आत तुम्ही म्हणाल घट्ट कपडे घालू नका म्हणजे आम्हांला हवे तसे कपडे घालायचे नाही का ? तर असं बिलकुल नाहीये. गरोदरपणात किंवा इतर वेळीही स्त्रियांनी आणि पुरुषांनी सतत अति घट्ट कपडे घालणे हे हानीकारक ठरू शकतात. हल्ली आपण सगळेच फॅशनच्या नावाखाली हल्ली आपल्याला त्रास होत असताना देखील घट्ट कपडे घालतो. पण हे घट्ट कपडे जास्त वेळ घातल्यास हानीकारक ठरू शकते. यामुळे काय समस्या निर्माण होऊ शकतात हे आपण पाहणार आहोत.
१. त्वचेविषयक आजार
अति घट्ट कपडे घातल्यामुळे पोटावर,कमरेजवळ आणि स्त्रियांचा स्तनाचा खाली अश्या ठिकाणी चट्टे पडून,खाज किंवा त्वचा लालसर होऊन त्वचेविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
२. गुप्तांगविषयक समस्या
घट्ट कपड्यामुळे गुप्तांग आणि आसपासच भागात खाज येणे,सूज येणे, इन्फेक्शन होणे अश्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात. ही समस्या पुरुषपेक्षा महिलांमध्ये जास्त त्रासदायक ठरते. याबाबतीत महिलामध्ये योनीमध्ये यीस्ट इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
३. मानसिक आणि शारीरिक अस्वस्थता
दिसायला कितीही छान दिसत असतील तरी, अति घट्ट कपड्यांमुळे सतत मानसिक आणि शारीरिक अस्वस्थता जाणवत राहते. आणि त्यामुळे कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नाही.
४. स्नायू आणि हाडांविषयक तक्ररी
घट्ट कपडे घातल्यामुळे शाररिक हालचाली योग्यरीत्या होत नाही. त्यामुळे स्नायू आणि हाडे सतत आखडली जातात. आणि यामुळे स्नायू विषयक तक्रारी आणि निर्माण होतात. यांमध्ये सतत पाय दुखणे, कमरे जवळील भाग दुखणे अश्या समस्या निर्माण होतात.
५. शरीरातील शीरा (नसा )आखडणे
अति घट्ट कपडे बरच वेळ घातल्यामुळे शीरा आखडण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात स्त्र-पुरुष दोघांच्या कमरेजवळील ,स्त्रियांच्या स्तनाच्या खालील भागात पोटाच्या भागाततील शिरांवर दाब पडून योग्यरीत्या रक्तभिसरणात अडथळा होण्याची शक्यता असते. आणि यामुळे विविध शाररिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
काय करावे
१. अति घट्ट कपडे घालू नका याचा अर्थ असा नाही कि तुम्हांला आवडतात ते आणि तुम्हांला फिट बसतात ते कपडे घालू नका. तुम्ही ज्या कपड्यात तुम्हांला आरामदायक वाटत ते कपडे घाला. फॅशनच्या नावाखाली स्वतःच्या मनाविरुद्ध शरीराला त्रास त्रास देऊ नका.
२. बाहेर तुम्हांला असे कपडे घालायला आवडत असतील किंवा घालावे लागत असतील तर, शक्यतो घरी आल्यावर सैल आणि आरामदायक कपडे घाला.
३. गरज नसल्यास असे कपडे घालण्याचे टाळावे.
४. गरोदर स्त्रियांनी उगाच अति घट्ट कपडे घालू नये, घट्ट कपडे घेतले तर जसं -जसे पोटाचा आकार वाढायला लागेल तसे वरील समस्या निर्माण होतीलच परंतु पोटावर दाब येण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे अश्या काळात सैलसर कपडे घालावे. तसेच हल्ली गरोदरपणात घालण्यासाठी काही खास कपडे देखील हल्ली बाजारात मिळतात ते आरामदायक असतात. शक्य झाल्यास त्यांचा वापर करावा.
