Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

बाळ होण्यासाठीचा दबाव तुमच्या कामजीवनावर परिणाम करतोय का ?

बाळ होण्यासाठी चालू असणारे तुमचे प्रयत्न तुम्हाला हवे तसे रिझल्ट्स देत नाहीये का? तुम्हाला संभोगानंतरही २ आठवड्यांनी गरोदर नसल्याचेच चिन्ह दिसतायेत आणि महिनोंमहिने तुमचा हाच प्रयोग चालू आहे? हेच कारण तुमच्या कामजीवनातील कमी झालेल्या उत्साहाला पुरेसे आहे. तुम्ही प्रयत्न करत असूनही तुमची गर्भधारणा होत नाही याची जाणीव झाल्यावर संभोग क्रियेतील आनंद आणि उत्साह कमी होत जातो. तुम्ही यामुळे एका मानसिक अस्थिरतेला तोंड देऊ लागता ज्यामुळे तुम्ही आणि तुमच्या साथीदारामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.

तुम्हाला अनेकदा असे सल्ले देखील मिळाले असतील की , ‘’रिल---क्स, जेंव्हा व्हायचे तेंव्हा बरोबर होईल.’’ खरेतर हा बाळ होत नसलेल्या जोडप्यांना दिला जाणारा सर्वात वाईट सल्ला आहे. कारण रिलॅक्स कसे व्हायचे हे कोणीच तुम्हाला सांगत नाही. खाली दिलेल्या काही उपायांचा वापर तुम्ही यासाठी करू शकता.

१. तुमच्या दोघांच्या नात्यामधली आसक्ती आणि संवेदना वाढवा.

दोघांनी मिळून एखादा छानसा रिसोर्ट बघून रोमांटिक डेट वर जाऊन या. जर यापूर्वी केलेल्या प्रयत्नांतून तुमची गर्भधारणा झाली नसेल तर तुमच्या संभोग जीवनातून थोडे दिवस ब्रेक घ्या. दोघांमधील रोमान्स जागा ठेवण्यासाठी चुंबने, मिठी मारणे, एकमेकांची प्रेमाने विचारपूस करणे अशा गोष्टी तुमच्यातील दुरावा कमी करतील. दोघांमधला बाळ होण्यासाठी असणारा ताण मिटवा.

२. तुमच्या मनात तुमच्या शरीरासंबंधी सकारात्मक विचार ठेवा.

तुम्हाला कदाचित असे वाटत असेल की बेढब  शरीर असमाधानी कामजीवन. मुळात असे काही नसते. तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने एकमेकांना तुमच्या दोष-गुणांसकट स्वीकारलेले असते. त्यामुळे आकार आणि सौंदर्य मापने यात कधीच मध्ये येत नाहीत.सर्वात आधी तुम्ही स्वतःला स्वीकारायला आणि स्वतः वर प्रेम करायला शिका. तरच तुम्ही ९ महिने एका नवीन जीवाचे तुमच्या शरीरात पोषण करू शकाल.तुम्ही स्वतः बद्दल नकारात्मक दृष्टीकोन ठेवलात तर तुमच्या कामजीवनावर त्याचे परिणाम होतील. तुम्ही होऊ शकणाऱ्या संभोगाला नाकारून पुढे जाल आणि तुमच्या जोडीदाराची देखील निराशा होईल. स्वतः विषयी आणि आपल्या शरीराविषयी योग्य समज बाळगणे यासाठी महत्वाचे आहे. एकदा तुम्ही तुमचा समज बदललात की या नकारात्मकते मधुन तुम्ही आपोआप बाहेर याल.

३. तुमच्या बेडरूम ला विश्रांती दया!

बेडरूमच्या बाहेर पण एक अदभूत जग आहे ह्याची पुन्हा एकदा स्वतः ला जाणीव करून दया. मनात आणि शरीरात असलेली नकारात्मकता वाहून जाण्यासाठी तुम्ही दोघांनी बेडरूमच्या बाहेर एकमेकांसोबत वेळ घालवणे गरजेचे आहे. एखादी छानशी पिकनिक प्लान करा, लॉंग ड्राइव्ह वर जा, एकमेकांना नव्याने स्वीकारा जेणेकरून नवा उत्साह तुमच्यात येईल.

४. शुभ बोल नाऱ्या !

असे म्हणतात की देव आणि वास्तू सतत आपल्याला ऐकत असतात आणि ‘तथास्तु’ म्हणत असतात. तेंव्हा स्वतः विषयी किंवा तुमच्या समस्यांविषयी बोलतांना नेहमीच काळजी घ्या. एक सकारात्मक दृष्टीकोन  तुमच्या आशा पल्लवित ठेवू शकतो.

तुमच्या साथीदाराला तुमच्या समस्या सांगतांना सकारात्मक भाषा वापरा. बाळ होण्याविषयी तुमच्या प्रयत्नांना न मिळणारे यश याविषयी दोष आणि अपशब्द वापरू नका. अशा बाबतीत वैताग येणे, त्रास होणे साहजिक आहे. पण या मानसिक गोष्टी सांभाळणे गरजेचे आहे. अपशब्द वापरणे ,रागाने बोलणे यातून त्याचे नकारात्मक परिणाम तुमच्यावरच होणार आहेत. नेहमी गोष्टींमधून प्रेरणा घ्या. आनंदी आणि सकारात्मक रहा.

५. स्वतः च्या आनंदासाठी संभोग करा.

तुमच्यातल्या संभोग क्रियेला एक ओझे किंवा जबाबदारी बनवू नका. कामजीवनात उत्साह राहण्यासाठी दोघांमधले प्रेम जागे राहावे लागते. केवळ गर्भधारणा करायची आहे म्हणून संभोग करणे म्हणजे स्वतः वर एक जबाबदारी लाद्ण्यासारखे आहे. तुमच्या आनंदासाठी तुमचे कामजीवन समृद्ध करा.तुमच्यात उत्साह आणण्यासाठी कधी तुम्ही ‘रोल प्ले’ सारख्या पर्यायांचा विचार करू शकता.तुमच्या पाळीचे चक्र आणि ओव्हूलेशन चे दिवस, तुमच्या म्युकसची जाडी मोजणे बंद करा. या तणावाखाली न राहता आता तुम्ही आनंदासाठी ही क्रिया करून बघा.

 तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा !

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon