Link copied!
Sign in / Sign up
151
Shares

बाळाचे लसीकरण आणि त्याविषयी माहिती


लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला खूप महत्वाचा घटक आहे. बाळाला लस का द्यायला हवी कारण लहानपणी बाळाची रोग प्रतिकार शक्ती कमी असते आणि १ वर्षाच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक असते. त्यामुळे लस लवकरात लवकर व त्या त्या वेळेत द्यावी. गोवरच्या लसीबरोबर ‘अ’ जीवनसत्त्वाचा पहिला डोस देणे गरजेचे आहे.

१) बाळाला एक वर्षाच्या आत कोणकोणत्या रोग प्रतिबंधक लसी देतात?

बाळ जन्माला आल्यानंतर वेळेवर लसीकरण केले पाहिजे. म्हणजे अनेक आजारांपासून त्याचे संरक्षण होऊ शकते. एक वर्षाच्या आत क्षयरोग प्रतिबंधक लास, त्रिगुणी लास, पोलियो प्रतिबंधक डोस, गोवराची लास या लसी द्यायला पाहिजेत. रक्त काविळीची लस पहिल्या दहा दिवसात देतात.

2) क्षयरोग प्रतिबंधक लस कधी टोचतात ?

क्षयरोग प्रतिबंधक लसीला बी.सी.जी. लस म्हणतात. ती डाव्या खांदयावर कातडीमध्ये टोचतात. बाळ जन्मल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सुद्धा दवाखान्यात ही लस टोचतात. १५ दिवसांनी त्या जागी एक फोड येतो तो फुटून त्याठिकाणी थोडासा व्रण एक ते दिड महिन्याने दिसू लागतो. जन्मल्यानंतर लगेच ही लस टोचली नसल्यास पुढील ३-४ महिन्यात कधीही टोचून घ्यावी. या लसीमुळे क्षयरोगापासून संरक्षण मिळते.


3) त्रिगुणी लस कधी टोचावी ?

बाळ दिड महिन्याचे झाले की त्याला त्रिगुणी लस टोचली पाहिजे व पुढे दर महिन्याने आणखी दोनदा टोचली पाहिजे. या लसीमुळे घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात यापासून संरक्षण मिळते. दीड ते दोन वर्षांनी आणखी एक बूस्टर डोस पुन्हा दयावा.

४) पोलियो प्रतिबंधक लस बाळाल कधी दयावी ?

बाळ जन्माला आल्यावर लगेच झिरो पोलियो डोस देतात. त्रिगुणी लसीबरोबरच म्हणजे बाळ दीड महिन्याचे झाल्यावर त्याला पोलियो प्रतिबंधक लसीचा पहिला डोस पाजावा लागतो व आणखी दोन डोस महिन्याच्या अंतराने पाजावेत. पोलियो पासून संरक्षण मिळते. दीड ते दोन वर्षाने आणखी एक बूस्टर डोस दयावा लागतो व पाचव्या वर्षी पुन्हा एक बूस्टर डोस द्यावा लागतो.

५) गोवर प्रतिबंधक लस कधी टोचतात ?

गोवर हा लहान वयात होणारा धोकादायक आजार आहे. त्यासाठी गोवर प्रतिबंधक लस बाळाला ९ ते १२ महिन्यांपर्यंत टोचतात. त्यामुळे गोवारापासून संरक्षण होण्यास मदत होते.

६) बाळाला ‘अ’ जीवनसत्त्वाचे डोस कधी पाजतात ?

सहा महिने ते ३ वर्ष या वयात ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव आढळतो. म्हणून या काळात ‘अ’ जीवनसत्वाचे डोस बाळाला पाजावेत व तसेच त्याच्या आहारात पपई, गाजर, हिरव्या पालेभाज्या असे पदार्थही असावेत.


७) बाळ आजारी असले तरी त्याला योग्यवेळी लसी दयाव्यात का ?

बाळाला सर्दी, खोकला, ताप किंवा अतिसार असला तरी बाळाचे लसीकरण किरकोळ आजारात पुढे ढकलू नये. जर बाळ कुपोषित असले तर निरनिराळ्या आजारांना बळी पडू शकते.

उद्या लसीचे वेळापत्रक दिले जाईल. पूर्ण लसीचे राहील म्हणजे कोणती लस केव्हा द्यायची. 

सौजन्य - भारत सरकार विकासपीडिया 


Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon