Link copied!
Sign in / Sign up
66
Shares

तुमच्या बाळांचे दात किडू नये म्हणून ह्या गोष्टी करा


लहान मुलांची दातांची निगा राखणे आणि त्यांच्या दातांना किडण्यापासून रोखणे ह्या गोष्टी आताच्या पालकांसाठी खूप आव्हानात्मक होऊ लागल्या आहेत. कारण आताच्या मुलांना चॉकलेट आणि वेफर्स खूप आवडतात आणि ह्याच गोष्टीमुळे तुमचे दात खराब होऊन किडत असतात आणि आताचे पालक फक्त उपचार करायलाच दवाखान्यात जातात. म्हणून लहानपणापासूनच दातांची निगा कशी राखावी त्याविषयी.

* बाळाला दूध पाजून घेतल्यानंतर बाळाच्या हिरड्या कोमट किंवा गरम पाण्याच्या फडक्याने साफ करून घ्यायच्या. ह्या गोष्टीमुळे दुधातील शर्करेचा बाळाच्या दातांवर कोणताच परिणाम होणार नाही.

* बाळाचे दात सहा महिन्यानंतर यायला लागतात तेव्हा त्यांची काळजी घ्यायलाही सुरुवात करावी.

* बाळाला साखर किंवा मिठाची सवय खूप लहानपानपासून लावू नये. साखर दातांवर परिणाम करते आणि लहान बाळ आपल्यासारखी दात घासत नाहीत.

* खूप वेळा आपण बाळाला कोणताही आहार देतो पण त्यावेळी स्ट्रेप्ट, म्युटन्स नावाचे जीवाणू दात किडण्यास कारणीभूत असतात. म्हणून अशा गोष्टी टाळायच्या.

* लहानपणीच बाळाला ब्रश करायची सवय लावावी. ह्याबाबत अगोदरच लेख लिहला आहे तो तुम्ही वाचू शकता. त्यांना ब्रश करण्याची सवय लागलीच तर ते दातांची स्वच्छताबाबत सजग राहतील. मुलांच्या दातांमधील खळगे भरल्यास दात निरोगी राहतीलच पण त्याचबरोबर फ्लूराइइड्‌सचा उपयोग इतर दात कीडू नयेत म्हणून होतो.

* दातांच्या बळकटीसाठी फ्लूराईड्‌स जेलचा वापर फार उपयोगी ठरू शकतो. दातांच्या मजबुतीसाठी काही अन्नपदार्थांचा सेवन करणे उपयोगी ठरू शकतो

ही पदार्थ आपल्या बाळाला खाऊ घालायची

कॅल्शियमयुक्त पदार्थ- चीज, दूध, हिरव्या पालेभाज्या, बदाम, ब्राझील नट्‌स, ब्राऊन राइस, कडधान्ये.

तसेच जास्त प्रमाणात फायबर (चोथा) असणारी ताजी फळे, अंजीर, खजूर, कडक सफरचंदे, केळी. 

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon