Link copied!
Sign in / Sign up
43
Shares

खूप महत्वाचे, बाबा होण्याचे योग्य वय कोणते ? आणी नंतर का बाबा होता येत नाही ?

         हल्ली सेटल होण्याच्या कारणांमुळे किंवा करियर मध्ये व्यत्यय नको म्हणून पालक होण्यचे वय वाढत आहे. मुल होण्याची प्रक्रिया ही मुख्यतः स्त्रीच्या वयाशी निगडित असते.    परंतु तितकीच हे बाबाच्या(पुरुषाच्या) वयाशी देखील निगडित असते. पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त वर्ष प्रजनक्षम असतात. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात येते पण हे चुकीचे आहे. पुरुषाने वयाच्या कोणत्या टप्प्यावर बाबा होण्याचा याबाबत योग्य विचार करणे आवश्यक असते. त्यामुळे पुढील गोष्टी तुम्हांला बाबा होण्याचे योग्य वय कोणते हे ठरवण्यास नक्कीच मार्गदर्शक ठरतील. 

१. वय आणि शुक्राणू निर्मिती

जर पुरुषाचे वय पंचवीस असेल तर त्यांच्यात ४० वर्षाच्या किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या तर पुरूषांपेक्षा गर्भ धारणेचे शक्यता जास्त असते. पुरुषाचे जस-जसं वय वाढत जाते, तसं तसे त्याच्या शुक्राणूंची गुणवत्ता कमी होत जाते. पुरूषांनी वयाची तिशी उलटली की दरवर्षी त्यांच्यामधील testosterone ची पातळी 1% ने कमी होते. Testosterone हे हार्मोन पुरूषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती करण्यास मदत करतात.

२. शुक्राणूंचा दर्जा

वयाच्या पस्तीशीनंतर शुक्राणूंचा दर्जादेखील खालावतो. वाढत्या वयानुसार शुक्राणूंची मोबिलिटीदेखील कमी होते. पंचविशीपर्यत शुक्राणूंचा दर्जा आणि मोबिलिटी सर्वोत्तम दर्जाची असते तर 55 नंतर ही अत्यंत कमजोर होते.

३. सुदृढ अपत्य

सुदृढ अपत्य होण्यासाठी स्त्रीचे वय जसजसे वाढते तसे अंडाशयातून निर्माण होणार्‍या अंड्यांचा दर्जाही खालावतो. त्याचप्रमाणे पुरूषाचे वय जसे वाढते तसे testosterone या हार्मोनची पातळी खालावते. त्याचा परिणाम शुक्राणूंच्या दर्जावर होतो. यामुळे बाळामध्ये जन्मजात काही समस्या निर्माण होण्याची आवश्यकत असते. 

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon