Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

बाळ कधी हसायला लागते आणि त्यांना कसे हसरे ठेवायचे


तुम्ही गर्भवती असल्यापासूनच तुमच्या जवळच्या सगळ्या लोकांनाच कधी एकदा बाळाला बघायची उत्सुकता असते. एकदा बाळ आले की,आपण त्याच्या अगदी सगळ्याच गोष्टींच्या प्रेमात पडतो मग ते त्याचे टाळूवरच्या छोट्या केसांपासून ते इवल्याश्या पावलांपर्यंत सगळ्याच. आता सगळ्यांना उत्सुकता असते ती त्यांच्या सगळ्याच हालचालींची, वाढीची.

आपले बाळ स्वतःच डोके उचलत मान धरायला लागते, रांगायला लागते, त्यांच्या आजूबाजूचे जग ते फिरायला लागतात आणि सगळ्यात शेवटी ते बोलायला आणि चालायला लागतात, अगदी आपल्या सारखे, हे आपण पालक होऊन सगळे अनुभवत असतो. पण या सगळ्यात आपल्याला खूप जास्ती उत्सुकता असते ती आपले बाळ पहिल्यांदा कधी हसते याची. 

साधे हसताना देखील आपल्या चेहऱ्यावरील सहा स्नायू एकत्र कार्यरत असतात त्यामुळे सगळ्याच बाळांना लगेच हसणे जमू शकते असे नाही. पण जेव्हा बाळ हसते तेव्हा त्याच्या सारखे निर्मळ दुसरे आपल्याला काहीच वाटत नाही. पालक म्हणून आपण कायमच आपल्या बाळाला कसे हसवता येईल याकडे लक्ष देत असतो कारण एवढ्या कष्टानंतर या जगात ते आल्यानंतर त्यांना असे हसताना बघणे म्हणजे आपले यश संपादन झाल्यासारखे वाटते.

१)  बाळ कधी हसायला लागते 

तुम्ही तुमचा बाळाला खूप वेळा हसताना बघितले असेल पण याचा अर्थ असा नाही की ते खुश आहेत. ते हसत असतात कारण कदाचित ते हळूच मागून हवा सोडली असते किंवा ते त्यांच्या झोपेचा आनंद घेत असतात.ते झोपेत जसे अगदी सहज हात पाय हलवतात तसेच आहे.

बाळ दोन ते तीन महिन्याचे होईपर्यंत हसत नाही. खरं तर, बाळ सहा ते बारा आठवड्यांच्या आत कधीही हसायला लागू शकते. तुम्हाला तर ते पटकन लक्षात पण येणार नाही की, ते कधी हसायला लागले. कदाचित तुम्ही जांभई देताना काढलेले विचित्र आवाज किंवा वेडावाकडा चेहरा केला ते बघून ते हसण्याची सुरवात असू शकते.

 २) तुमच्या बाळाला कसे हसवाल  

बाळांना हसवणे आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप सोप्पे आहे. अर्थातच त्यांना एकाच वेळी बऱ्याच गोष्टी करायच्या हे माहित नसते त्यामुळे आपल्याला खूप काळजीपूर्वक आणि नाजूकपणे गोष्टी हाताळायला लागतात पण त्यामुळे बाळाला आनंदी आणि हसरे ठेवण्यासाठी खूप कष्ट देखील नाही घावे लागत. त्यांना हसवताना फक्त एवढंच आठवा की तुम्ही लहान असताना कोणत्या गोष्टींवर हसायचात कदाचित तुमचे पालक यात तुमची मदत करू शकतील. खाली काही अगदी सोप्या युक्त्या आहेत ज्यामुळे तुम्ही बाळाला हसवू शकाल.

 ३) पोटावर तोंडानी गुदगुल्या करा 

 असे कोणतेच बाळ नसेल जे पोटावर गुदगुल्या केल्यावर हसणार नाही. हे करणे खूप सोप्पे आहे. तुमचे तोंड बाळाच्या पोटावर ठेवा आणि "बुर्र्र्रर्र्र" असा आवाज काढा आणि अगदी हलकेच हलवा.

४) हळूच गुदगुल्या करा 

हा अजून एक हमखास उपाय आहे बाळाला हसवायचा. यात बाळाच्या चेहऱ्यावरून किंवा गळ्यावरून कापसासारखा किंवा पिसा सारखा अलगद स्पर्श करा (किंवा तुम्ही खरे पीस देखील वापरू शकता फक्त ते अतिशय स्वच्छ आणि निर्जंतूक असले पाहिजे). असे सारखे करू नका किमान १५ सेकंदांचा तरी मध्ये वेळ घ्या. यामुळे ते प्रत्येक स्पर्श अनुभवू शकतील आणि दर वेळी हसताना ते श्वास देखील नीट घेऊ शकतील.

 ५) चेहऱ्याचे विनोदी हावभाव करा  

असे केल्यानी सुद्धा ते हसतात, फक्त या गोष्टीची काळजी घ्या की, तुमचा चेहरा त्यांना भीतीदायक वाटणार नाही. नाहीतर याचा उलटा परिणाम होऊन ते रडायला लागतील.

६) बुआ कुकूक  

ही सगळ्यात उत्कृष्ठ आणि प्रचिलित पद्धत आहे बाळाला हसवण्याची. यात करायचे काय तर आपल्या हातानी आपला चेहरा झाकून घ्यायचा आणि नंतर एकदम त्यांना तो दाखवायचा, असे करताना 'बुआ कु कूक' असा आवाज काढायचा.यांनी बाळ नक्कीच आनंदी होते.

बाळ तीन महिन्यांचे झाले की त्यांना त्यांच्या आई-बाबांसारखे दिसणारे कोणी समोर आले की ते लगेच हसतात. यालाच सामाजिक हसू (सोशल स्माईल) असे म्हणतात. हो, म्हणजे तुमचे बाळ आता सामाजिक फुलपाखरू होण्याच्या मार्गावर आहे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon