Link copied!
Sign in / Sign up
142
Shares

बदाम खाण्याने गरोदर स्त्रीला व बाळाला होणारा फायदा


बदाममध्ये असे काही पौष्टिक घटक असतात की, ज्यामुळे आईला व गर्भातल्या बाळाला खूप फायदा होत असतो. ह्यावर महर्षी आयुर्वेद हॉस्पिटल,दिल्लीस्थित डॉ- भानू शर्मा ह्यांनी सांगितले. “गरोदरपणात बदाम खाल्ल्यामुळे खूप पोषण मिळते आणि डिलिव्हरीच्या वेळी लागणारा जोर(पुश करणे) त्यातून प्राप्त होत असतो. बदाम मध्ये टॅनिन नावाचे तत्व असते. तेव्हा ह्या ब्लॉगमधून समजून घेऊ की, बदाम आणि गरोदरपणा ह्यात काय संबंध आहे. आणि त्याचा फायदा तुम्हाला कसा होईल.

१) बदाम मध्ये फॉलिक ऍसिड खूप असते त्याची मात्रा इतर फळांपेक्षा खूप जास्त असल्याने गर्भपाताची शक्यता खूप कमी होऊन जाते. आणि गर्भपात ही समस्या काही स्त्रियांना येत असते तेव्हा अशा स्त्रियांनी बदाम खावेत.

२) बदाम मध्ये फोलेट, आणि व्हिटॅमिन बी - ६ असते. आणि ह्या घटकाचा फ़ायदा बाळाच्या डोक्याचा विकास व्हायला, तिथल्या नर्व्हजचा चांगली विकसित होतात.

३) बदाम मध्ये खूप कार्बोज असतात त्यामुळे रोज बदाम खाल्ल्यामुळे थकवा व कमजोरी कमी होऊन जाते. आणि मॉर्निंग सिकनेस येत नाही. शरीर तितके सशक्त होते. ह्यात लोह, आयरन असतात आणि गरोदर स्त्रीला अनिमिया पासून संरक्षण देत असतो.

४) बदाम मध्ये जास्त प्रोटीन असतात ह्यामुळे बाळाची हाडे मजबूत होतात आणि ज्या प्रसूतीच्या कळा डिलिव्हरीच्या अगोदर आणि डिलिव्हरीवेळी येत असतात त्यांना सहन करण्याची ताकद निर्माण होत असते. कारण कॅल्शियम असल्याने हाडे आणखी मजबूत होतात.

५) बदाम मध्ये व्हिटॅमिन ई असते. ह्यामुळे बाळाचे केस आणि त्वचा स्वस्थ आणि तजेलदार होत असतात. आणि गरोदर स्त्रीच्या सौदर्यात भर पडते.

६) बदाम मध्ये पोटेशियम असल्याने हे रक्तदाबला नियंत्रित करत असते. व ब्लड सर्कुलेशन (रक्ताचे वहन) वेगात होऊन शरीर ताजेतवाने राहत असते. आणि ह्यात अपचनला दूर करण्याचे घटक असतात. तुम्ही रात्री बदाम पाण्यात भिजवून सकाळी खाऊ शकतात.

बदाम खायला आवडत नाही

७) खूप गरोदर स्त्रियांना बदाम खायला आवडत नाही. एक तर त्यानां त्याची चव आवडत नसते. तेव्हा ह्यासाठी बदाम घालून भाज्या बनवू शकतात. किंवा लाडू, बदाम पाक बनवून त्याची चव बदलून खाऊ शकता. बाळाच्या व स्वतःच्या आरोग्यासाठी बदाम नक्कीच खा. तुम्हाला निरनिराळया बदामाच्या पाककृती माहिती असतील त्याही तुम्ही बनवू शकतात. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon