Link copied!
Sign in / Sign up
173
Shares

तुमच्या बाळाचे ३२ दात येण्याचे पूर्ण वेळापत्रक आणि टप्पे!


बाळाच्या दाताबद्दल आईला खूप एक्ससाईटमेन्ट असते. तशी आईला आपल्या बाळाच्या मोठे होण्याविषयी घाईच असते. आणि तिला वाटत असते की, “ माझ्या बाळाचे दात जर आले तर तो पटापटा खाईन आणि लवकर मोठा होईन”. सामान्यतः बाळाचे दात सहा महिन्यापासून यायला लागतात. दात हे तोंडात येणाऱ्या हवेला थांबवतात त्यामुळे शब्दाचे उच्चरण करायला सोपे होते. तसे बाळाचे बोबडे बोल खूप छान वाटतात. ह्याबाबत अगोदर लिहलेल्या ब्लॉगमधून तुम्हाला माहिती मिळाली आहेच. तेव्हा ह्या ब्लॉगमधून काही वेगळी माहिती जाणून घेऊ.

१) दूध दाताचे प्रकार

बाळाला जी दात अगोदर येतात त्याला दूध दात असे म्हटले जाते. हे दात जबड्याशी जुडलेले असतात. हे खूप महत्वाचे असतात. हा तोंडातला एलिमेंट्री कैनाल चा पहिला भाग असतो. सहा महिन्यापासून दात यायला सुरुवात झाल्यावर तीन वर्षापर्यंत बाळाच्या तोंडात २० दात होऊन जातात पूर्ण ३२ येत नाहीत. प्रत्येक जबड्यात १० दात येत असतात. दात येण्याचे प्रत्येक जबड्यानुसार वेगवेगळे असते.

२) बाळाचे सुरवातीचे दात अगोदर येतात. आता काही बालकांना वरचे दात येतात किंवा काही बाळांना खालचे दात येतात.

आणि जे खालचे दात येतात ते मुखत्वे चावण्यासाठी असतात आणि ह्यांचा येण्याची वेळ ६ ते १० महिने आणि पडण्याची वेळ (दूध दात असल्याने ) ६ ते ७ वर्ष. वरच्या दातांचा वेळ ८ ते १२ महिन्यात आणि पडण्याची वेळ ७ ते ८ वर्ष.

३) खालचे मागचे दात हे १० ते १६ महिन्यात हळूहळू येत असतात. आणि ह्यांची पडण्याची वेळ ७ ते ८ वर्ष. वरचे मागचे दात हे ९ ते १२ महिन्यात येतात. आणि तेही ८ ते १० वर्षाच्या दरम्यान पडतात. हे दात येण्याचे खूप बाळांच्या अनुभवानुसार काढलेले अनुमान आहे. ह्यात थोडाफार बदल होत असतो. जसे की, काही बाळांचे दात १० महिन्यानंतर यायला लागतात पण तो लवकरच सर्व दातांची जागा पूर्ण करतो.

४) खालच्या दाढचे दात हे तोंडातले पहिले मोठे दात असतात. हे दात जेवण खाण्याकरिता आणि चावण्यात करिता खूप उपयोगी ठरतात. यांच्या येण्याचे वय हे १४ ते १८ महिन्या दरम्यान असते. आणि पाडण्याची वेळ ९ ते ११ वर्ष.

वरच्या दाढचे दात हे जबडा बंद करते वेळी वरच्या आणि खालच्या जबड्याला एकत्रित जुडण्यापासून रोखत असतो. ह्यांची येण्याची वेळ १३ ते १९ महिने आणि पडण्याची वेळ ९ ते ११ वर्ष.

५) दाढ च्या मध्ये उगणारे दात असतात. हे दात मांसाहार किंवा टणक खाण्यासाठी मजबूत असतात. हे दात लांब व टोकदार असतात. ह्यांचे येण्याचे वय १७ ते २३ महिन्यात असते. आणि पाडण्याची वेळ ९ ते १२ वर्ष. वरच्या दाढमधले येणारे दात असतात. हे दातांचेही खालच्या दातासारखेच काम असते. येण्याची वेळ १६ ते २२ महिने आणि पडण्याची वेळ १० ते १२ वर्ष.

६) हा शेवटच्या दातांचा समूह असतो. ह्याला आपण अक्कल दाढ म्हणत असतो. हे शेवटचे दात असतात आणि ह्यांचा येण्याचा वेळ निश्चित नसतो. साधारणतः खूप बाळांना हे दात उशिरा येत असतात. म्हणून आले नाहीत तर घाबरू नका. आणि हे दात येतात आणि पडतात त्याचा वेळ सांगता येत नाही. आणि प्रत्येक बाळ प्रमाणे दात येण्याचा वेळ वेगवेगळा असतो.

आईने बाळाचे दात दररोज तपासायला पाहिजेत म्हणजे तुम्हाला कळून येईल की, तुमच्या बाळाचे दात कसे येत आहेत. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon