Link copied!
Sign in / Sign up
51
Shares

तान्ह्या बाळांचे मलावरोध कसे दूर करता येईलतान्ह्या बाळांमध्ये काहीवेळा मलावरोधाची समस्या आढळून येते. तुमच्याही बाळाला ह्याचा त्रास होत असेल. तर ह्या लेखात बाळांमध्ये बद्धकोष्ठतेची कारणे सांगितली आहेत. आणि त्यावर कोणता उपाय करता येईल. त्याविषयी सांगितले आहे.

१) अगोदर आपण बाळांना बद्धकोष्ठतेचा त्रास का होतो ते आपण समजून घेऊ

हा त्रास नेहमी होत नसतो. स्तनपानावर अवलंबून असणाऱ्या बाळांनाच ही समस्या येत नसते. कारण यात बहुतांश पोषक पदार्थ पूर्णपणे शोषून घेतले जातात. पण फॉर्मूला फीडिंगमुळे बाळांना दिवसातून 3 ते 4 वेळा मलावरोधचा त्रास होऊ शकतो. हे बाळांवर अवलंबून असते कारण आपण आपल्या बाळाला काय खायला आणि प्यायला देतो, ती किती सक्रिय आहेत आणि ती लगेच अन्न कसे पचवतात हे ही तितकेच महत्वपूर्ण आहे.

२) बद्धकोष्ठतेचे लक्षण

जर बाळाला मलविसर्जन करण्यात अडचण येत असेल, किंवा बाळाची विष्ठा कडक असेल, गुदद्वाराच्या भित्तिका ताणल्या गेल्यामुळे विष्ठेमध्ये रक्त आढळून आले तर हे निश्चितच बद्धकोष्ठतेचे लक्षण आहे.

३) बद्धकोष्ठता कशामुळे उद्भवू शकते?

स्तनपान आणि द्रव पदार्थ घेणाऱ्या बाळांना मलावरोधाची समस्या येत नाही. दुधात उपस्थित असलेल्या पोषक पदार्थांमुळे बाळाला अन्न पचवण्यात अडचण येत नाही. पण ह्या व्यतिरिक्त पदार्थामुळे ही समस्या उद्भवू शकते.

४) सुमारे 6 महिन्यानंतर, बाळाला आहारांमध्ये घन पदार्थ दिले जातात. यांमुळे बाळाच्या मलविसर्जना मध्ये चढउतार व्हायला लागतो. आणि त्यांच्या विष्ठेचा आकार आणि रंग बदलतो. अन्न प्रकार हे ही त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते.

५) साधारणपणे, आपण केळी, अन्नधान्याचा आहार किंवा फळे देवू शकता. आपण आपल्या बाळाच्या खाण्या पिण्याच्या सवयी आणि त्याबद्दलच्या वेगवेगळ्या पदार्थांबद्दल प्रतिक्रिया समजून घेणं गरजेचं आहे. आपले बाळ अन्नधान्याचा आहार सहजपणे पचवू शकेल, पण केळी पचवू शकणार नाही कारण, या टप्प्यावर, त्याच्या पोटाला, दूधापेक्षा इतर कोणतेही पदार्थ पचवण्याची सवय नाही.

बद्धकोष्ठतेवरील उपचार-

१. मालिश

घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हळूवार दाब देवून, हळुवारपणे आपल्या बाळाचे पोट चोळावे. मालिशमुळे बाळाला आरामदायक वाटेल. आणि पचण्यासही मदत करेल आणि ज्यामुळे त्याच्या पोटाचे स्नायू ढिले पडतील.

२. व्यायाम

जर आपल्या बाळाने रांगणे सुरू केले असेल तर त्याला अधिक रांगण्यास प्रोत्साहित करा. जर आपले बाळ अद्याप खूपच लहान असेल तर त्याचे/तिचे पाय हलवून त्याचा सायकल चालवल्यासारखा व्यायाम करून घ्यावा.

३. पातळ आहार 

जरी आपल्या बाळाच्या प्राथमिक पोषणाचे प्राथमिक स्त्रोत द्रव्य-आधारित असेल, ते म्हणजे दूध असेल, तरीही आपल्याला आपल्या बाळाला पाणी देण्याची अधिक गरज आहे. खासकरून जर त्यांना बद्धकोष्ठता झाली असेल, तर त्यांना पाणी देण्याच्या मात्रेत वाढ करावी.

४. जर आपले बाळ फॉर्मूला फीडिंग करत असेल तर फॉर्मूला बदलण्याबाबत

जर आपले बाळ फॉर्मूला फीडिंग असेल तर त्यांच्या आहाराबद्दल डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर वापरल्या जाणार्‍या फॉर्मूला पावडरमध्ये बदल करून पाहावा. असेही असू शकते की आपल्या बाळाला फॉर्मूल्यात उपस्थित असलेल्या विशिष्ट घटकांबद्दल संवेदनशीलपणा असावा.

५. उच्च फायबर आहार

जर आपण आपल्या बाळाला घन अन्नपदार्थ देण्यास सुरुवात केली असेल, तर त्यामध्ये उच्च फायबर समावेश असलेले पदार्थ जसे की सफरचंद, पेअर आणि पीच ही असतील याची काळजी घ्यावी. हे पदार्थ वारंवार होणार्‍या बद्धकोष्ठतेसाठी उपयुक्त आहेत.

६. कोमट पाण्याची अंघोळ 

कोमट पाण्याची अंघोळ आपल्या बाळाला चिडचिडीपासून आराम देण्यास मदत करेल.

ह्या उपायांनी बाळाला आराम मिळाला नाहीतर तान्ह्या बाळांच्या डॉक्टरला दाखवा. हा लेख तुम्हाला मनापासून आवडला असेल तर इतर मातांनाही आमच्याविषयी नक्की सांगा. व शेअर करा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon