Link copied!
Sign in / Sign up
46
Shares

आवळा खा आणि या विकारांपासून राहा.


आरोग्य आणि दीर्घायुष्यसाठी आवळा हे उपयुक्त फळ आहे . आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं.आवळ्याचे पांढरे आवळे व रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत. सुकलेल्या आवळ्यापेक्षा हिरवा ताजा आवळा आधिक गुणकारी असतो. आवळ्याचा छुंदा, मुरंबा, लोणचे, चटणी, अवलेह, कँडी, सरबत, सुपारी करून वर्षभर आवळा सेवन करता येतो. या आवळ्याच्या सेवनामुळे कोण-कोणत्या विकारांपासून  दूर राहण्यास मदत होते ते पाहणार आहोत. 

आवळ्याची उपयुक्तता 

आवळा रक्तदोषहारक, पित्तशामक मानण्यात येतो. आवळा हा आम्ल-मधुर रसाचा, शीत-वीर्यात्मक  असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो.  रस, रक्त, मांस, आवळ्याच्या रसाच्या सेवनाने शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच नियमितपणे आवळा सेवन करणे आवश्यक आहे. ताजा आवळा उपलब्ध नसेल तर वाळलेल्या आवळ्याची पूड म्हणजेच आवळा चूर्ण औषधामध्ये वापरावे.

या विकारांपासून सूर राहण्यास मदत 
१. पित्तप्रकोप कमी होतो. 

 आवळ्याच्या किंवा आवळा रसाच्या सेवनाने पित्त वृद्धी न होता पित्तप्रकोप कमी होतो. त्यामुळे शरीराचा दाह होत असेल तर अशा अवस्थेत आवळ्याचा रस प्यावा.

२. रक्त विकारांमध्ये उपयुक्त 

  उन्हाने किंवा रक्तदाबाने नाकाचा घोळणा फुटला असेल, मुळव्याधीतून रक्त जात असेल तसंच स्त्रियांमध्ये मासिक पाळीत अतिरक्तस्राव होत असेल तर या सर्व विकारांमध्ये आवळाचूर्ण किंवा आवळा रस घ्यावा. त्यामुळे नक्कीच आराम  पडतो. 

३. हृदयविकार टाळण्यास मदत

 नियमित आवळा सेवनाने शरीरातील रसरक्तभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते व त्यामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होऊन हदयविकार टाळता येतो.

    ४. डोकेदुखीवर गुणकारी 

 जर डोकंदुखीचा त्रास होत असेल तर आवळ्याचं चूर्ण, तूप व खडीसाखर समप्रमाणात घेऊन एकत्र करावं. सकाळच्या वेळी उपाशी पोटी हे मिश्रण सेवन केल्याने डोके दुखीचा त्रास नाहीसा होतो.

५. लहान मुलांची आणि प्रौढांची स्मरणसक्ती बाबत उपयोग

नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती व बुद्धी वाढते. म्हणून आवळ्यापासून तयार केलेला च्यवनप्राश आहारात नियमितपणे घ्यावा.

६. केसांच्या विविध तक्रारी दूर करते. 

 जसे केस गळणं, पांढरे होणं, कोंडा होणं, किंवा केसांची चमक जाणे या सर्वावर आवळा, , जास्वंद यांनी युक्त तेल केसांना लावावं. काही दिवसांमध्येच केसांची वाढ चांगली होते. केस गळणं थांबतं. केसांचा रंग टिकून राहतो व रात्री शांत झोप लागते.

७. मळमळणे किंवा तोंडाची चव जाणे. 

तोंड बेचव होऊन मळमळ किंवा उलटी होत असल्यास आवळ्याचा रस व मध यांचं चाटण करावं. तोंडास चव येते. आणि मळमळ  आणि उलटी कमी होते.  गर्भारपणात स्त्रीला उलटी व मळमळ वारंवार होत असते. अशा वेळी आवळा सुपारी, किंवा आवळा सरबत याचे सेवन केल्याने या तक्रारी दूर होतात. 

८. तारुण्य टिकण्यास मदत 

नियमितपणे आवळा सेवन केल्यास त्यात असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे हृदय, केस, मांसपेशी व शरीरातील अनेक ग्रंथींना बळ मिळतं व त्यामुळे तारुण्यावस्था जास्त दिवस टिकून ठेवता येते. म्हणूनच वार्धक्यावस्था टाळण्यासाठी .आणि बाराही महिने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी याकरता आवळ्याचे सेवन करावे. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon