Link copied!
Sign in / Sign up
32
Shares

आयुष्यातील ताण-तणाव कमी करायचा आहे ? हे करा.


      तणावबाबत जाणून घेण्याआधी तणाव म्हणजे काय हे जाणून घेऊया आपल्या आजूबाजूला अप्रिय घटना, घडणारे काही बदल यांवर शारिरीक व मानसिक प्रतिक्रिया आणि त्याचा मनावर होणार परिणाम जो त्रासदायक असतो अशी ढोबळ व्याख्या तणावाची करता येईल विचित्र जीवनशैली, सततची स्पर्धा,रोजच्या आयुष्यातील दगदग, अपयश, नकार, विरह, पैशांचे व्यवस्थापन हे ताण वाढवणारे असते. काही वेळा यापेक्षाही अधिक तणावपूर्ण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग किंवा अपमान या गोष्टीने व्यक्तीच्या आयुष्यात तणाव निर्माण होतो.

तणावाचा आरोग्यावर होणारा परिणाम

सततचा तणाव हा मानसिक एकाग्रता घालवतो, डोकेदुखी, प्रत्येक कामत काहीतरी समस्या निर्माण होणे, काम नीट करता न येणे, थकवा वाटू लागतो.अ. चिडचिडेपणा येतो. संताप वाढतो. आरोग्य बिघडते. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, ह्रदयासंबंधी तक्रारी लठ्ठपणा, एसिडीटी, अल्सर, केस गळणे आणि कधी-कधी मानसिक संतुलनही बिघडते.तणावांवर उपाय म्हणून काही लोक मद्यपान,धूम्रपान याच्या आधी होतात आणि त्यामुळे ताण कमी होण्या ऐवजी वाढतो आणि त्यामुळे आरोग्याच्या इतर समस्या सुरू होतात. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी जीवनपद्धती आणि विचार पद्धतीत बदल करण्याची गरज आहे.

खालील उपायांचा आधारे तणाव कमी करायचा प्रयन्त करा.

१. आपली एक दिनचर्या बनवा. प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ठ वेळ द्या.

२. सतत काम करणे टाळा. विश्रांतीही घ्या.

३. आधी आपल्याला काय साध्य करायचे ते ठरवा. त्यानुसार ताण न घेता ते साध्य करण्याचा प्रयत्न करा.

४. नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांना कायम दूर ठेवा.

५. मागचे अनुभव पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरू शकतात त्यामुळे मागचा अनुभव गाठीशी असू द्या.

६. आपल्या क्षमतेनुसार काम करा. आपल्या ताकदीबाहेरचे काम करू नका. त्यामुळे उगाचाच न्यूनगंड निर्माण होऊन तणाव वाढतो.

७. तणावासंदर्भात तुमचे जवळचे मित्र, कुटूंबातील व्यक्ती यांच्याशी ताणासंबधीचर्चा करा त्यामुळे ताण-तणाव कमी होऊन मोकळे वाटेल.

८. नियमित व्यायाम, योग, फिरणे, पोहणे, नृत्य यामुळे शरीर सैलावते. तणाव कमी होतो.

९. नियमित ध्यान व प्रार्थना केल्यास तणाव कमी होतो.

१०. दिवसभरात सतत काम न करतात थोडी विश्रांतीही घ्यावी. शांतपणे बसून दीर्घ श्वास घ्या व तो हळूहळू सोडा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon