Link copied!
Sign in / Sign up
24
Shares

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर हे घरगुती उपाय करा.

असे म्हणले जाते की ज्याचे पोट साफ असते अशी व्यक्ती सहसा आजारी पडत नाही. योग्य आहार घेणे तो योग्य प्रकारे पचणे आणि दररोज पोट साफ होणे. हे निरोगी आरोग्याचे गमक मानण्यात येते. परंतु आजकालची जीवनशैली, अचर-बचर खाणे,फास्टफूड खाणे,बैठे कामं, व्यायामाचा अभाव यामुळे लोकांमध्ये बद्धकोष्ठतेचा प्रमाण वाढले आहे यामुळे मल बाहेर पडायला त्रास होतो किंवा पोट साफ होत नाही या करता काही घरगुती उपाय सांगणार आहोत जे तुम्हांला या समस्यांमध्ये नक्की उपयुक्त ठरतील

१. एरंडेल तेल

या तेलामुळे आतड्यातील जंतू मरतात. जर तुम्हाला एक चमचा एरंडेल तेल पिणे शक्य नसल्यास ते ग्लासभर दुधात किंवा गरम पाण्यातून घेतल्यास किंवा अगदीच जात नसल्यास पोळी करताना त्या पोळीच्या गोळ्यात हे तेल घालून पोळी रात्री जेवताना खावी . बद्धकोष्ठतेचा त्रास हळू-हळू कमी होतो. हे तेल/ हा उपाय साधरणता सुट्टीच्या आदल्या दिवशी घ्यावे.

२. मनुका

रात्रभर पाण्यात भिजवलेले काळी मनुका सकाळी त्याच पाण्यात कुस्करून ते पाणी मनुकांसकट प्यावे फार फायदा होतो.

३. लिंबुपाणी

लिंबुपाणी पोट साफ करण्यास मदत करते. तसेच या मिश्रणात मीठ टाकल्यास त्यामुळे शौचास सुलभ होण्यास मदत होते. लिंबू पाण्यामुळे आतडी स्वच्छ होतात आणि यामुळे शरीर निरोगी राहते.

४. अंजीर

बद्धकोष्ठतेमध्ये सुक्या व ताज्या दोन्ही अंजीराच्या सेवनाने फायदा होतो. अंजिरामध्ये असणारे फायबर पोट साफ होण्यास मदत करतात. बद्धकोष्ठतेच्या समस्येमध्ये दोन अंजीर दुधातून उकळून घ्यावे आणि हे दूध रात्री झोपण्याधी प्यावे.

५. पालकाचा रस 

थोडासा साधारणतः ८० ते १०० मिली पालकाचा रस समप्रमाणात रोज पाण्यासोबत दोनदा घेतल्यास मल सुटण्यास मदत होते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon