बाळ झाल्यानंतर सासरी या ६ गोष्टीबाबत तुम्हांला तडजोड करवी लागते
आईपण म्हणजे एका स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचा काळ ! सगळे कसे अगदी परफेक्ट असते! तुमचे बाळ अगदी निरोगी आणि गुटगुटीत असते, तुमच्या पतीमध्ये आणि तुमच्यात या नवीन पालकत्वामुळे बदल झालेला असतो आणि सगळेजण तुमची आणि बाळाची काळजी घेत असतात. सगळे छान चालले असतांना मात्र एक गोष्ट तुम्हाला खटकते ती म्हणजे तुमच्या सासूचे तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे असणारा नकारात्मक दृष्टीकोन. “बेटा, हे असे नसते करायचे.!” “बेटा, यासाठी हे नाही वापरायचे!” किंवा “मी हे असे नव्हते केले, माझी पद्धत वेगळी आहे” तर कधी कधी “ तु तुझ्या नणंदेकडून जरा शिक, ती किती उत्तम आई आहे बघ!” हे सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळते.
बस्स झालं! या गोष्टीचा तुम्हाला किती त्रास होतोय हे तुम्हालाच माहित असते. अशाच कितीतरी गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावे लागते जेंव्हा तुम्ही तुमच्या सासू सोबत राहता.
१. तुमच्यातले मतभेद.
त्यांचे वय जास्त आहे आणि अर्थातच त्या अनुभवी आणि मोठ्या आहेत. त्याबद्दल तुम्ही त्यांच्या मतांचा आदर देखील करता पण सतत तुमच्या प्रत्येक गोष्टींना नाही म्हणणे आणि तुमच्या पद्धतींची तक्रार करणे तुम्हालापण वैताग आणते. तुमची इतरांशी तुलना करणे आणि तुम्हाला सल्ले देऊन तुमच्या चुका काढणे पाहून तुम्हालाच यापासून दूर जावेसे वाटते.
२. त्यांचा हस्तक्षेप.
हे तुमचे पहिलेच मुल आहे त्यामुळे सासरची मंडळी त्यात नाक खुपसणार हे ठरलेलेच आहे. त्यांच्यामते अनुभवच एखादीला उत्तम आई बनवू शकते. बरोबर! म्हणजे तुमचे हे पहिलेच बाळंतपण आहे याचा अर्थ तुमच्याकडून चुका या होणारच आहेत. पण आपण चुकांमधूनच शिकतो ना. सगळ्या गोष्टी त्यांच्याच पद्धतीने आणि त्यांच्या हस्तक्षेपाने झाल्या तर यातून परिस्थिती अजून वाईटच होणार आहे कारण अर्थातच तुमचे मुल कसे वाढवायचे हा तुमचा निर्णय आहे आणि तुमच्या मनात त्याविषयी आधीच काही प्लान्स असतात. यावर उपाय म्हणून आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही सरळ बसून चर्चा करा. त्यांना समजावून सांगा की त्यांच्याकडून येणारे सल्ले आणि मदत याबद्दल तुम्हाला आनंद आहेच पण तुम्हाला एखादी गोष्ट जमणार नाही किंवा गरज वाटेल तेंव्हा तुम्ही स्वत:हून त्यांना विचारून घ्याल. यातून तुम्हाला नक्की जे म्हणायचं आहे त्याचा सरळ आणि स्पष्ट संदेश त्यांच्यापर्यंत जाईल.
३. कुटुंबाच्या पद्धती.
प्रत्येक कुटुंब आणि परिवार यांच्या वेगवेगळ्या पद्धती आणि नियम असतात. सगळ्यांचेच संस्कार आणि स्वातंत्र्य समान असेल असे नाही. ज्या वातावरणात तुम्ही वाढले असाल त्याचं पद्धतीने तुमच्या पतीचेही लहानपणापासून संगोपन झाले असेल असे नाही. आता ह्यात मतभेदाचा प्रश्नच नाहीये पण यातून गैरसमज मात्र होऊ शकतात. जसे की, तुम्हाला कदाचित लहानपणापासून घरात अनेक नातेवाईक , आत्या, काका ह्यांना बघायची सवय नसेल किंवा तुमच्या कुटुंबाचे तसे संबंध नसतील. पण जर इथे सगळीकडे हेच लोकं स्वतःचेच घर असल्यासारखे तुमच्या घरी ये-जा करत असतील तर तुम्हाला प्रोब्लेम होणारच आहे. त्यांच्याकडून अपेक्षा असतात की तुम्ही त्यांना बोलवावे आणि त्याच्याकडून सल्ले घ्यावेत. तुम्ही असे न केल्याने तुमच्याबद्दल गैरसमज उदभवू शकतात.
४. तुम्ही Vs बाकीचे
ही गोष्ट तर आपण सगळेच आयुष्यात कधीना कधी अनुभवतो. तुमचा नवरा तुमच्या बाजूने बोलायचे सोडून सर्वाधिक गोष्टींच्या बाबतीत सासरकड्च्यांचीच बाजू घेतांना दिसतो. सासुबाईंचे बोलणे अशा काही गोष्टींमध्ये तुमच्या नवर्याला जास्त पटते. शेवटी मुले आपल्या आईचेच ऐकतात तेंव्हा याबाबतीत तुम्ही खास असे काही करू शकणार नाही आहात हे लक्षात घ्या. त्यांच्यासाठी त्यांची आईच सर्वकाही असते , तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरीही त्यांच्या मते आईसारखे काम तुम्हाला कधीच जमणार नाही. यासाठी कधी कधी काही गोष्टींच्या बाबतीत तुमची तुमच्या नवऱ्याकडून तुमच्या सासुबाईंशी तुलना देखील होऊ शकते! पण यातून तुम्हाला येणारा राग काहीच कामाचा नाही. त्यापेक्षा ही गोष्ट समजुतदारपणे घेऊन तुमचं मन शांत ठेवा.
५. एकांत
सासरी नातेवाईकांचे सतत आजूबाजूला असणे तुमच्या खाजगी जीवनात व्यत्यय अनु शकते. म्हणजे आता तुम्ही आई झाला आहात आणि त्यात लोकांचे बाळामुळे भेटणे, बोलणे जास्त वाढलेले असते. यात तुम्हाला आणि तुमच्या पतीला एकमेकांसाठी काही खाजगी वेळ मिळणे जरा अवघडच होऊन बसते. तुम्हाला क्वचितच एकमेकांशी बोलण्यासाठी एकांत भेटत असतो आणि त्यातही सासूबाई, नणंद, दीर, आजी-आजोबा आणि इतर नातेवाईक यांची गर्दी तुम्हाला एकांत मिळू देत नाही. बाळासोबत तुम्ही दोघांनी काही काळ घालवावा असं तुम्हाला खूप वाटत असत पण आता ह्याबाबतीत तुम्हाला समजून घेण्याऐवजी दुसरा उपाय नसतो. नातेवाईक त्यांचे आशीर्वाद देण्यासाठीच इथे असतात आणि त्यांच्या आपल्यासाठी असणाऱ्या भावना ह्या सकारात्मकच असतात, त्यामुळे ह्या परिस्थितीत हवा तसा वेळ काढणे सोडून तुमच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही.
६. सततची तुलना
तुम्हाला जर एक बाळंतपण झालेली नणंद असेल तर आमच्या शुभेच्छा आधीच तुमच्यासोबत असू देत. तुमच्या सासरी तुमची तुलना या नंदेशी सतत होणार आहे. तुमची नणंद कशी उत्तम आई आहे आणि तिने तिच्या बाळंतपणात कशी काळजी घेतली आणि तिचे मुलं कसे सुदृढ आहेत याचेच उदाहरण तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आहेत. तिने काय काय आणि कसे केले होते याची माहिती तुम्हाला तिच्याकडून घेण्याचे सल्ले मिळणार आहेत आणि प्रत्येक छोट्या गोष्टीत तुम्ही तिचे मत विचारावे अशी अपेक्षा तुमच्याकडून केली जाणार. कारण त्यांच्यासाठी तुम्ही पहिल्यांदाच आई झालेली आणि त्यामुळे गोंधळलेली आई आहात आणि तुमची नणंद ही अनुभवी स्त्री आहे, त्यामुळे तिच्या सल्ल्याने तुम्हाला वागवेच लागेल. पण तुमच्या मर्जीने गोष्टी करण्यासाठी अजिबात खचू नका, तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तुमच्या मनाजोगत्या होऊ देत. जिथे पटले नाही तिथे स्पष्टपणे बोलून दाखवा. शेवटी हे मुल तुमचे आहे आणि त्याच्याबाबतीत सगळे निर्णय घ्यायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे.
