Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

बाळ पोटात असताना शी करते का ?

बाळाचा जन्म हा सगळ्याच मातांसाठी एक मोठी परीक्षा असते, ज्यात त्यांना खूप ताण तणावाला सामोरे जावे लागते आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या आनंदासाठी. जर का महिलांना पर्याय दिला तर त्या गर्भवतीच राहणे पसंत करतील कारण बाळाच्या जन्माच्या वेळेला होणाऱ्या त्रासा पेक्षा ते हाताळणे सोप्पे आहे. पण आपले बाळ आपल्या आयुष्यात येणे आणि त्याला आपल्या उराशी घेण्यासारखा दुसरा आनंद नाही.

खरं सांगायचं तर, या जगात बाळांची एक गूढ उपस्थिती असते. ते सदैव आपल्या बरोबर असतात पण त्यांचे अस्तित्व ते जन्माला आल्याशिवाय कळत नाही! ते त्यांच्या आईच्या पोटात असल्यापासूनच त्यांना सभोवतालचा शोध घ्यायला आवडते. ते पोटात असताना बऱ्याच गोष्टी करत असतात जसे की लाथा झाडणे, वळवळ करणे, झोपणे.

शेवटी, जेव्हा ते चिमुकले या जगात येण्यासाठी सज्ज असते, तेव्हा त्या माता एकतर नैसर्गिक प्रसूतीसाठी जातात किंवा सिझेरियनसाठी. पण एका स्त्रीला तिच्या डॉक्टरांनी सिझेरियनच करा असा सल्ला दिला. याच कारण खूपच धक्कादायक होते - त्या बाळानी पोटात शी केली होती!!!

हे असे ऐकणे इतके दुर्मिळ आणि अनपेक्षित असे काहीतरी आहे, हो की नाही आयांनो? तुम्हाला खरंच असे वाटते का की बाळ पोटात शी करते? तुम्हाला असे वाटते की, तुमचे बाळ असे काही तरी करू शकेल म्हणून? यातील खरे काय आणि बाळ पहिल्यांदा कधी शी करते हे जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे नक्की वाचा.

मी गर्भवती असताना माझे बाळ माझ्या पोटात शू करू शकते का?

वास्तविकपणे सांगायचं तर, गर्भाशयात असताना बाळांना त्यांची पोषक तत्वे आणि ऑक्सिजन नाळेद्वारे मिळत असते. अभ्यासांनुसार, जन्मला न आलेलं बाळ दहा आठवड्यांच्या पेक्षा मोठे झाले की, ते मूत्रविसर्जन करू शकते. बाळ गर्भधारणेच्या वेळी पुष्कळ द्रवपदार्थ पीत असते आणि म्हणून मूत्रविसर्जन करू शकते.

यामुळे, आई काय खाते याची ते फक्त चवंच नाही घेत तर त्यातून त्यांना पोषण मिळते. त्यामुळे ते पोटात असताना मूत्रविसर्जन करते. तथापि, बाळानी पोटात असताना त्याचेच मूत्र गिळले असू शकते. पण मूत्र निर्जंतुक असल्यामुळे त्याचा त्यांना काही धोका नसतो.

माझे बाळ पोटात शी करू शकते का?

आता जेव्हा बाळ पोटात असताना आपल्याला त्यांची शु करण्याच्या सवयींबद्दल कळले आहे, तसेच शी करणे म्हणजे देखील नको असलेली घाण शरीरातून बाहेर काढून टाकणेच आहे ना. या नको असलेल्या पदार्थांना नाळ ९९% स्वच्छ करते आणि ते आईकडे पाठवते जे पुढे त्यांच्या मल-मूत्राद्वारे शरीरातून बाहेर टाकले जाते. हे सर्व खरं असलं तरी, बाळानी आतड्यासंबंधीच्या पेशी, लॅनुगो (नवजात अर्भकाच्या अंगावरील नाजूक लव), पित्त रस, श्लेष्मा आणि अशा इतर गोष्टी गिळलेल्या असू शकतात, आणि हे सगळे त्यांच्या छोट्या आतड्यात साठून राहिलेले असू शकते.

हे असे सगळे बाळाच्या पोटात साठलेले पदार्थ गडद हिरव्या रंगाचे होते आणि याला "मेकोनिअम" म्हणतात. तांत्रिकदृष्टया, यालाच नवजात बाळाने जन्मल्यानंतर केलेल पहिले मलविसर्जन असे म्हणतात. साधारणपणे बाळ जन्मल्यानंतर एक ते दोन दिवसांनी पहिल्यांदा शी करतात, परंतु कधी कधी तणावामुळे, ते आईच्या पोटात देखील शी करू शकतात!!!

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon