Link copied!
Sign in / Sign up
20
Shares

या वनस्पती तुम्हाला निरोगी तर बनवतेच पण आजारी सुद्धा पडू देत नाही .....एकदा बघाच


आपल्या पूर्वजांचा नैसर्गिकरीत्या झाडे आणि औषधी वनस्पतींपासून रोगांवर उपचार करण्यावर विश्वास होता, यातूनच आयुर्वेदाची निर्मिती झाली. या आयुर्वेदाची पाळेमुळे खोलवर रुजण्याआधीच ‘इंग्लिश मेडिसिन’ म्हणजेच अॅलोपथी या औषधी विज्ञानाचा शोध लागला आणि आयुर्वेद मागे पडत गेले. या अॅलोपथीचे अनेक साइड इफेक्ट असतात, कारण फक्त रोगामुळे होणाऱ्या नुकसानीवर ते काम करते. आयुर्वेदात रोगाचे मूळ नष्ट करण्यात येते.

इतिहास असा असला तरीही आजकालच्या जगात आयुर्वेअची प्रचीती वाढते आहे. आयुर्वेदाचे महत्व लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. आयुर्वेदातील औषधी वनस्पतींचा वापर करण्यासाठी तुम्हाला हिमालयात जाऊन दुर्मिळ वनस्पती शोधण्याचे काम करावे लागत नाही. आता हे सोपे झाले आहे. तुमच्या घरातच काही वनस्पती लाऊन तुम्ही त्यांच्या अनेक गुणांचा वापर स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी करू शकता.

इथे अशाच काही वनस्पती आणि त्यांचे गुणधर्म दिले आहेत.

१.गिलोय.

गिलोय हे अतिशय औषधी आहे. याची पाने व खोड या दोघांचा वापर आपण करू शकतो. परिवारातील सगळ्यांसाठी हे उपयोगी ठरते.

तुम्हाला जर ताप आला असेल तर याच्या खोडाचा रस काढून तो मधासोबत दिवसातून ३ वेळा घेतल्यास ताप उतरण्यात मदत होते.याचे खोड वळवून सुद्धा त्याचा काढा बनवण्यात येतो जो सर्दी-पडसे यात उपयोगी ठरतो.

गिलोयचा वापर त्वचेच्या समस्यांसाठी देखील करता येतो. याच्या पानांची पेस्ट करून त्यात हळद मिसळा. हे मिश्रण त्वचेवर लावल्यास त्वचा तजेलदार होते. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

 रिकाम्या पोटी गिलोयचा काढा पिल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

२. तुळस.

दारात तुळस असावी हे सर्वांना माहित आहे. तुळशीचे धार्मिक महत्व तर आहेच पण याचसोबत तुळशीचे औषधी गुण जाणून घेऊया.

 तुळस खोकला आणि सर्दी यांवर रामबाण उपाय आहे. दुपारच्या जेवानंतर ५-१० तुळशीची पाने खाल्ल्यास तुमची रोगप्रतिकार शक्ती ३ पट वाढते. जर तुम्हाला कच्ची तुळशीची पाने खावीशी वाटत नसतील तर तुळशीच्या पानांचा रस काढून तो मधात मिसळून तुम्ही घेऊ शकता.

त्वचेवरील डाग, फोड यांवर तुळस आणि हळद यांचे मिश्रण लावल्यास तुम्हाला त्वरित फरक जाणवेल.

लहान मुलांच्या सवयींमुळे त्यांना पोटात अनेकदा जंत होते. यावरील उपाय देखील तुळस आपल्याला देते. तुळशीचे पाणी जंतुनाशक असते आणि यात प्रभावी ठरते.

- पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी देखील तुळस प्रभावी आहे. पाण्यात तुळशीची पाने टाकून उकळल्यास पाणी शुद्ध होते.

३. ब्राह्मी.

ब्राह्मी हे एक महत्वाचे औषध आहे, खास करुन लहान मुलांसाठी हे प्रभावी असते. पावसाचे प्रमाण जास्त असणाऱ्या प्रदेशात ब्राह्मी उगवते.

- मेंदूची स्मरणशक्ती वाढवण्यात ब्राह्मी उपयोगी ठरते हे विज्ञानाने सिद्ध झाले आहे.

- आयुर्वेदात मज्जासंस्थेतील कमजोरपणावर उपचारासाठी ब्राह्मी वापरली जाते.

- लहान मुले जी बोलायला शिकत आहेत त्यांना ब्राह्मी दिल्यास त्यांचे बोबडे बोलणे किंवा अडखळणे कमी होऊन ती स्पष्ट बोलायला लागतात.

- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून निर्जंतुक करण्यात ब्राह्मी प्रभावी असते.

- केसांच्या वाढीसाठी ब्राह्मीचे तेल वापरतात.

४. कडूलिंब.

भारतीय जेवणात कडुलिंबाचा वापर सर्रास केला जातो. आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेलच की केवळ चवीसाठी हे वापरले जात नाही तर याचे अजूनही गुणधर्म आहेत.

कडुलिंब लठ्ठपणा कमी करण्यासाठी वापरतात. उपाशीपोटी कडुलिंबाचा रस घेतल्यास तुमचे जास्तीचे वजन कमी होतांना तुम्ही पाहाल.

कडूनिंबाची पाने कुस्करून मधात घालून खाल्ल्यास शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते.

यासोबत कडूलिंबाचे अजून एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा वापर केस गळती थांबवण्यासाठी सुद्धा होतो. रोज कडूलिंबाची पाने खावीत किंवा याची पाने नारळाच्या तेलात उकळून ते तेल केसांना लावल्यास तुमची केसगळती थांबेल. कडूलिंबाचे पाणी केसांना लावून ते सुकवा आणि नंतर धुवा याने केसांना जाडी येते. केसांच्या मुळाशी संबंधित समस्या याने सुटतात.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon