Link copied!
Sign in / Sign up
19
Shares

बाळ पोटात असताना जर पायाळू असेल तर या तीन गोष्टी करा.

आई होणार असल्याचे कळताच तो आनंद शब्दांपलीकडचा असतो आणि दिवसेंदिवस वाढणारे पोट पाहणे हा त्याच आनंदाचा सर्वात मोठा भाग असतो कारण तुम्हाला माहित असते कि तुम्ही लवकरच आई होणार आहात.गर्भात वाढवणाऱ्या बाळाला सहजपणे सामावून घेण्यासाठी तुमच्या पोटाचा आकार वाढत असतो. कधी कधी बाळ गर्भात अयोग्य स्थितीमध्ये असण्याची काहीशी शक्यता असते आणि यामुळे  प्रसूतीदरम्यान गुंतागुंतीची परिसस्थिती उदभवू शकते. तुमच्या गर्भावस्थेच्या शेवटच्या अवस्थेत बाळाच्या गर्भातील स्थितीचे परीक्षण डॉक्टर करतात आणि प्रसूतीसाठी योग्य असणारी पद्धत ठरवतात. 

सामान्यतः बाळाचे डोके जननमार्गाशी असायला हवे. पण काही मुले पाय किंवा पार्श्वभाग खालच्या दिशेने अशा स्थितीत गर्भात असतात. जेव्हा बाळाच्या डोक्याऐवजी पाय जननमार्गाच्या नजीक असतात तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते आणि अश्यावेळी योनिमार्गाद्वारे प्रसूती झाल्यास जास्त समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

कोणतीही समस्या असली तरीही बाळाच्या जन्माचा आनंद घेण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.जर तुमच्या बाळाचा जन्म पायाच्या दिशेने होण्याची शक्यता असेल तर बाळाची स्थिती सामान्य म्हणजेच डोक्याच्या दिशेने होण्यासाठी काय करता येऊ शकते पाहूया:

१. डॉक्टरांना भेटा

बाळाची गर्भातील स्थिती नेमकी कशी आहे हे गर्भावस्थेच्या ३७ व्या आठवड्यात डॉक्टर सांगू शकतात.बाळाचे पाय खालच्या दिशेने असतील तर, जर शक्य असल्यास डॉक्टर बाळ नसर्गिक स्थितीत येण्यासाठी काही उपाय सांगतात अथवा प्रसूती कशी करावी लागेल याचा अंदाज देतात. 

२. चालणे हा सर्वोत्तम व्यायाम

जेव्हा तुम्ही हालचाल करता,तेव्हा तुमचे बाळही हालचाल करते. लांब अंतरावर चालणे आणि स्ट्रेचिंग करणे उत्तम असते.या व्यायामाचा चांगला परिणाम तुमच्या बाळावरही होतो आणि यामुळे गर्भाशय आणि ओटीपोटीच्या आसपासचे स्नायू सैलावतात. व्यायामामुळे तुमच्या गर्भातील जागा मोकळी होते आणि बाळाला हालचाल करणे सुलभ होते आणि बाळ डोक्याचे दिशेने खालच्या दिशेने सरकायला मदत मिळते.

३. प्रसूतीसाठी स्वतःला तयार करा

बाळाचे पाय खालच्या दिशेने असतील तर यामुळे आईच्या माकडहाडावर ताण येऊन त्रास व्हायला लागतो.प्रसूतीसाठी तुम्ही स्वतःला एका मोठ्या बॉलच्या सहाय्य्यने तयार करू शकता. या बॉलवर हात आणि गुडघ्यांच्या सहाय्याने बसून पार्शवभागाच्या उलट दिशेत ताण निर्माण करण्याचा प्रयत्न करा.याने तुमच्या वेदना कमी होण्यास मदत मिळेल आणि प्रसूती सुलभ होईल.

बॉलच्या साह्याने व्यायाम करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, आणि हा व्यायाम प्रशिक्षित व्यक्तीच्या देखरेखी खाली करणे आवश्यक आहे. अन्यथा मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon