तुम्हाला, बाळ गर्भात कोणत्या स्थितीत आहे ते जाणून घ्यायचे आहे का ?
गर्भात बाळ असल्यावर प्रत्येक आईला वाटत असते की, बाळ कोणत्या बाजूकडे बसला असेल त्याची आता काय स्थिती असेल, झोपला आहे की, काय करतो. ह्या सर्व गोष्टींविषयी खूपच उत्सुकता असते. आणि ह्याबाबतीत डॉक्टरांना स्कॅनवरून समजून जाते. आईंना ह्यात कळत असेल का ? हा प्रश्न आहे. पण आईंना सुद्धा गर्भात बाळाची स्थिती समजून जाते कारण त्या बाळासोबत बोलत असतात, त्यांच्यासोबत खूप वेळ असतात आणि महत्वाचे म्हणजे त्याही बाळाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांना तो अंदाज येऊन जातो. आणि तेही अचूक सांगू शकतात की, बाळ आता काय करतोय ते.

ह्या ब्लॉगमधून जाणून घेऊ की, बाळाची स्थिती गर्भात कशी आहे ते आपण जाणून घेऊ.
तुमच्या बाळाची स्थिती जाणून घेण्यासाठी
१) जर तुम्हाला जाणवत असेल की, तुमचे पोट व नाभी बाहेर निघालेली आहे आणि बाळाची लात छातीच्या खाली जाणवत असेल तर समजून घ्यायचे की, बाळ त्याच्या पाठीवर पहुडलेला आहे.
२) तुम्हाला तुमचे पोट थोडे वजनदार लागत असेल तर त्याला हलक्या हातांनी दाबायचे आणि त्याच वेळी जर तुम्हाला बाळ फिरतोय असे जाणवले तर ह्याचा अर्थ आहे तुम्ही बाळाचा मागचा भागाला पकडले आहे. आणि जर त्याने फिरायचे थांबवले नाही तर तेव्हा कदाचित बाळाच्या डोक्याला हात लागला आहे.
३) तुम्हाला माहितीय का ? की, तुमच्या बाळाचे डोकं त्याच्या शरीराला न हलवता फिरवू शकतो.
४) जर तुम्हाला आपल्या बाळाच्या उचक्या जाणवत असतील तर कदाचित बाळाचे डोकं खालच्या भागात आहे.

५) तुमच्या पोटात खूप दुखत असेल आणि हाडांमध्ये कणकण होत असेल तर समजून घ्यायचे की, तुमच्या बाळाचे डोकं वरच्या दिशेला आहे आणि तुमच्या छातीच्या पिंजऱ्याला ते स्पर्श करतेय.
६) जर तुम्हाला जाणवत असेल की, तुमचे बाळ नाभीवर लात मारत असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की, बाळाला आता ह्या जगात यायचे आहे. आणि हा खूप चांगला संकेत आहे. आणि तो आता खूपच खुश आहे.

आणि ह्याचा तुम्हालाही आनंद आहे की, बाळ आता गर्भातून ह्या जगात अवतरणार आहे. आणि तुम्ही त्याला आता प्रत्यक्ष पाहणार आहात.