऐकल्यावर ऐकलं कोमातून बाहेर आली.. आणि १० दिवसानंतर आई आणि बाळाला घरी सोडण्यात आले. घरी सोडल्यानंतर बेटीनाला काही व्हिटामिन आणि फिझिओथेरेपी असे उपचार चालू आहेत.

 Dr. Vivek and gynecologist Reji'

या सहा महिन्यात बेटिनावर  उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले कि आम्हांला  आईचा जीव वाचवायचा असेल तर गर्भपात करावा लागेल असे वाटत होत आणि =अनेक जाणकारांनी देखील सांगितले होते पण बाळाची वाढ बघता आम्ही बाळ आणि आई दोघांना वाचवण्याचं प्रयन्त केला आणि आम्ही बाळाला वाचवले आणि पर्यायाने बाळमुळे त्याची आई बरी झाली

Images and information Credits: Manorama Online

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon