Link copied!
Sign in / Sign up
65
Shares

बाळाचा रंग कसा उजळवता येईल ?


कोणत्याही आईला तिचा बाळ कसाही असला तर तो सुंदरच वाटतो. पण आईंची ही सुद्धा इच्छा असते की, तो गोरा असावा. त्याचा रंग उजळून निघावा. तेव्हा tinystep तुम्हाला ह्या ब्लॉगमधून सांगेल की, बाळाचा रंग कसा उजळ करावा.

१) तेल गरम करावे त्यानंतर त्या तेलाला कोमट करून घ्यावे. तेल कोमट असावे आणि लक्षात घ्यावे की, बाळाची त्वचा ही खूपच संवेदनशील असते तेव्हा तेल अगोदर स्वतः तपासून घ्यावे. आणि खूपच तेल गारही नको व्हायला. ह्या तेलामुळे बाळाच्या त्वचेला पूर्ण पोषण मिळून ती मुलायम होते. व बाळाच्या त्वचेत उजळपणा येत असतो. नियमितपणे बाळाची मालिश करण्याने बाळाची त्वचा दिवसेंदिवस उजळत राहून तिच्यात गोरेपणाचा बदल होऊन जातो.

२) बाळाच्या शरीरावर बारीक केस असतात त्या केसांची गरज गर्भात असताना बाळाला असते पण आता त्याची गरज नाही आणि ती केस हळूहळू नैसर्गिकरित्या चालली जातात पण जर तुम्हाला ती केस काढायची असतील तर बाजारात उपलब्ध असलेले स्क्रब चा वापर करण्यापेक्षा घरीच तुम्ही ह्याप्रकारे त्यांना काढू शकता.

* बेसन, पाणी, दूध आणि बेबी ऑइल घेऊन सामान पद्धतीने ते घ्यावे. आणि आता ह्या मिश्रणाला त्वचेवर लावावे. ह्यामुळे सर्वच प्रकारची अशुद्धी निघून जाईल.

बाळाला मालिश व स्क्रब करताना अनुभवी स्त्री असेल तर चांगले, पण जर कोणी मालिश करत असेल तर खूप रगडु नये. बाळाची हाडे, त्वचा ही खूप संवेदनशील असल्यामुळे हळूहळू करावे.

३) बाळाला ऊन दाखवावे

सकाळचे खूप कोवळे ऊन बाळाला दाखवावे ह्यामुळे त्वचा ही उजळते व बाळाची हाडेही मजबूत होतात. बाळ खूप सदृढ होते. ह्याबाबत एक दक्षता बाळगायची ती म्हणजे बाळाला खूप वेळपर्यँत सूर्यप्रकाश दाखवू नये.

४) बाळाची अंघोळ करताना दूध आणि गुलाब जल घ्या. किंवा तुम्ही चंदन पावडरची पेस्ट बनवून त्याच्या त्वचेवर लावायची व त्यानंतर अंघोळ करण्यात त्यातून बाळाच्या त्वचेवरची बारीक व काळसर काही स्पॉट असतील तर ते निघून जातील. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon