Link copied!
Sign in / Sign up
73
Shares

बाळाचा गर्भ ते अर्भक प्रवास ( व्हिडीओ)

गर्भधारणा झाली आहे हे कळल्यापासूनच तुमच्यामध्ये वाढत असलेल्या जीवाची तुम्हाला जाणीव होण्यास सुरवात होते. केवळ तुम्हालाच या बाळाची वाढ आणि त्याची प्रत्येक हालचाल कळणार आहे ही जाणीव अदभूत असते. नाही का? तुमच्या बाळाची या ९ महिन्यांत अगदी पहिल्यापासून पूर्ण वाढ कशी होते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. हेच टप्पे एक छायाचित्रकाराने (photography by Lennart Nilsson) कसे टिपले आहेत ते आपण पहाणार आहोत. 

इथे दिले आहेत गर्भावस्थेतल्या बाळाच्या वाढीचे टप्पे आणि त्याची प्रत्येक महिन्यातील वाढ.

१. गर्भधारणा.

तुमच्यात जीवधारणा झाली आहे म्हणजेच शुक्रणूचा गर्भनलीकेतून अंड्यात यशस्वीपणे प्रवेश झाला आहे. . काही घरगुती टेस्ट करून तुम्ही तुम्ही गरोदर असण्याची खात्री करून घेऊ शकता. आणि शंका वाटत असल्या डॉक्टरांच्या निर्देशनीसार इतर टेस्ट करून घेऊ शकता. हे सुरवातीचे ३ महिने काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे कारण या तीन महिन्यात गर्भपात होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

२. पहिला महिना

सुरवातीला पेशींचे वर्गीकरण होते. एक पेशीच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ अशा पेशी वाढून पेशींचा समूह तयार होतो. याच पेशी नंतर पुन्हा वेगळ्या होऊन बाळाचे शारीरिक भाग हात, छाती, डोकं बनते. गर्भ वाढायला सुरवात होते आणि मुटकुळी करून बसलेल्या भृणाचा आकार घेते.

३. दुसरा महिना.

तुमचे बाळ आता,अंदाजे १ इंच चे झालेले असते . याकाळात बाळाची वाढ झपाट्याने होत असते म्हणून हा काल महत्वाचा असतो. स्वतःची विशेष काळजी घ्या, सकस अन्न खा आणि निरोगी रहा. पौष्टीक व सकस आहार अवयवांच्या प्रथम जडणघडणीत अत्यंत आवश्यक आहे.

४. तिसरा महिना.

यावेळी बाळ वाटाण्याच्या शेंगे एवढे म्हणजे २-३ इंचाचे असते. त्याच्या हाताची आणि पायाची बोटे आकार घेऊ लागतात. कधी कधी बाळाच्या हालचाली तुम्हाला जाणवू शकतात, त्याच्या हृदयाचे हलके हलके ठोके संथ गतीने चालू होतात.

५. चौथा महिना.

चौथ्या महिन्यात तुमच्या गर्भाशयाचा आकार वाढतो म्हणजे तुमचं बाळ आकाराने आणि वजनाने वाढते. त्यामुळे साहजिकच तुमचे पोट मोठे दिसू लागते ! बाळाचे वजन यावेळी साधारणत: १४२ ग्राम एवढे असते. त्याच्या मेंदूची कवटी कडक आवरणासह बनण्यास सुरवात होते आणि आताशा त्याच्या हृदयाचे ठोके ठळक होऊ लागतात.

६. पाचवा महिना

तुमच्या बाळाची आतापर्यंत २७ सेमी इतकी वाढ झालेली असते (पाय लांब करून). त्याचे डोळे, भुवया ,पापण्या हे सर्व तयार झालेले असते. तुम्हाला त्याच्या हालचालींची पूर्ण जाणीव होईल, कदाचित त्याच्या काही खोडकर लाथा देखील आता तुम्हाला लागतील!

७. सहावा महिना

तुम्ही आता गर्भाचा अल्ट्रासाऊंड (Ultrsound) करून गर्भातल्या बाळाला बघू शकता. काही वर्षानंतर, गर्भात असताना तो किंवा ती किती छोटेसे होते हे दाखवायला ‘पहिला फोटो’ म्हणून ह्या प्रतीची हवी तर फ्रेम बनवा.

८. सातवा महिना .

आता बाळाचे वजन ६०० ग्राम एवढे भरते. त्याच्या वाढीच्या हालचाली आणि प्रगती त्याचे एका संपूर्ण मानवात रुपांतर करत असतात. बाळाच्या लाथा आणि धक्के आता पूर्णपणे ठळक होतात.

९. आठवा महिना .

गर्भातल्या जीवाने आता एका परिपूर्ण बाळाचे रूप घेतलेले असते. जर तुमची मुदतपूर्व (प्रीमच्युअर) प्रसुती झाली तर असं अर्भकाची अत्यंत चोख काळजी घेतल्याने ते जगू शकते. त्याचे वजन आता जवळपास २ किलो असते.

१०. नववा महिना .

प्रसूतिपूर्व काळ- गर्भाशयामधील गर्भकाळ आणि गर्भाचे वजन यावर प्रसव केंव्हा होणार हे ठरते. तुमचे बाळ बाहेर येण्यास आता पूर्णपणे तयार आहे. डॉक्टरांनी एव्हाना तुमचे वेळापत्रक ठरविलेले असते आणि तुम्ही आई होण्यास उत्सुक असाल!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon