Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

बाळ मोठे झाल्यावर या पाच गोष्टींपासून सुटका मिळते.

घरात बाळ असले की आयुष्य मजेशीर होते पण प्रामाणिकपणे सांगायचे तर आयुष्य एकदम कठीण आणि दमवणारे असते. बाळ मोठे होईल आणि आपण आरामात बाळाच्या मजेशीर गोष्टींचा आनंद घेऊ शकू याची वाट आपण नाही पाहू शकत त्याऐवजी संपूर्ण दिवस बाळामागे धावत पळत आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास काळजी घ्यावी लागते. पालकत्वाच्या दृष्टीने मोठी झालेली बाळे त्यांची काही आव्हाने घेऊन येत असतात. मात्र जेव्हा ती अगदी छोटी बाळे असतात त्या तुलनेत मोठेपणीची आव्हानांना सामोरे जाणे तुलनात्मक दृष्ट्या सोपे असते कारण बाळ मोठे झाल्याने कोणत्याही शारिरीक श्रम किंवा मानसिक आघातापासून आपला बचाव होतो. बाळ मोठे झाल्यावर आपल्याला कोणत्या गोष्टी कराव्या लागत नाही आणि त्यामुळे आपले आयुष्य सुकर होते त्या पाहूया.

१. लंगोट आणि कपडे बदलणे

 

लहान बाळे आपल्याला न सांगता कोणत्याही शू, शी आणि उलटी करतात. अचानक उद्भवणाऱ्या या परीक्षेच्या प्रसंगातून आपण स्वतःला वाचवू शकत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा आपला ड्रेस किंवा नवा शर्ट खराब होतो. काही वेळा ह्या गोष्टी किंवा हे प्रसंग सणसमारंभाला किंवा पार्टीला जाण्यासाठी आवरुन तयार असताना गडबडीच्या किंवा घाईच्या वेळी किंवा आपले बाळ दुसऱ्या कोणी घेतलेले असतानाच घडतात. त्यामुळे जेव्हाही बाळ शू करते, शी करते तेव्हा लंगोट किंवा डायपर बदलण्याचे काम हे नक्कीच कंटाळवाणे असते. बाळ जेव्हा मोठे होते तेव्हा शू किंवा शी करण्यासाठी शौचालयाचा वापर करण्यास शिकवू शकता. त्यांच्याबरोबर तिथे जावे लागते पण पेहराव आणि आपली मनस्थिती बिघडण्यापेक्षा नक्कीच चांगले आहे.

२. रात्री उठणे

मुलांच्या झोपेचे वेळापत्रक कधी पक्के नसते. बाळे दिवसभर झोपतात आणि मध्यरात्री गाढ झोपेच्या काळातच मोठ्याने रडत उठतात. झोपेचे एक निश्चित वेळापत्रक पाळण्याइतपत बाळ मोठे झाल्याशिवाय पालकांना व्यवस्थित झोप मिळत नाहीच. आपल्याला शांतपणे काही तासांची झोप घेता यावी म्हणून आपण बाळांना झोपवण्याचा खूप प्रयत्न करतो मात्र त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण बाळ अगदी पुढच्याच क्षणी उठून त्यांना घेण्यासाठी रडून गोंधळ घालतात. जेव्हा बाळ झोपते तेव्हाच काही तासांची झोप आपण मिळवू शकतो. बाळ मोठे झाल्यावर त्यांच्या झोपेचे एक वेळापत्रक तयार होते आणि मग मुले एकाच वेळी भरपूर झोप काढतात. त्यामुळे पालक म्हणून आपले आ़युष्य थोडे आरामाचे होते आणि त्यामुळे झोपेअभावी येणारी अस्वस्थतेपासून बचाव होतो.

३. कडेवर घेणे

लहान बाळांना कुठेही घेऊन जाताना कडेवर घेऊन जावे लागते पण काही वेळा मात्र बाळांना दिवसभर घेऊन घेऊन पालकांचे हात दुखतात आणि त्यांनाही थोड्या आरामाची जरुरी असते. एकदा बाळ चालू लागले की त्यांना सतत खाली उतरायचे असते कारण त्यांना इकडे तिकडे धावता येते. मग मुलांना जोवर ते धावून पळून दमत नाहीत तोपर्र्यंत त्यांना कडेवर घ्यावे असे वाटत नाही. अर्थात मुलांना सतत उचलून न घ्यावे लागणे हे नक्कीच आरामदायी असते मात्र त्यांना कडेवर आपल्या जवळ घेणे कमी झाल्याने किंवा बंद झाल्याने आपल्याला चुकल्या चुकल्या सारखे वाटते.

४. पार्टी आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये गैरहजेरी 

बाळ लहान असते तेव्हा त्यांच्याकडे आपले संपूर्ण लक्ष असणे अपेक्षित असते. हरेक गोष्टींसाठी ते पालकांवर अवलंबून असतात आणि म्हणूनच आपल्यापासून एक क्षणही वेगळे झालेले बाळ सहन करू शकत नाही. त्यामुळे सामाजिक कार्यक्रमात आणि वैयक्तिक कार्यक्रमात, पार्टी मध्ये सहभागी होणेही अवघड असते. कुणासाठी तरी विचार न करता आपण आलेली आमंत्रणे स्वीकारत नाही. मुले मोठी झाल्यावर आपण सामाजिक कर्तव्य निभावण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा ती दाईकडे किंवा डेकेअर मध्ये राहू शकतात. अर्थात मुले मोठी झाल्यावर आपल्याला आठवेल की ती लहान होती तेव्हा मुलासंदर्भातील कारण सांगून पार्टी किंवा समारंभातून लवकर बाहेर पडत असू.

५. मुलांच्या प्रत्येक पायरीचे निरीक्षण करा

लहान बाळांना आपल्यासाठी चांगले काय आणि वाईट काय हे माहित नसते. ज्या ठिकाणी त्यांना पोहोचणे अवघड आहे आणि धोक्याच्या जागी ते अगदी रांगत रांगत पोहोचतात आणि काय हाती पडेल ती वस्तू तोंडात घालतात. आपल्याला कायमच सतर्क रहावे लागते आणि बाळ काय करते आहे त्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे जेणकरून ते कोणत्याही संकटात सापडणार तर नाहीत. मुले मोठी झाल्यावर त्यांच्यात धोके आणि मर्यादा यांची जाणीव निर्माण होते. तरीही अधूनमधून त्यांच्याकडे लक्ष ठेवावे लागते पण काही मर्यादेत मुलांना स्वातंत्र्यही दिले जाऊ शकते. यामुळे आपला वेळ थोडा वाचतो आणि मुलांना स्वतःचे चांगले वाईट शिकण्याची संधीही प्राप्त होते.

या गोष्टींपासून तुमची सुटका झाली असली तरी तुमचे मूल मोठे झाल्यावर तुम्ही बाळाचे ते निरागस लहानपण खूप मिस कराल 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon