Link copied!
Sign in / Sign up
134
Shares

गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यातील बेबी ड्रॉपिंग म्हणजे काय


गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात  बाळाचा घ्यायच्या जवळ यायला लागतॊ त्यावेळी स्त्रीच्या शरीरात काही बदल व्हायला लागतात. त्यामध्येच एक बदल हा गर्भाशय खाली घसरणे हा आहे. आणि या लेखात आम्ही तुम्हाला या विषयी अधिक माहिती देणार आहोत.

              Baby droping बाळ खाली सरकणे (बेबी ड्रॉपिंग) काय असते ?

 अशा वेळी गर्भवती स्त्रीचा प्रसूतीच्या वेळ जवळ आलेला असतो. पहिल्या वेळी आई बनणाऱ्या स्त्रियांना ही गोष्ट बाळाचा प्रत्यक्ष जन्माच्या अगोदर अनुभवाला मिळते. ज्या गरोदर माता दुसऱ्या वेळी आई होतात त्यांना ही स्थिती बाळाच्या प्रत्यक्ष जन्माच्या अगोदर काही तास अगोदर अनुभवाला मिळते. आणि ह्या गोष्टी शेवटच्या त्रैमासिकात अनुभवयाला मिळतात. आणि यामध्ये खूप घाबरून जाऊ नका व घाबरण्याचीही गोष्ट नसते.

बेबी ड्रॉपिंग मध्ये बाळ गरोदर स्त्रीच्या गर्भाशयापासून खाली सरकून स्त्रीच्या योनीकडे जायला लागतो. आणि यामुळे बाळाचे वजन पोटावरून, फुफ्फुस आणि मांडीच्या पिंजऱ्यावरून गर्भाशयावर आणि मूत्राशयावर दबाव पडायला लागतो.

बेबी ड्रॉपिंगचे लक्षणे :

बेबी ड्रॉपिंगच्या वेळी गर्भवती स्त्रीच्या शरीरात काही बदल होत असतात त्यांना बघता येते जसे की, गर्भवती स्त्रीचा कंबरेखालचा भागाचा आकार बदलायला लागतो. ऍसिडिटी आणि छातीत होणारी जळजळ कमी होऊन जाते, यावेळी लघवी खूप लागायला लागते, आणि ती श्वासही नेमेकेपणाने घ्यायला लागते.

याबाबत निश्चित सांगता येणार नाही कारण प्रत्येक स्त्रीची प्रकृती व शरीर भिन्न -भिन्न असते. पण ही गोष्ट निश्चित आहे की, बेबी ड्रॉपिंग ३५ आठ्वड्यानंतर पूर्ण झाल्यावर सुरु होऊन जाते.

बाळ केव्हा खाली सरकायला लागते ?

स्त्री ‘एक नवीन जीव’ या जगात आणते याला खरंच निसर्गाचा अविष्कार आणि स्त्रीला मिळालेले भाग्यच म्हटले पाहिजे. त्या स्त्रीला या प्रक्रियेत त्रासही सहन करावा लागतो. पण ती खंबीरपणे सारे सहन करून बाळाला जन्म देते. ज्यावेळी तुम्हाला वाटत असेल की, आपले गर्भातले बाळ खाली घसरत आहे तर घाबरून जाऊ नका. त्यावेळी काय -काय होते त्याबद्दल

१) बाळ हळूहळू योनीकडे सरकत जाते.

२) त्यानंतर तुमच्या शरीरातून पाणी सुटायला लागेल.

३) पाणी निघाल्यानांतर थोडे आखडल्यासारखे वाटेल

४) आणि याला काही आठवडे लागतात म्हणून संयम ठेवा लगेच घाबरून काहीही करू नका. हळूहळू सर्व क्रिया व्यवस्थित व्हायला लागतात. आणि यात वरती दिलेल्या गोष्टीपेक्षा वेगळा त्रास होत असेल तर प्रसूतितज्ञाला भेटून घ्या. आणि हा लेख दुसऱ्या मातेला सांगा किंवा शेअर करा जेणेकरून त्याही ह्यातून घाबरणार नाही. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon