Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

बाळाचा विचार करण्याआधी स्वतःला हे ४ प्रश्न नक्की विचारा

आई-वडील होणे किंवा पालक होणे ही  सोप्पी गोष्ट नसून एका जीवाचे भवितव्य तुम्ही ठरवणार असता त्यामुळे याबाबतचा निर्णय घेताना तुम्हांला दोघांना नीट विचारपूर्वक एकमेकांच्या संमतीने हा निर्णय घेणे गरजेच असते. जर तुमची आई-बाबा होण्याची तयारी झाली असेल तर हे काही प्रश्न स्वतःच्या मनाला नक्की विचारा 

१. मी बाळाची जबाबदारी घ्यायला तयार आहे का ?

बऱ्याचदा हा प्रश्न विचारल्यावर नकार येण्याची शक्यता असते. कोणी म्हणत आहे . नातेवाईक काय म्हणतील या गोष्टींचा विचार करून तर मी हा निर्णय घेत नाही ना कारण ही तयारी सर्वात जास्त महत्वाची आहे फक्त ही  तयारी करत असताना वयाची मर्यादा लक्षात घेणे आवश्यक असते. 

 

२. बाळाचा विचार करत असताना मी/आम्ही आमच्या आरोग्याची योग्य काळजी घेत आहोत का ?

आरोग्य आणि शाररिक तयारी ही  देखील बाळाचा विचार करत असताना महत्वाची आहे. जर तुम्ही बाळाचा विचार करत आहात आणि तुमच्या आहार-विहारकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात, व्यसने करत आहात तर तुम्हांला स्त्रीला गरोदर राहण्यात समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. आणि पुरुषांच्या शुक्रांणूची गुणवत्ता कमी होते आणि त्यांना देखील मूल  होण्यास समस्या निर्माण होऊ शकतो. आणि जरी आरोग्याकडे दुर्लक्ष करून देखील स्त्री गरोदर राहिली तर तिने केलेली आरोग्याच्या हेळसांड होणाऱ्या मुलाला भोगावी लागू शकते. त्यामुळे गरोदर राहण्याआधी आणि गरोदर राहिल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे आणि योग्य ती दिनचर्या पाळणे आवश्यक असते. 

३. आमच्या मुलाला योग्य भविष्य देऊ शकतो ना ?

प्रत्येक जोडप्याने मुलाचा विचार करताना ही  काळजी घेणं अवश्यक असते. आपण आपल्या मुलाला योग्य भवितव्य देऊन त्यांच्या भविष्याची आपण काय तरतूद करू शकतो. त्यांना खूप उच्च नाही पण सामान्य जीवन तरी देऊ शकतो ना ? पण यात देखील एक मर्यादा ठरवून घेणे आवश्यक आहे. कारण मुलांच्या भविष्याची तरतूद करण्याच्या नादात मुल  जन्माला घालण्याचे वय निघून जाऊ नये. 

४. मुल  जन्माला घालायचा हा निर्णय दोघांचा आहे ना ? आणि तो दोघांनी मनापासून घेतला आहे ना ?

कोणा एकाला मुल नको असेल किंवा इतक्यात नको असेल तर मुल  जन्माला घालायच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करा. कारण मुल  झाल्यानंतर जर या गोष्टींचा तुमच्या नात्यावर परिणाम होतोच आणि जन्माला येणाऱ्या जीवाची तुमच्यामुळे फरपट नको. त्याचे आयुष्य अस्थिर करू नये त्यामुळे दोघांनी व्यवस्थित विचार करून हा निर्णय घ्यावा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon