Link copied!
Sign in / Sign up
38
Shares

बाळाचे दात आल्यावर ही काळजी घ्या


बाळाचे जेव्हा दात यायला लागतात त्यावेळी तो काहीपण वस्तू तोंडात घेत असतो. त्यामुळे त्याला डायरिया सुद्धा होऊन जातो. कारण कोणतीही वस्तू तोंडात घेतल्यावर त्याचे इन्फेक्शन बाळाला होत असते. बाळाचे दात येतात बाळ रडतो व खूप चीड चीड करत असतो. त्याच्या चीड -चीड होण्यामुळे समजून घ्यायचे की, बाळाचे दात येत असतील. तेव्हा ह्या ब्लॉगमधून आणखी दातांविषयी माहिती घेऊ.

१) बाळाच्या शरीरात दात बनवण्याची प्रक्रिया मातेच्या उदरात सहाव्या आठवड्यापासून सुरू होते. बाळ जन्मताच दुधाचे सर्व दात (२०) हिरड्यांखाली तयार असतात. बाळाच्या हिरड्या चाचपून पाहिल्यास त्या टणक लागतात.

२) बाळाच्या दातांची ही प्रक्रिया योग्य पद्धतीने व्हावी यासाठी आईने आधीपासूनच दूध, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या भाज्या, फळे व मासांहार घेतला पाहिजे. यातून आई व बाळाला आवश्यक असलेले कॅल्शिअम व व्हिटॅमिन मिळते.

३) बाळ जन्मल्यावर आईने त्याच्या टणक हिरड्यांची पुरेशी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी टाळायला हव्यात

* बाळाच्या तोंडात दुधाची बाटली देऊन त्याला झोपवू नये.

* दूध पिऊन झाल्यावर स्वच्छ ओल्या कपड्याने बाळाच्या हिरड्या अलगद पुसून काढाव्यात.

४) दुधाचे दात हिरड्यांमधून बाहेर येण्याची प्रक्रिया सहा महिन्यानंतर सुरू होते. सुरूवातीला सुळे दात, दाढा व चार दात येतात. त्यानंतर प्रत्येक सहा महिन्याला चार दात येतात. या दात येण्याच्या प्रक्रियेत बाळाला फार त्रास होत असतो.

५) याकाळात बाळाला समजून घ्या, आवश्यक औषधोपचार करून त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करणे आदी पालक करू शकतात. या वेळी वेदना, हलका ताप, खोकला, जुलाब असे त्रास होतात.

६) दात येताना बाळाला जुलाब होतातच किंवा दूध पचत नसल्याने असं होतं ही गैरसमजूत आहे. बाळाच्या हिरड्या शिवशिवत असतात. त्यामुळे कुठलीही गोष्ट तोंडात टाकण्याकडे त्यांचा कल असतो. खेळणी, हातापायाची बोटं तोंडात घातली जातात. यामुळे जुलाबाचा त्रास होत असतो. तो पालकांनी लक्षात घेतला पाहिजे.

हा त्रास नॉर्मल असला, तरी छोट्या जीवाला तो फारच त्रासदायक ठरतो. त्यामुळे अशा वेळी बाळाची काळजी घ्या. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon