Link copied!
Sign in / Sign up
41
Shares

बाळ जन्माला आल्यावर ह्या गोष्टी कराव्यात

बाळाचा जन्म हा घरातल्या लोकांसाठी पर्वणीच असते. प्रत्येक जण त्याला धरण्यासाठी उत्सुक असतो. त्याच्या चेहरा पाहिल्यावर खूप प्रफुल्लित वाटत असते. असे बाळ जन्माला आल्यावर अगोदर त्याची नाळ कापावी लागते त्यानंतर बाळ ९ महिन्याच्या कालावधीनंतर आईपासून वेगळा होतो. पण खरं म्हणजे आता तो जास्त आईच्या जवळ येतो. नाळेबाबत तुम्हाला माहिती आहेच.

बाळाला आईपासून वेगळे केल्यावर बाळ खूप रडतं. आणि त्याच्या रडण्यामुळे बाळाच्या छातीला चालना मिळते आई ती छाती मोकळी होते. आणि त्याचा श्वास मोकळा होतो. श्वास बरोबर घ्यायला लागतो.

ह्या नवीन तान्ह्या बाळाला आयुर्वेदाप्रमाणे थेंबभर मध, त्याच्यात थोडेसे तूप, आणि एखाद्या सोन्याच्या अंगठीचे सहाणेवर चार वळसे उगाळून प्रथम द्यायला सांगितलं आहे. मधामुळे कफ़ाचही शमन होत.

ह्यानंतर थोड्या वेळाने वाटी- चमच्यानं बाळाला दूध द्यावं. हे दूध बाहेरच - गाईचं असत. अर्धं दूध आणि अर्धं पाणी साखर घालून तयार करावं. छोट्या चमच्यानं बाळाला हे दूध हळूहळू पाजावं. ह्यांच्यानंतर तास - दीड तास बाळाला काही देऊ नये. तासात उलटी झाली नाही म्हणजे समजून घ्यावे की, बाळाची अन्ननलिका बरोबर आहे. बाळाच्या अन्ननलिकेच्या मार्गात काही अडथळा नाही. आणि जर असे होत नसेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जावे. आणि हा अडथळा आहेच असे समजण्यासाठी ४ ते ५ वेळा बाळाला दूध पाजण्यात येते.

बाळ जन्माला आल्यावर खूप चांगले दिसते. दुसऱ्या - तिसऱ्या दिवशी वजन थोडं कमी होत मग चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. आणी बाळ खूप बारीक दिसायला लागते घाबरून जाऊ नका. मग हळूहळू त्याच वजन वाढू लागते.

बाळाला पहिली शी हिरवट होते. नंतर नंतर १ ते २ दिवसांनी पिवळसर शी होऊ लागते. बाळ जेवढ्या वेळा दूध पितात तेवढ्या वेळा शी करतात.

साभार - डॉ - नियती बढे 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon