Link copied!
Sign in / Sign up
43
Shares

मूल झाल्यानंतर पतीशी भांडणे होण्याची पाच कारणे

       आपल्या बाळाला घरी आणल्यानंतर घराला खऱ्या अर्थाने घरपण येते. यानंतर आईपणाच्या आयुष्यात आपला प्रवेश होतो आणि बाळाचे निखळ हास्याव्यतिरिक्त दुसरा आनंद कशातच नसतो. बाळाला घरी आणणे हा आयुष्य पालटवणारा प्रसंग असला तरी थोडासा कडूगोड अनुभव असतो.

हाच तो क्षण असतो जेव्हा आपण फक्त बायको राहात नाही आणि आपल्यावरच्या जबाबदाऱ्याही दुप्पट वाढतात. नवीन आईला नव्या आयुष्याशी, नवऱ्याशी, बाळाशी घराशी आणि असा अनेक गोष्टींशी नव्याने जुळवून घेण्याचा दबाव येत असतो.

बऱ्याचदा बाळ झाल्यानंतर जोडप्यांच्या नातेसंबंधांमध्ये समस्या निर्माण होत असलेल्या पाहता येतात. याच काळात अनेक सवयी बदलतात आणि बरेच वादही होतात. बाळ झाल्यानंतर पतीशी भांडणे होण्याचे कारण किंवा दोघांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची काही कारणे पाहूया.

१. पालकत्वाचे भिन्न कल्पना

 बाळासाठी कोणते डायपर किंवा लंगोट वापरायचे हा देखील वादाचा मुद्दा असू शकतो. आपल्याला वापरून फेकून देण्याचे डायपर तर जोडीदाराला कापडाचे लंगोट हवे असतील. मतभिन्नतेच्या युद्धाची ही सुरुवात असू शकते. सुरुवातीला अगदी लहान लहान गोष्टींवरून मतांतरे होतात पण जसा काळ पुढे जातो मतांतरे कायम राहतात तसा लग्नावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

उपाय- उत्तम पालक एकमताने निर्णय घेतात. कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांशी बोला.

२. आस्थेची कमतरता

बाळ जेव्हा घरी येते तेव्हा आपल्या जोडीदाराचे किंवा पतीचे वर्तन पाहून बहुतेकदा आया वैतागतात. जोडीदार किंवा पती त्याच्या जबाबदाèयांना पुरेसा न्याय देत नसल्याचे त्यांना वाटते. बाळ घरी आल्यानंतर जोडीदार किंवा पती नुसताच भटकतोय किंवा नुसताच बसून राहिला आहे हे पाहून चिडचिड नक्कीच होते दुसरीकडे आई मात्र बाळाच्या सर्वच जबाबदाऱ्या नेटाने पार पाडते आहे.

उपाय- जोडीदारावर कोणत्याही गोष्टीसाठी  ओरडू नका कारण त्यामुळे अधिक भांडणे होतील. पतीला बाळाचे डायपर बदलणे, त्याला पावडर लावणे आणि बाळाला झोपवणे अशा काही गोष्टी शिकवा

३ लैंगिक आयुष्याला विराम

आत्ताच्या परिस्थितीत लैंगिक संबंध किंवा समागमाची इच्छा हा विचारही मनात डोकावत नसेल. प्रसुतिनंतर ६-८ आठवड्यात लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यास काही अडचण नाही पण बहुतांश जोडपे आणखी काही महिने संबंध ठेवत नाही. काही वेळा जवळीकी अभावी किंवा शस्त्रक्रियेनंतर आपला जोडीदार आपल्यावर प्रेम करत नाही असाही विचार मनात येऊ शकतो.

उपाय- आपला जोडीदार आपल्यावर खूप प्रेम करतो आणि त्यांच्या साठी आपल्यावरील प्रेम हा त्याचा सन्मान आहे. आपल्या दोषांवरही तो तसेच प्रेम करत असतो आणि शेवटी आपण त्याच्या बाळाची आई असतो. त्यांना आपण दुखावले जाण्याची भीती सतावत असेल. त्यांना थोडा वेळ द्या जेणेकरून गोष्टी पुन्हा एकदा योग्य प्रकारे होतील.

४. झोपेची कमतरता

आपल्याला पुरेशी झोप आणि आराम मिळाला नाही तर वैतागणारच ना शेवटी आपणही माणूस आहोत. लहान बाळाकडे लक्ष देण्याची जास्त गरज असते आणि त्यामुळे आईची रात्रीची झोप अपुरी होते त्यामुळे खूप त्रासाला सामोरे जावे लागते.

उपाय- यासाठी सुयोग्य किंवा एकदम तंतोतंत लागू पडणारा कोणताही उपाय नाही. आपल्याला जोडीदाराबरोबर झोपेच्या वेळा ठरवून घ्या. बाळाला दूध देण्याव्यतिरिक्त सांभाळण्यासाठी आलटून पालटून तयारी ठेवा. असे केल्यास कदाचित दोघांच्या नात्यालाही अधिक बळकटी येईल.

सर्वात शेवटे पण महत्त्वाचे

५. स्वीकार करणे

बाळ झाल्यानंतरही आमचे लग्न कसे पुर्वीसारखेच उत्तम चालले आहे असे कोणीही सांगत असेल तर ते साफ खोटे आहे असे समजा. बाळ झाल्यानंतर प्रत्येक जोडीला उतरणीचा काळ पहावा लागतो. बायको ते अनंत जबाबदाऱ्या पेलणारी आई हे एक आव्हानच असते या प्रवाहाहबरोबर बदल स्वीकारण्यासाठी आपल्याला वेळ हा लागणारच. या सर्वांच्या दरम्यान आपण कोलमडून पडू आणि मनोवस्था घडी घडी बदलू शकतो ज्यामुळे लग्नातही वादळे निर्माण करण्याची शक्ती असते.

उपाय- बाळाच्या आगमनानंतरचे नवे आयुष्य आणि दिनक्र अंगवळणी पडण्यासाठी काही काळ नक्कीच लागेल. पण हे सर्व शांत करणे किंवा हाताळणे आणि आपल्या मनोवस्थेतील बदल नियंत्रित क़रणे आपल्या हातात असते. आपला संयम परत मिळवण्याचा प्रयत्न करा, तो टिकू द्या. घाई करु नका. एकमेकांच्यातील वादविवाद आणि नकारात्मकता असूनही आपल्या मनात, हृदयात पुन्हा एकदा प्रेम बहरल्याची जाणीव होईल. आपल्या पतीबरोबरचे नाते टिकवण्यासाठी आपले बाळच मदत करेल. सरतेशेवटी बाळाला आनंदी बघणे हेच नवरा बायको असलेल्या आईवडिलांचे अंतिम ध्येय असते नाही का.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon