Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

अति व्यायामाचे धोके तुम्हाला माहीत आहे का?

तुम्हाला माहिती असलेच की, गर्भवती असताना शरीरात किती वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडतात. सकाळी उठल्यानंतर येणारा थकवा, अनियमित संप्रेरके, सतत बदलणारे मूड, वाढणारे पोट, सुजाणारे पाय, सर्वात महत्वाचे वाढणारे वजन. होय हे जरी खरे असले तरी आता ही सर्व वजन उचलण्याची कामे प्रसूतीनंतर काही महिन्यांनी करायला सुरवात करा.अन्यथा प्रसूती नंतर पूर्वीसारखे सुदृढ शरीरयष्टी गमावून बसाल.याचा अर्थ तुम्ही व्यायाम करू नका असा होत नाही. आरोग्यदायी जीवनाची सुरवात नेहमी व्यायामापासूनच होते. या दिवसात जरा तुम्ही व्यायामाचा अतिरेक केला तर? सर्वसामान्यपणे रोज ४५ मिनिटे व्यायाम आवश्यक असतो. लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, ते नेहमीच घातक ठरते. आज आम्ही तुम्हाला अति व्यायाम केल्याने शरीरात काय काय बदल दिसतात याची माहिती सांगणार आहोत.

१. हृदयाचे ठोके वाढतात 

सर्वसामान्यपणे आपण निवांत बसलेले असताना ह्रदयाचे ठोके प्रत्येक मिनिटाला ६० ते १००च्या दरम्यान असतात. व्यायामाचा अतिरेक झाला तर हेच ठोके प्रत्येक मिनिटाला शंभराच्या वर जातात. यामुळे ह्रदयविकाराचा धोका संभवतो.

२. प्रतिकारशक्ती कमी होते.

अति व्यायामामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. तुमची प्रकृती जर आजारी पडण्यासारखी असेल तर तुम्ही लवकर आजारी पडताच. व्यायामुळे होणारे गंभीर आजार दीर्घ काळापर्यंत राहतात आणि तुमचे भविष्य धोक्यात येऊ शकते. अति व्यायामाने तुम्हाला उत्साही वाटण्याऐवजी थकून जायला होते. तुम्हाला जर व्यायामात रस वाट नसेल तर ते कदाचित अतिव्यायाम केल्याचे लक्षण आहे असे समजावे.धावणे,एरोबिक,पोहणे,सायकलिंग अशा प्रकारच्या व्यायाम प्रकारात तुमच्या कामगिरीत घट झाल्यानंतर दिसून येईल.याचाच अर्थ असा की, तुम्ही तुमच्या शरीराला जास्त ताण देऊन व्यायाम करत आहेत.

३. नैराश्य 

खूप जास्त व्यायाम आपल्या शरीरातील अपचय (कॅटबॉलिक) स्थिती निर्माण होते, जिथे आपले ऊतक खंडित होतात. तसेच कॉर्टिसॉल नावाच्या एक तणाव संप्रेरकाची पातळी वाढते ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. आठवड्यात साडेसात तासांपेक्षा जास्त व्यायाम केल्याने चिंता, नैराश्य आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

४. वजन कमी होणे 

दीर्घकाळ व्यायाम वजन कमी करेल मात्र चरबी वाढेल. अचानक कमी होणाऱ्या वजनाच्या संदर्भात त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि आरोग्य तपासणी करा.

५. अनियमित मासिक पाळी 

अति-व्यायाम आपल्या मासिक पाळीत व्यत्यय आणू शकतो. पाळी चुकण्याच्या या स्थितीला 'अमानोहरिआ' असे म्हणतात.ही स्थिती सहसा गर्भवती आणि रजोनिवृत्तीच्या दरम्यान आढळते. परंतु, जर आपण या कारणांशिवाय जर मासिक पाळी चुकता असेल तर त्यामागे अति व्यायाम हे एक कारण असते. हे एस्ट्रोजेन पातळी एक कमी झाल्याने अगदी 'ऑस्टियोपोरोसिस' देखील होऊ शकतो.

६. निद्रानाश 

अति व्यायामाचा सर्वात जास्त परिणाम म्हणजे निद्रानाश होतो. तुम्ही अस्वस्थ होता आणि कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही.

अति व्यायामाची पुढे काही लक्षणे सांगितली आहेत,यापैकी कोणतेही एका लक्षण तुमच्यामध्ये आढळत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

१. अति व्यायामुळे स्नायूंची शक्ती पुन्हा भरून येण्यासाठी, ऊर्जा मिळण्यासाठी रोज किमान आठ तास झोपेची आवश्यकता असते.

 

२. एक वेळापत्रक तयार करा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा. या वेळापत्रकामध्ये सलग दोन व्यायामांमधील वेळात विश्रांती घ्या. हे वेळापत्रक तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षकाच्या मदतीने करा.

३. चौरस आहार योग्य पोषक आहार तुम्हाला समृद्ध करतो. आहारात मासे,सर्व धान्ये, फळे,भाज्यांचा समावेश करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon