Link copied!
Sign in / Sign up
36
Shares

नॉर्मल प्रसूतीमध्ये बाळाचा जन्म असा होतो


कालच्या लेखात तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीविषयी सांगितले. आणि नैसर्गिक प्रसूती कशा पद्दतीने करता येईल हेही त्या लेखात सांगितले. तेव्हा आजच्या लेखात बाळाचा जन्म कसा होतो त्याविषयी खाली दिलेल्या लेखातून सांगणार आहोत. आणि बाळ नैसर्गिक प्रसूतीच्या बाहेर कसा येतो ते ह्या लेखातून कळायला सोपे होईल.

 

 

निसर्ग कोणत्याच मातेच्या बाबतीत भेदभाव करत नसतो. अमुक मातेची डिलिव्हरी झाली पण तमुक मातेची डिलिव्हरी सिझेरियन झाली. खरं म्हणजे निसर्ग हा खूपदा मातेला मदतच करत असतो, की तिला कोणताच त्रास होणार नाही. 

पण तुम्ही जर गरोदरपणात व्यवस्थित काळजी घेतली नाही तर नंतर प्रसूती सिझेरियन करावी लागते किंवा प्रसूतीच्या वेळी काही समस्या तयार होतात. काही डॉक्टर प्रसूती नॉर्मल होणारी असते तिला सिझेरीयन करून टाकतात. तेव्हा घाबरू नका निसर्ग तुमच्या पाठीशी आहे.

बाळाचे पूर्ण अंग विकसित झालेले असतात. आणि बाळाचीही पूर्ण तयारी असते ज्या मातेने त्याला पोटात वाढवलेले असते.

१) बाळाचे रक्षाकवच

नैसर्गिक प्रसूतीमध्ये बाळाला बॅक्टरीयाचे एक कवच मिळते. आणि हे सुरक्षाकवच त्यांना डिलिव्हरीच्या वेळी मिळत असते. आणि ह्या कवचाचा त्यांना खूप फायदा होत असतो. आणि त्यामुळे त्यांची प्रकृती बऱ्याच अंशी ठणठणीत राहते.

२) बाळाला श्वास घ्यायला त्रास होत नसतो

नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी बाळाच्या गळ्यावर काही प्रमाणात दबाव पडत असतो. आणि त्या दबावाने ऍम्नीऑटिक फ्लुइड नावाचे रसायन तयार होत असते. आणि ते रसायन बाळाचे फुफ्फुस श्वास घ्यायला तयार करत असते. आणि त्याचबरोबर हे रसायन ज्याही प्रकारे बाळाला श्वास घ्यायला अडचण येत असते त्याला अटकाव करून बाळ श्वास नैसर्गिक घेतो.

 

   ३) बाळ वेळेवर स्तनपान करायला लागतो

हो ही गोष्ट खरी आहे की, नैसर्गिक प्रसूतीनंतर आई लवकरच बाळाला स्तनपान करू शकते. कारण असे मानले जाते की, जन्माच्या काही तासांमध्ये बाळाची दूध (स्तनपान) पिण्याची शक्ती खूपच कमी असते.

आम्ही आईच्या आणि बाळाच्या काळजीसाठी तत्पर आहोत. तुमच्या प्रसूतीतज्ज्ञांना नैसर्गिक (नॉर्मल) प्रसूती विषयी सांगा. बऱ्याचदा डॉक्टरच सिझेरियन प्रसूतीच्या घाट घालतात. त्यासाठी तुम्ही स्वतः या विषयी सर्व प्रकारचे ज्ञान घेणे आवश्यक आहे. आणि आमचाही तुम्हाला शिक्षित करण्याचा प्रयत्न आहे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon