Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

अश्याप्रकारे घ्या नखांची काळजी

             सौंदर्यात भर घालणाऱ्या नखांची काळजी कशी घ्यावी हे आपण पाहणार आहोत

नखांचे आरोग्य 

१. नखं लांबच लांब वाढवण्यापेक्षा त्यांना शेप द्या. नखं कापण्यापेक्षा फायलरने शेप करणं अधिक योग्य. आंघोळ केल्यानंतर मॅनिक्युअर करणं उत्तम. अशा वेळी नखांमधला मळ निघालेला असतो आणि नखंही नरम झालेली असतात.

२. नखांच्या टोकांचं रक्षण करण्यासाठी नेहमी टॉप कोट लावा. नखं वाढवायची असल्यात त्यात मळ साचणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच ‘नेल हार्डनर’ लोशनचा वापर करावा. त्यामुळे नखे लवकर तुटत नाहीत.

३. नखाच्या मागचे चामडे(क्युटिकल्स) कुठल्याही टोकदार वस्तूनेमागे ढकलू नये. तसेचनखे वाढवली असतील तर नियमितपणे ती स्वच्छ करणे आवश्यक आहे. क्युटिक्लस काढण्यासाठी मेटल इन्स्ट्रूमेण्टचा वापर करू नका. क्युटिकल्सना मॉइश्चरायझर मिळावं यासाठी झोपण्यापूवीर् मॉइश्चरायझर लावा.

क्युटिकल्समुळे बॅक्टेरियापासून नखाच्या मुळांचं रक्षण होतं. म्हणून क्युटिकल्स कापण्यापेक्षा रोझवूड स्टिक/रबर टिप असणाऱ्या क्युटिकल पूशरने क्युटिकल्स नीट मागे करून घ्या. क्युटिकल रिमूव्हरचा वापर करणं अधिक योग्य.

४. नेलपेण्ट काढण्यासाठी रिमूव्हरचा वापर आठवड्यातून एकदाच करणं अधिक फायदेशीर. अधिक प्रमाणात रिमूव्हरचा वापर केल्यास नखं कोरडी होऊ शकतात.

५. नखं मजबूत होण्यासाठी संतुलित आहार घ्या. यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन असेल याची काळजी घ्या. फळांचं प्रमाणही योग्य

६. नखं खूप लांब वाढवू नका. लांब नखांमध्ये मळ साठू शकतो. यामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे.

नखांचे सौंदर्य

१. नखांचे सौंदर्य टिकवण्यासाठी साधारण गरम पाण्यात हात पाच-सहा वेळा साबणाने स्वच्छ धुवा आणि फार टोकदार नसणाऱ्या फायलरने नीट शेप द्या.

२. लिंबाची साल नखांवर घासावी. यामुळे नखे तुटण्याचे प्रमाण कमी होईल. तळहात, बोटे, नखे यांना दुधावरच्या सायीने मसाज करावा. यामुळे चकाकी प्राप्त होईल.

३. तळहात, बोटे यांना महिन्यातून एकदा दही व बेसन यांचा लेप लावावा. 

४. रोज गाजराचा रस पिणं नखांना कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळवून देईल. यामुळे नखं मजबूत होण्यास मदत होते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon