Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

निरोगी राहण्यासाठी अश्याप्रकारे पाणी प्या..


निरोगी आरोग्यासाठी जेवणाबरोबर पाणी पिण्याची वेळ,प्रमाण आणि प्रकार योग्य असणे गरजेचे असते. दिवसभरातून कमीत-कमी ७-८ ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती, याबाबतीतही बरेच गैरसमज आहेत. जेवताना थोडं थोडं पाणी प्यायलं तर ते पचनक्रियेमध्ये उपयुक्त आणि आरोग्यदायक ठरते. तसेच जेवणानंतर लगेच पाणी पिणे हे पचनक्रियेमध्ये अडथळा आणते जे आरोग्यास हानिकारक असते. पुढील प्रकारे आणि प्रमाणात पाणी पिण्याने आरोग्यविषयक फायदे होतात.

१. सकाळी झोपेतून उठल्यावर किमान एक ग्लास कोमट पाणी प्यावे. त्यामुळे शरीर चांगल्या पद्धतीने आतून स्वच्छ, डिटॉक्स होते. आणि फॅटस कमी होण्यास मदत होते. हे पाणी तुम्ही सुर्योदयापूर्वी प्यायलास उत्तम

२. बऱ्याचदा आंघोळ झाल्यावर थकल्यासारखे वाटते. विशेषतः महिलांना असे होते. त्यामुळे अंघोळीनंतर दररोज १ ग्लास पाणी प्यावे. यामुळे रक्तदाबाची समस्या निर्माण होत नाही.

३. जेवताना थोडे-थोडे पाणी प्यावे. जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. कमीत-कमी ३०,४० मिनिटाने प्यावे.

४. एकाचवेळी खूप पाणी पिऊ नये. दर थोडा वेळाने थोडे-थोडे पाणी प्यावे.

५. घाई-घाईत, उभ्या-उभ्या पाणी पिऊ नये, त्याने नळ फुगतात आणि पोट दुखते.

६. झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने हृदयरोगापासून सुटका मिळू शकते. त्यामुळे दररोज झोपण्यापूर्वी अर्धा-तास आधी एक ग्लास पाणी प्यावे. (जास्त पिऊ नये)

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon