Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

याप्रकारे करा बदामाची बिस्किटे


करायाला लागणारा वेळ -३०-४० मिनिटे 

कुकीज - ८-१० नग 

साहित्य

१. एक कप कोंड्यासकट कणिक  

२. अर्धा कप दोन तुकडे केलेले बदाम

३. अर्ध्यापेक्षा थोडी कमी पिठी साखर

४. एका कप बदाम पावडर

५. स्वादापुर्ती वेलची पावडर 

६. ५० ग्राम कॉर्न फ्लॉवर 

कृती 

१. कणिक आणि बदाम पावडर आणि पिठी साखर नीट मिक्स करून घ्या. त्यात वेलची पावडर टाका 

२. नंतर मिक्स केलेल्या मिश्रणात कॉर्नफ्लॉवर घालून नीट कणिक मळतो तसे मिश्रण मळून घ्या.

३. नंतर हे पीठ कुकीज करायचा ट्रे असल्यास त्या मध्ये किंवा ओव्हन च्या  भांड्यामध्ये १० चपटे गोल करून करा आणि त्यावर बदामाचे तुकडे लावा 

४. नंतर १५०सें डिग्री तापमानावर १५ मिनिटे बेक करा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon