Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

बाळाचा जन्म झाल्यावर समागम केव्हा करावे ? आणि काय दक्षता घ्याल ?


बाळाच्या जन्म झाल्यावर संभोग केव्हा करावा हा एक सामान्यतः पडणारा प्रश्न आहे. आणि ह्यासंबंधी डॉक्टरही खूप सखोल सांगत नाहीत. त्यामुळे दाम्पत्यांच्या खूप गोंधळ होतो. आणि ह्याबाबतीत खूप जास्त व व्यवस्थित माहिती नसल्याने काही गुंतागुंतीच्या समस्या तयार करून घेतात. तेव्हा डिलिव्हरीनंतर केव्हा संभोग करावा आणि कोणती दक्षता घ्यावी. आणि त्याचबरोबर कोणत्या गोष्टी असल्यास संभोग करू नये. ह्या सर्व बाबतीत माहिती ह्या ब्लॉगमधून तुम्हाला मिळेल.

 तसे पाहिल्यास तुम्ही समागम १ महिन्यानंतर करू शकता. पण कोणत्या स्थितीत करू शकत नाहीत ते अगोदर जाणून घ्या.

१) काही जोडपी बाळाचा जन्म झाल्याचा महिन्याचा आतच समागम सुरु करून देतात. आणि काही दोन महिने झाल्यानंतर करतात. तेव्हा प्रत्येक दाम्पत्य त्यांच्या समजुतीनुसार समागम करतात. काहीजण सहा महिने होऊ देतात आणि त्यानंतर समागम करतात.

२) ज्या स्त्रियांचा पेरिनियम चा भाग डिलिव्हरीच्या वेळी फाटून जातो आणि त्या ठिकाणी टाके घातली जातात. त्या टाक्यांकरिता तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. आणि ज्या स्त्रियांची सिझेरियन डिलिव्हरी झाली असल्यास त्यांना घातलेली टाके ही ओली असतात आणि समागम करताना त्याना धक्का लागून काहीतरी दुखापत होऊ शकते त्यामुळे ह्यावेळी थोडे दिवस थांबलेले बरे असते.

३) तुमची टाके व जखमा आता चांगल्याच कोरड्या झाल्या आहेत. आणि समागम करताना रक्तस्त्राव होत नसेल. आणि लक्षात घ्या जर समागम करताना रक्तस्त्राव झालाच तर एकदा डॉक्टरांना विचारून घ्या. आणि त्यानुसारच समागम करण्याचा विचार करा. एकदम काही त्रास होत असल्यास काही दिवस थांबा. किंवा तुम्ही समागमासाठी तयार झाल्या नसाल तर बाकीच्या गोष्टी करू शकता.

४) आता समागम करताना गर्भनिरोधाचा विचार करून घ्या. कारण बाळाला तुम्ही स्तनपान करत असाल आणि तुमची मासिक पाळी जरी आली नसेल तरीही तुम्ही गरोदर होऊ शकता. म्हणून अगोदरच गर्भनिरोधाचा विचार करून ठेवा.

५) काही स्त्रिया ह्या मानसिक तयार नसतात पण शारीरिक बाबतीत तयार असतात. आणि काही स्त्रिया मानसिक तयार असतात पण शारीरिक बाबतीत त्या तयार नसतात. म्हणून ह्या दोन्ही गोष्टीची तयारी असल्यास तुमचा मार्ग मोकळा होतो. म्हणून खूप घाईही करू नका. आणि खूप घाबरून जाऊ नका.

पुढच्या लेखात : बाळाच्या जन्म झाल्यावर खूप स्त्रियांना समागम करण्यात रस वाटत नाही ? नेमके ह्याचे कारण ह्याविषयी पुढच्या लेखात जाणून घेऊ. तुमचे ह्याविषयी आणखी प्रश्न असतील तर आमच्या tinystep च्या ऍपवर मराठीतून विचारू शकता. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon