Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

तुम्ही बराच वेळ बैठी कामे करता का ? मग हे नक्की वाचा.

सतत बैठी कामे केल्यामुळे हल्ली अनेकांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या आहेत. ऑफिस मध्ये ८-१० तास बसून पाठदुखी सांधे आखडणे, पोट वाढणे अश्या अनेक समस्या तरुण वयातच मागे लागत आहेत. या समस्यां होऊ नये या करता काही व्यायाम प्रकार सांगणार आहोत ज्याचा बैठी कामे करणाऱ्यांनी नक्कीच उपयोग होईल. 

     १.सूर्यनमस्कार 

सूर्यनमस्कार हा असा व्यायाम आहे ज्यामुळे शरीराच्या सर्व अवयवाचा व्यायाम होतो. 

२. पोट वाढू नये याकरता व्यायाम 

पाठीवर झोपावे. त्यानंतर पाय गुडघ्यात वाकवून तळवे जमिनीला टेकलेले असावे. हात वर ठेवावेत. डावा पाय आणि उजवा हात वर करुन एकमेकांना लावण्याचा प्रयत्न करावा. याचप्रमाणे उजवा पाय आणि डाव्या हाताने करावे. या व्यायामामुळे पोटाच्या स्नायूंना व्यायाम होतो त्यामुळे वाढलेले पोट कमी होते.

३. कंबरेकरता व्यायाम 

पालथे होऊन हात कोपरापर्यंत टेकलेले ठेवा. पायाचे चवडे जमिनीला टेकलेले राहू द्या. कंबरेचा भाग वर-खाली करा. त्यामुळे शरीराच्या सर्व स्नायूंना व्यायाम होऊन बैठया कामाचा  त्रास होणार नाही.

४.पाठ आणि कंबरेकरता व्यायाम 

 पाठीवर झोपा, पाय गुडघ्यातून वाकवा. मात्र तळवे जमिनीला टेकलेले असू द्या. पाठ आणि तळवे टेकलेले ठेऊन कंबर जमिनीपासून वर उचला. यानंतर कंबर आणि एक पाय वर उचलूनही हा व्यायाम करु शकता. त्यामुळे कंबरेच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो.

५. खेळ

हल्ली प्रत्येक ऑफिसमध्ये  कोणता कोणता खेळ  ठेवलेले असतात. दिवसभरातुन काही मिनटे वेळ काढून हे खेळ खेळावे, तसेच पोहणे बॅटमिंटन असे खेळ आठ्वड्यातून दोनदा तरी खेळावे. यामुळे सर्वांगाचा व्यायाम होतो.

टीप- हे व्यायाम करताना लक्षात असू द्या की  तुम्हांला कोणत्याही प्रकारचा पाठीचा,कमरेचा मणक्याची समस्या नसावी. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे व्यायाम करू नये. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon