Link copied!
Sign in / Sign up
146
Shares

बाळाला शांत झोप येण्यासाठी हे उपाय करा.

 

घरात बाळ असले की सगळे घरच कामाला लागते. घराच्या आनंदाचा ठेवा असते बाळ. त्यामुळे त्याची काळजी सर्वचजण घेत असतात. नवजात बालकांना शांत झोप लागणे हा देखील सर्वांच्या काळजीचा विषय असतो. कारण लहान बाळे झोपेतच अधिक वाढतात असे म्हटले जाते. सर्व गोष्टी आनंदाने पार पाडणारे आईवडिल बाळाच्या झोपेने मात्र क्वचित असतात. कारण रात्री बाळ शांत झोपेल याची काही खात्री नसते. त्याशिवाय बाळाच्या झोपेच्या वेळा, टप्पे जसजसे ते मोठे होतात तसे बदलत राहातात.

बाळाच्या शांत झोपेसाठी काय करावे असा प्रश्न पालकांना सतवत राहतो. पुर्वीच्या काळी बाळे अगदी सात आठ तास काय बहुतेक काळ झोपलेलीच असत असे म्हटले जाते. पण असो काळ बदलला तशी बाळांच्या सवयीही बदलणार. काही बाळे स्वतःच झोप आली की झोपून जातात. त्यांच्या आवडीचे पांघरूण किंवा तोंडात अंगठा घालून ते झोपी जातात. काही बाळांना आई किंवा वडीलच लागतात पण ते जांभया देणे, कुरकुर करणे किंवा डोळे चोळणे असे सर्व प्रकार करुन झोपी जातात. काही बाळे मात्र आईबाबांच्या धीराची कसोटी पाहतात. ही बाळे अत्यंत कृतीशील असल्याने खेळण्याच्या नादात झोपेलाही परतवून खेळत बसतात. या बाळांमध्ये प्रचंड उर्जा असते. अशा बाळांना मात्र झोपेचे प्रशिक्षणच द्यावे लागते.

अगदी नुकतंच जन्मलेले बाळ अधिक काळ झोपेतच असते. दुध पिणे, झोपणे, शू करणे पुन्हा भूक लागली की रडणे आणि हे चक्र काही दिवस तरी सुरु राहाते. त्यात बदल होतो तो वेळेचा. कारण या बाळांना दिवसरात्र असे काही समजत नसते. त्यामुळे त्यांच्या झोपेचा वेळ निश्चित करण्याचा प्रयत्न करु नये मात्र दीड महिन्यानंतर बाळांना दिवसरात्र यांची जाणीव जरुर करून द्यावी.

दिवस रात्रीची सवय –

दिवसा खूप झोपणाऱ्या बाळांना पुरेशी झोप झाल्यानंतर जागे करणे त्यासाठी त्याला गुदगुल्या करणे, गप्पा मारून उठवावे. खोलीत भरपूर उजेड असावा. बाळ उठल्यानंतर त्याच्याशी खेळावे. तसेच खोलीत बाळासमोर गप्पा माराव्या जेणेकरून ती वेळ ही झोपेची नाही तर दुध पिणे, खेळणे यासाठी असल्याचे त्याच्या लक्षात येईल. रात्र आहे हे कळण्यासाठी खोलीत मंद प्रकाश असावा, बाळाचे लंगोट, शी, शू करताना फार आवाज करु नये. बाळासाठी एखादे गाणे किंवा गोष्ट जी रोज म्हणता तीच म्हणावी त्यामुळे बाळ हळूहळू पेंगुळते आणि झोपी जाते.

नित्यक्रम-

बाळासाठी कसला दिनक्रम असा विचार करु नका कारण बाळही एक माणूसच असते. त्यामुळे बाळाच्या झोपेसाठी ठराविक वेळ निवडा आणि एखाद दोन आठवडे ती वेळ पाळा मग काही काळाने बाळ बरोबर त्या वेळेला झोपी जाते.

मसाज -

आपल्याकडे पुर्वीपासून बाळांना तेल मालिश क़रण्याची पद्धत आहेच. सकाळी तेल लावून मालिश आणि अंघोळ केल्यावर बाळ चार ते पाच तास झोपते. तसेच संध्याकाळीही बाळाला तेल किंवा क्रीम हातापायांना लावावे. छान चोळून त्यांच्या हातापायांना व्यायाम करावा. मालिशमुळे बाळांची पचनक्षमताही चांगली होते. तसेच आईबरोबरचे नाते दृढ होते आणि बाळाला शांत झोप लागते.

फिरायला जाणे-

बाळ दीड दोन महिन्याचे झाले की बाळाला घराबाहेर मोकळ्या हवेत थोडे फिरवून आणावे. त्यामुळे बाळाला ताजेतवाने वाटतेच पण संध्याकाळी ते लवकर झोपतात.

झोपेसाठीची तयारी-

बाळाला झोपवताना काही तयारी करावी. सैलसर सुती कपडे घालावे. रात्री लंगोट बदला. त्यांच्या अंगाला तेल लावावे. खोलीतील लाईट कमी करावे. त्यांच्या आवडीचे गाणे म्हणावे.

स्तनपान-

दिवसभरात बाळाला भूक लागली की तीन चार तासांनी किंवा बाळ रडले की त्यांना स्तनपान करवतोच. पण ज्या बाळांचे पोट दिवसा व्यवस्थित भरते त्यांना रात्री शांत आणि व्यवस्थित झोप लागते. त्यामुळे सकाळच्या तुलनेत संध्याकाळी बाळांना दर काही वेळाने दूध पाजावे. जेणेकरून बाळाचे पोट भरेल आणि रात्री ते शांत झोपू शकेल.

बाळाला आईजवळ झोपवावे-

बाळाला उचलून घेणे किंवा कडेवर घेणे असा याचा अर्थ नाही तर रात्री झोपताना शक्यतो बाळाला आईच्या जवळच झोपवावे. बाळाला वेगळ्या खोलीत झोपवू नये. आईजवळ झोपल्याने बाळाला सुरक्षित तर वाटतेच शिवाय रात्री स्तनपान देणेही सोपे पडते. तसेच आईजवळ झोपल्याने बाळ दचकून जागे झाले तरीही पुन्हा थोपटल्यावर निश्चितपणे झोपते. त्यामुळे रडारडही कमी होते.

दिवसाची झोप कमी-

बाळांना दिवसाही झोप येत असते qकबहुना त्यांना खाणे झोपणे इतकेच काय ते करायचे असते. मात्र थोडी मोठी झाले की त्यांची दिवसाची झोप थोडी थोडी कमी करावी जेणेकरून संघ्याकाळी ते वेळेवर आणि गाढ झोपतील.

या गोष्टी टाळा-

अर्थात बाळाच्या झोपेत अडथळा ठरणाऱ्या गोष्टीही टाळाव्यात.

अतिसजावट नको-

बाळाच्या खोलीत खूप बटबटीत सजावटीचा अतिरेक टाळावा. तसेच खूप गोष्टींनी ती सजवू नये कारण बाळाचे लक्ष त्यामुळे विचलित होते. त्यामुळे झोप घालवण्याकडे बाळाचा कल वाढतो.

बाळाचे जागरण-

बाळाला संध्याकाळी खूप जास्त वेळ जागे ठेवल्यास बाळ चिडचिड करु लागते. घरात पाहुणे आले म्हणून बाळाला जागे ठेवणे.

रडले की घेतले उचलून-

बाळ रडले की त्याला लगेच उचलून घेतो. पण त्याचीही बाळाला सवय होते की आपण र‹डलो की उचलून घेतात. बाळ झोपेत रडले की लगेच उचलू नका. थोडे थांबा कदाचित बाळ पुन्हा झोपी जाईल. बाळ रडतच असेल तर त्याला गरम होतंय का, भूक लागली आहे का, थंडी वाजतेय का, डास चावतात का हे पहा. काही वेळा बाळांना नुसते थोपटले तरीही ते झोपतात.

काही वेळा मुलांना सर्दी किंवा खोकला असेल तर मुले शांत झोपत नाहीत. किंवा बाळाचा कान, पोट दुखत असते त्यामुळे ती रडतात पण ते वेगळ्या प्रकारचे असते घरातील ज्येष्ठांना ते समजते. त्यावर काय करायचे हे डॉक्टरांकडून जाणून घ्यावे. त्या उपायांनी पण बाळ शांत झाले नाही तर डॉक्टरांना फोन करावा.

काही वेळा मात्र एवढे सर्व करुनही बाळ अजिबात दाद लागू देत नाही आणि ते सतत खेळते, हसते पण कितीही दमले तरी झोपत नाही. रात्री छान झोपणारी मुले अचानक खूप उशिरापर्यंत झोपतच नाहीत. तेव्हा चक्रावून जाणे साहजिकच आहे. पण काळजी नको हे बाळाच्या वाढीच्या टप्प्यातील एक टप्पा आहे. कारण दीड महिन्यानंतर बाळाची प्रगती वेगाने होते त्याला अनेक गोष्टी दिसतात, कळतात. मग बाळ कसे बरे शांत राहणार. त्यांच्या अति उर्जेमुळे ती जागी राहातात. बाळ वर्षाचे होईपर्यंत साधारण तीन वेळा हे असे टप्पे येतात. त्यावेळी पालकांनी धीराने घेत ही फेज आहे संपेल थोड्या दिवसात असे म्हणत शांत रहावे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon