Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

जाणून घ्या प्रसूतीनंतर लगेच समागमबाबत होणारे बदल

मग, आता तुम्हाला बाळ झाले आहे आणि त्यामुळे तुमच्या विश्वात आनंदीआनंद भरलेला असेल! आणि त्यामुळे तुम्ही लगेचच येणाऱ्या काळामध्ये काय काय करायचे आणि कसे करायचे याचे नियोजनही करणे चालू केले असेल. आणि जरी तुमचे तान्हुले हे तुम्हाला तुमचा दैनंदिन नित्यक्रम पार पाडण्यात अडथळा निर्माण करत असेलही; पण खात्री बाळगा की, हळूहळू त्यांनाही तुमच्या नित्यक्रमाची सवय होऊन जाईल. तसेच जरी तुम्ही तुमच्या बाळाबरोबरच अतिशय व्यस्त असला, तरी तुमच्या पतीसाठीदेखील तुमचा वेळ देणे महत्त्वाचे आहेच; विशेषतः तुमच्या समागमासाठी! पण तुम्हाला अगोदरच्या आणि आताच्या संभोगामध्ये थोडा वेगळेपणा आणि फरक जाणवू शकतो. तुमची याबाबत तयारी असावी, म्हणून आम्ही बाळ झाल्यानंतरच्या संभोगाबाबतची काही तथ्यांची यादी तयार केलेली आहे; जी तुम्हाला माहित असायला हवी:

१. पहिल्यांदा ते अगोदर सारखे छान वाटणार नाही

जरी तुमच्या बाळाच्या प्रसूतीवेळी तुमच्या लैंगिक आणि अंतर्गत भागांना इजा झालेली नसली; तरी प्रसूतीनंतरच्या हार्मोन्समुळे तुम्हाला खाली त्रास जाणवू शकतो. आणि त्यामुळेच तुम्हाला तुमच्या योनीत जळजळ झाल्यासारखे वा पूर्णपणे वेगळीच भावना असल्यासारखे वाटू शकते. पण काळजी करू नका; अशी भावना हळूहळू विरून जाईल आणि तुम्हाला चांगले वाटू लागेल. आणि मातांनो; संभोगाचा आनंद घ्यायला विसरू नका, अनेक महिन्यांनंतर तुम्ही याचा आनंद घेण्यास खरोखर पात्र आहात!

२. तुम्हाला निश्चितच आणखी संभोगाची कामना होईल

जसे तुम्हाला दररोज झोपायची इच्छा होते आणि नेहमी मैत्रिणींबरोबर बाहेर फिरायची इच्छा होते आणि आणखी एकदा बाळाला जन्म द्यायची इच्छा होते; तसेच तुम्हाला आणखी समागम करण्याचीही इच्छा होतेच! ती एक मानवी प्रवृत्ती आणि एक तीव्र कामना आहे. म्हणून, तुम्हाला भरपूर वेळा संभोगाची इच्छा होत असेल; तर त्यात काही वावगे नाही. एकमेकांशी मनमोकळेपणे बोला आणि लक्षात ठेवा की, कधीकधी संभोगावेळी तुमचा मूड चांगला नसूही शकतो; पण तो केल्याचे समाधान त्यानंतर तुम्हाला नक्कीच लाभेल!

३. दुपारच्या वेळेचा वापर करा

तुमच्या लहान बाळामागे दिवसभर पळणे, त्याची पूर्णपणे काळजी घेणे आणि त्या सर्वांची भरपाई झोपेमध्ये भरून काढणे- या सर्वांचे अर्थातच स्वतःचे परिणाम असतात; ज्यामुळे रात्रीपर्यंत तुम्हाला भरपूर थकवा येतो आणि तेव्हा संभोग शक्य होत नाही. आणि म्हणूनच, त्यासाठी दुपारीसारख्या वेगवेगळ्या वेळा शोधा आणि तुमची कामप्रेरणा तृप्त करा.

४.  लवकरात लवकर संभोग करणे ही तुमची आवडती गोष्ट बनवा

तुम्ही घरामध्ये सगळीकडे आणि कुठेही असला तरी त्याचा बाऊ करू नका. यामुळे तुम्हाला आजूबाजूच्या देखाव्यातील बदल तर मिळेलच; पण तुमच्या लग्नातील गोडवाही टिकवून ठेवेल. तसेच, तुम्हाला तो मूड आणण्यासाठी ती सर्व तयारी करायलाच हवी, असे नाही. फक्त आहे तसेच सामोरे जा, संभोग करा आणि तुमच्या बाळाची काळजी घ्यायला जा; कारण त्यांना या वेळी तुमच्या ध्यानाची सर्वाधिक गरज असते.

५. तुम्हाला त्याची इच्छाच होत नसेल आणि त्यामागे एक कारण आहे!

झोपेची कमतरता, तुम्ही आणि तुमच्या पतीमधील नात्यामध्ये होणारा बदल आणि तुमचा स्वतःच्या शरीराबाबतचा न्यूनगंड (कारण तुम्हाला कळून चुकलेले असते की, तुमचे स्थूल पोट स्वतःहूनच सपाट होणार नाही) या सर्वांमुळे तुम्हाला 'तो' मूड येत नाही. जर तुम्ही स्तनपान करत असाल, तर तुमची मातेची भूमिकासुद्धा संभोगाच्या आड येते. स्तनपानावेळी निर्माण होणारे 'ऑक्सिटोसिन' हे चांगल्या हार्मोन्सना मुक्त करते; पण तसेच ते तुमच्या कामप्रेरणेलाही लगाम घालते. पण थोडा संयम ठेवा आणि आशा सोडू नका. वेगवेगळ्या गोष्टी आजमावून पाहा आणि तुम्हाला निश्चितच पुन्हा सुख प्राप्त होईल.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon