Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

तुमचा बाळाचा विकास २ ते ३ वर्षापर्यंत असा होतो


तुमचे बाळ आता खरचं बालक बनले आहे. तुमचा विश्‍वास बसला नाही तरी बाळाची वाढ वेगाने होत असते. घरातल्या वातावरणात प्रचंड उर्जा भरलेली असते आणि तो किंवा ती आपल्या आजूबाजूला दुडूदुडू धावायला देखील लागतात. आज आपण याच वयोगटातील मुलांच्या वाढीविषयी माहिती घेऊ

१) भावनिक विकास

दुसरे वर्ष मानसिक विकासाच्या दृष्टीने आतिशय महत्वाचे असते.तुमच्या बाळामध्ये आता भावना समजून घेण्याची क्षमता विकसित होतीय.जेव्हा ते निराश होतात,रागवतात,लाजतात,गोंधळतात. या वयात तो अधिक स्वतंत्रपणे आणि गर्दीत आपल्याला शोधत नसतो.

* भाषा : तीन वर्षांचे मूल पाच शब्दांचे पूर्ण वाक्य बोलू शकते.

* तुमच्याशी संवाद साधू शकते. आपल्या आजूबाजूला घडणार्‍या सर्व गोष्टीतून ते शिकत असते. वयाच्या पावणे चार वर्षांपर्यंत ते मूल भाषा व्यवस्थित बोलू लागते.

२) शाररिक विकास

या वयातील मुले आपली मदत नाकारतात सर्व गोष्टी स्वत: करण्याचा प्रयत्न करतात. स्वत:चे हात धुवणे,स्वत:च्या हाताने खाणे, कपडे घालणे अशा इअतर अनेक गोष्टींकडे ते आकृष्ठ होतात.

* तुम्ही सुध्दा त्यांना प्रशिक्षण द्यायला सुरवात करा जसे की, शौचालयात जाणे. या सर्व गोष्टी त्याला शिकायला वेळ लागू शकतो, थोडा धीर धरा तो त्याच्या वेगाने गोष्टी शिकेल.

* तुमचे बाळ न पडता आता चालू शकते, उड्या मारू शकते, पायर्‍यांवरून स्वतंत्रपणे चालू शकते, काही सेकंद एका पायावर सुध्दा उभे राहू शकते.

३) शिकवण

* तुमचे बाळ आता सोप्या गोष्टी समजू शकते. तो किंवा ती वेळ, विरुध्द संकल्पना समजू लागते. उदा. लहान-मोठे, गडद-ङ्गिकट,आकार, रंग इत्यादी.

* खेळाचे वेगवेगळे प्रकारातून ते शिकू शकतात. यासाठी बाळाला नेहमी प्रोत्साहन द्या. बोटांनी चित्र काढणे, कपड्यांसोबत खेळणे,गोष्टी सांगण्यातून मुले वेगाने शिकतात.

४) तुम्ही काय करू शकता

* घरातील ब्लॉक्स, मोती, बटणे यासारख्या खेळांची ओळख करून द्या. ते ब्लॉक्स एकाच रंगाचे कसे वेगळे करायचे, रंगांची जुळवणी कशी करायची, ते विलग कसे करायचे असे सर्व शिकवा.

* तुमच्या बाळाला शक्य असल्यास घराबाहेर समुद्र किनारी, बागेत अशा ठिकाणी घेऊन जा. अशा ठिकाणी मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा.

५) नियमितपणे मुलांशी संवाद ठेवा

* जितके जास्त तुम्ही त्यांच्याशी बोलाल तितके त्यांचे शब्द भांडार वाढेल. घरातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये, कामामध्ये त्यांची मदत घ्या.स्वयंपाक घरात जेव्हा तुम्ही काम करत असता, तेव्हा भाजी आणून देणे, वॉशिंग मशीनचे बिप इत्यादी कामात मदत घेऊ शकता.

* यामुळे त्यांच्यात मोटर कौशल्य विकसित होतात आणि तुम्हाला मदत केल्याने त्यांच्याही आनंदात भर पडते. झोपताना त्यांना नेहमी गोष्टी सांगा. गोष्टी सांगितल्याने ती लवकर झोपतात.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon