Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

आईंनो, मुलींना जन्म देऊच नका… ८ वर्षाची चिमुरडी असे म्हणत असेल.....

कठुआ ह्या गावात एक घटना घडली, एक छोटीशी मुलगी होती, असिफा तिचे नाव, ती ८ वर्षाची असेल तिला ह्या वयात धर्म, जात, राजकारण ह्यातल्या कोणत्याच गोष्टी समजत नव्हत्या. आणि तिला ह्या सर्व गोष्टींशी देणे -घेणे नव्हते. तिचे हे वय होते खेळण्याचे, आणि ह्या जगात आली आहे तर ते समजण्याचे पण तेही ती करू शकत नाही, कारण ती खूप लहान होती. आणि अचानकपणे तिच्या सोबत नृशंस अत्याचार केला गेला. आता तिच्यासोबत झालेला अत्याचार व बलात्कार तुम्हाला सांगू शकत नाही तो खूपच भयानक आणि विकृत होता. आणि तितकेच भयानक त्यांना पाठीशी घालणारे काही व्यक्ती.

ही घटना जानेवारीत घडली ह्यामध्ये कर अधिकारी असलेला सांजीराम ह्याला स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची होती. त्याच्यातून त्याने त्या ८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार घडवून आणला. आणि ह्यानंतर त्यावर राजकारण सुरु झाले ह्यात कुणाचे कसे चुकले नाही ह्याविषयीच जास्त बातम्या यायला लागल्यात. पण ह्यातून एक गोष्ट समोर आली की, ती म्हणजे एक आईसाठी ही घटना किती वेदनादायी आणि हृदय पिळवून टाकणारी असेल. तिला किती खिळे टोचले जात असतील जेव्हा तिला त्या मुलीची आठवण येईल. ती आई स्वतःला दोष देईल की, कशाला मी ह्या मुलीला जन्माला घातले ?

त्याचबरोबर अशा घटना ह्या बऱ्याच ठिकाणी होतात पण त्याची बातमी येत नाही कारण त्यात कुणाला राजकारण करता येत नाही. म्हणून ह्या घटना समोर येत नाहीत. ही घटना घडली जानेवारीत पण ते आता माहिती पडले, व ह्यात पोलिसांनीही आरोपीला वाचवण्यासाठी २ लाख घेतले. किती घृणास्पद आहे ना ? 

निर्भया च्या घटनेत जेव्हा आरोपी मुकेश सांगतो की, हो तिच्यावर बलात्कार केला चांगलेच केले आणि त्याचा मला पश्चाताप नाही.”

अशी विकृती कुठून येते ह्यांच्या डोक्यात, ह्या ८ वर्षाच्या मुलीला अमली पदार्थ देताय त्यासोबत तिच्यावर सलग ८ दिवस अत्याचार केला जातोय त्यावेळेस ह्यांच्या मनात एकदाही आले नाही का ? की, ही सुद्धा आपलीच मुलगी आहे असे. किती कौर्य करताय ह्याचा अंदाज आहे का ह्यांना ? आता ह्यांना फाशीची मागणी होईल आणि कदाचित फासावर जातील. पण तुम्ही गुन्हा केला तुम्ही जाणारच आहात पण त्या निष्पाप चिमुरडीचे काय ?

तुम्हाला आई म्हणून विचारतोय की, तुम्ही ह्या घटनेबद्दल ऐकल्यावर तुम्ही किती भयभीत झाला असणार. पण आपल्याला ह्या विकृत लोकांना घाबरून चालणार नाही. ह्या नराधमांना तर शिक्षा मिळवण्यासाठी तर लढूच पण आपल्या मुलींकडे कोणी तोंड वाकडे करून पाहणार नाही ह्यासाठी मुलींना सक्षम करा. त्यांना गुळगुळीत आणि मुळमुळीत करू नका तर त्यांच्यात ह्या गोष्टींविरुद्ध लढण्याची हिम्मत द्या तेही आतापासून.

ह्याविषयी तुमचे जेही मत असेल ते कमेंट मध्ये टाका, कारण इतरांनाही कळेल की, आई जागृत आहे तिच्या मुलींसाठी. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon