Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

बहुगुणी दुधी भोपळा

दुधी भोपळा (शास्त्रीय नाव: Lagenaria siceraria ; इंग्लिश: Bottle Gourd (बॉटल गूर्ड), Calabash (कालाबॅश) ;) ही वेलवर्गातील एक वनस्पती आहे. या वेलीला फळल्यावर दंडगोलाकार फळे लगडतात व त्यांना त्याच नावाने ओळखले जाते. ही फळे दुधट हिरव्या सालींची व आतून पांढऱ्या, तंतुमय गराची असतात.दुधी भोपळ्याच्या आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व असतात. अन्नाव्यतिरीक्तदुधी भोपळ्याचा वापर इतरत्रही होतो. चांगला वाळलेला दुधी भोपळा नव्याने पोहायला शिकणारे आणि मासेमार पाण्यावर तरंगण्यासाठी वापरतात. वाळलेल्या भोपळ्याचा वापर एकतारी बनण्यासाठीही करतात.

१दुधी भोपळा हा लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक आणि इतर अनेक समस्यांवर गुणकारी आहे.

दुधी भोपळ्याची उपयुक्तता 

१. गर्भवती स्त्रीने आहारामध्ये दुधीचे सेवन नियमित करावे. यामुळे गर्भवतीचे आरोग्य चांगले राहून गर्भाचे पोषणही व्यवस्थित होते. तसेच गर्भावस्थेमध्ये वारंवार होणारा मलावष्टांभाचा त्रासही दूर होतो. (दुधी-भोपळ्याची गुणवत्ता जाणून घेऊनच खावा)

२. उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होत असेल तर दुधीचा रस खडीसाखर घालून प्यावा. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो.

३.  स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी दुधीचे सूप प्यावे. या सूपाला संधव, जिरे, हळद, मीठ व गाईच्या तुपाची फोडणी द्यावी. यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते व शरीरास सर्व पोषक घटकही मिळतात.

४. अति उष्णता, जुलाब, आम्लपित्त, मधुमेह, अति तेलकट खाणे यामुळे जर वारंवार तहान लागत असेल, तर अशा वेळी ग्लासभर दुधीचा रस चिमूटभर मीठ घालून घ्यावा. यामुळे घामातून शरीराबाहेर जाणारे क्षार कमी होतात. तहान लागणे कमी होते व थकवा जाणवत नाही.

५. खूप ताप आला असेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याचे सूप पिणे हे एक उत्तम औषध ठरते. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते.

६. उष्णतेमुळे डोळ्यांची आग होत असेल तर अशा वेळी दुधीचा कीस कापसावर सुती फडक्यात गुंढाळून डोळ्यांवर ठेवावा

७. आजारपणातून उठलेल्या व्यक्तींना दुधी हलव्याची खीर खडीसाखर,आणि सुकामेवा घालून जेवणानंतर द्यावी .अशक्तपणा कमी होण्यास मदत होते

८. थंडीत किंवा उष्णतेने हात-पायांना भेगा पडल्या असतील तर दुधीयुक्त तेल किंवा दुधीचा लेप पायांना लावावा आराम पडतो.

९. दुधी भोपळ्या बरोबर त्याचा बिया देखील गुणकारी असते. या बिया दुधात वाटून घेतल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढून विस्मरण कमी होते. तसेच मस्तकातील उष्णता कमी होते.

१०. रोज सकाळी अर्धा कप दुधी भोपळ्याचा रस, तुळशीची ७-८ पाने, पुदिन्याची ७-८ पाने, संधव, जिरे व काळी मिरी एकत्र करून रोज सकाळी हा रस प्यावा. यामुळे रक्तवाहिन्यांवरील अडथळा दूर होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.

११. लघवीला जळजळ होत असेल तर अशा वेळी ग्लासभर दुधीरस त्यामध्ये अध्रे िलबू पिळून घ्यावे. यामुळे लघवीची जळजळ थांबते.

याची काळजी घ्या..

१. जुनाट निब्बर भोपळ्याच्या सेवनाने पोट दुखते तसेच कोवळ्या भोपळ्यामध्ये औषधी पोषक गुणधर्म जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे कोवळ्या भोपळ्याचा वापर करा.

२. महत्वाचे भोपळा घेताना खात्रीशीर ठिकाणावरून घ्या. आणि भोपळ्याची चव नेहमी पेक्षा वेगळा लागला तर त्वरित त्याचे सेवन थांबवा.

३. दुधी भोपळा शक्यतो शिजवून-उकडलेल्या स्वरूपात खा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon