Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

अशी घराच्या-घरी बनवा आवळा सुपारी


सध्या आवळा बाजारात उपलब्ध आहे तो पर्यंत त्याचे वर्षभरासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साठवणून करता येते. पाचक म्हणून आवळा सुपारी हा उत्तम असते ही आवळा सुपारी घरच्या-घरी कशी तयार करायची हे आम्ही सांगणार आहोत 

साहित्य

१. अर्धा किलो आवळा 

२. मीठ एक चमचा सेंधव किंवा पादेलोण (काळे मीठ) असेल तर उत्तम 

३. २५ ग्राम आल्याचा (अद्रकाचा) रस 

४. जिरे पूड 

कृती 

१. आवळे धुवून प्रेशर कुकरच्या भांड्यात ठेवावे, त्या भांड्यात पाणी घालू नका. पण कुकरमध्ये खाली पाणी घाला.

२. शिट्टी न लावत १५ ते २० मिनटे आवळे उकडून घ्या. (आपल्याला आवळे नुसत्या वाफेवर शिजवायचे आहेत पाणी न घालता) आवळे मऊ होई पर्यंत शिजवा पण अति देखील शिजवू नका. 

३. शिजवून झाल्यावर बाहेर काढल्यावर आवळे गार  होऊ द्या. नंतर त्यातून बी काढा आणि बारीक तुकडे किंवा किसले तरी चालतील.

४. हे आवळ्याचे तुकडे एका मोठ्या परतत किंवा मोठ्या ताटात घ्या. आल्याच्या रसात मीठ घाला आणि तो रस आल्याचा तुकड्यांना चांगल्या पद्धतीने लागेल असा लावा. ( या आवळ्यामुळे ताट  घरोबा होण्याची शक्यता असते काळजी घ्या).

५. हे ताट  ७ ते ८ दिवस उन्हात कडकडीत वाळू द्या. वाळत ठेवण्याआधी त्यावर आवडत असल्यास जिरेपूड भुरभरा. 

कच्च्या आवळ्याची आवळा सुपारी 

साहित्य व प्रमाण हे वरील आवळा सुपारी सारखेच कच्चे आवळे किसून किंवा तुकडे करून त्यात सेंधव मिश्रित आल्यचा रस घालून ताटात घालून ७-८ दिवस ऊन्हात वाळवा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon