Link copied!
Sign in / Sign up
55
Shares

ही लक्षणे आलीच तर समजून घ्यावे, बाळ खाली सरकत आहे


         आईला कळा सुरु होणे हे सामान्यतः गर्भात बाळाच्या खाली सरकण्याचे लक्षण मानले जाते. बाळ प्रसूतीसाठी तयार असते म्हणून खाली सरकते आणि यावेळी तुम्हाला खूप सुखद अनुभव येईल. बाळ खाली सरकल्यामुळे तुम्हाला श्वास पुरेल आणि हलके देखील वाटेल. पोटाचा घेर, जो आधी वरती होता तो धडाच्या खूप खाली जाईल. बाळ खाली सरकल्यामुळे तुमच्या पोटाच्या खालचा भाग मोठा दिसेल आणि त्यामुळे प्रसुतीत मदत होईल.

इथे आम्ही तुमच्या बाळाचा खालच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे याची ५ लक्षणे दिली आहेत.

१) पेल्व्हीस वरील दाब

जसे जसे बाळ खाली सरकते तसे तुम्हाला तुमच्या खालच्या बाजूस म्हणजे उटीपोटावर दाब आल्याचे जाणवेल. बाळाच्या खाली सरकण्यामुळे हा दाब वाढेल आणि तुम्हाला हे थोडे असहज वाटू शकते. कूस बदलतांना किंवा हालचाल करतांना तर अजुनच त्रास होईल. जश्या कळा येऊ लागतील तुम्ही वेदनेने गडबडू लागल पण विश्वास ठेवा यानेच प्रसूती सुलभ होऊ शकते. तुमच्यातून जन्माला येणाऱ्या जीवाचा मार्ग इतका सोप्पा नसेल. तेंव्हा धीर ठेवा.

२) आई होणाऱ्या प्रत्येकीची वेगळी गोष्ट

बाळ खाली सरकण्याचा काळ आणि जाणीव ही प्रत्येक आईसाठी सारखी नसते. पहिल्यांदा आई होणाऱ्या स्त्रियांसाठी कळा सुरु होणाच्या २-४ आठवडे आही हे घडू शकते किंवा दुसर्यांदा आई होणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत कदाचित असे होणार देखील नाही. काही स्त्रियांना प्रसुतीच्या काही आठवडे आधी बाळ खाली सरकण्याची जाणीव होऊ शकते तर काही मातांना प्रसुतीवेळी हा अनुभव येऊ शकतो . ज्याप्रमाणे प्रत्येकीचा गरोदरपणा वेगळा असतो त्याप्रमाणे प्रत्येकीसाठी ही लक्षणे देखील वेगवेगळी असू शकतात.

३) पोटाचा घेर बदलेल असे नाही

अनेकदा असे मानले जाते की बाळ खाली सरकले की पोटाचा घेर बदलतो. पोट थोडेसे वरून सपाट दिसू लागते किंवा जास्त मोठे देखील दिसू शकते. तुमच्या बाबतीत असे काहीच झाले नसेल तर यात काळजी करण्याचे काहीच कारण नाही. बाळाचे गर्भात खाली सरकणे तुमच्यासाठी थोडे आरामदायी असू शकते परंतु यामुळे पोटाचा घेर बदलेल असे नाही. बाळ खाली सरकणे खूप सुंदर जाणीव असते. खाली बसल्यावर तुम्हाला असे वाटेल जणू काही बाळ तुमच्या मांडीवरच झोपले आहे. या गोष्टीचा आनंद घ्या आणि इतर चिंता सोडा.

४) भूक वाढणे

बाळ तुमच्या पेल्व्हीसच्या जागेत सरकल्यामुळे साहजिकच पोटात जास्त जागा निर्माण होईल. याचा परिणाम म्हणून तुमची भूक वाढू शकते. जसे बाळ खाली सरकते तसे तुम्हाला जास्त भूक लागेल. तुम्हाला कळा सुरु होणार आहेत याचे हे लक्षण आहे. कदाचित तुमच्या खाण्याच्या सवयी देखील बदलू शकतात. तुमच्या पोषक आहाराच्या नियमांपासून दुर केक आणि पेस्ट्री तुम्हाला खाव्याश्या वाटतील.

५) लघवी लागणे

या काळात तुम्हाला जास्त लघवी लागू शकते. बाळ खाली सरकल्यामुळे मुत्राशायावरील दाब वाढतो आणि त्यामुळे वारंवार लघवी करावीशी वाटणे साहजिक आहे. गर्भाशय मूत्राशयाच्या वरती असल्यामुळे हा दाब वाढतो. हे लक्षण म्हणजे तुमच्या प्रसूतीची वेळ जवळ आली आहे.

गर्भधारणा झाल्यावर मूड मध्ये बदल होण्यापासून ते बाळ खाली उटीपोटात सरकण्यापर्यंत अनेक गोष्टी तुमच्यासोबत घडतात. या काळात शरीरात अनेक बदल देखील होतात. तुम्ही या सर्व गोष्टींच्या साक्षीदार आहात आणि आता नव्या जीवाच्या आगमनासाठी तेवढी सहनशक्ती तुमच्यात नक्कीच आली असेल. तर मैत्रिणींनो, सज्ज व्हा!         

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon