Link copied!
Sign in / Sign up
84
Shares

अश्याप्रकारे बीटच्या रसाने केस असे रंगवा....

बाजारात केसांसाठी विविध प्रकारचे रंग तुम्हांला मिळतील पण हे रंग केसांसाठी आणि त्वचेसाठी कसे असतील हे सांगता येणार नाही. यामधील केमिकल्स हे तुमच्या त्वचेला आणि केसांना इजा पोहचवू शकतात. पण हल्ली फार कमी वयात केस पांढरे होत आहेत किंवा काहींना केस विविध रंगाने रंगवण्याची इच्छा असते. अश्यावेळी मेहंदीशिवाय दुसरा पर्याय मिळत नाही पण आज आम्ही तुम्हांला असा एक पर्याय देणारा आहोत ज्यामुळे तुम्ही नैसर्गिकरित्या केस रंगवू शकाल आणि त्याचा काही दुष्परिणाम देखील होणार नाही. उलट झालाच तर फायदा होईल. बीटच्या रसाने केस कसे रंगवा आणि केसांना लालसर (बर्गंडी )रंग मिळवता येईल.

तुम्ही बीट खाताना त्याचा लाल रंग हाताला लागलेला पहिलाच असेल. आणि हेच होत ज्यावेळी तुम्ही बीटच्या रसाचा उपयोग केसांसाठी करता, फक्त तुमच्या केसांच्या मूळ रंगांनुसार त्याचा गडद आणि फिकटपणा अवलंबुन असतो. ज्यांच्या केसांचा मुळात रंग काळा आहे त्यांच्या पेक्षा ब्राऊन आणि डार्क ब्राऊन (तपकिरी आणि गडद तपकिरी) रंग असणाऱ्या व्यक्तींच्या केसावर हा रंग जास्त गडद दिसतो.

हा रंग कसा तयार करावा 

Making beetroot juice to colour hair

१. सगळ्यात आधी बीट स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर त्याचे काप करून नंतर मिक्सर मधून जाडसर रस काढून घ्या.

२. त्यानंतर गाळणीने रस गाळून घ्या आणि या रसामध्ये २-३ चमचे मध मिसळला. जोपर्यंत मध आणि तो रस चांगला मिक्स होत नाही तो पर्यंत चमच्याने रस ढवळत राहा.

Washing your hair after applying beetroot juice to give red or purple colour to the hair

३. त्यानंतर सौम्य शॅम्पूने आपले केस धुवून घ्या. केस धुतल्यावर कंडिशनर मात्र लावू नका.

४. टॉवेलने केस स्वच्छ पुसून घ्या घ्या आणि नंतर गुंता असले तर काढून घ्या.

५. त्यानंतर हे बिट आणि मधाचे हे मिश्रण हळू-हळू केसांना लावा.(हाताला रंग लागून नये म्हणून रबरी हात मोजे घाला) जर तुम्हांला हायलाईट हवे असतील तर सगळ्या केसांना हे मिश्रण न लावता मधल्या मध्याला केसांना हे मिश्रण लावा.

६. त्यानंतर केसांना प्लॅस्टिकची पिशवी किंवा शॉवर कॅप लावा. आणि कमीत-कमी हे मिश्रणं केसांवर ४ तास तसेच राहू द्यावे. किंवा रात्रभर तसेच राहू द्यावे.

Bright red or purple hair after using beetroot juice

७. त्यानंतर नेहमीप्रमणे केस शॅम्पू ने धुवून कंडिशनर लावावे.. केस धुवून कोरडे केल्यावर तुम्हांला तुमच्या केसांना लाल आणि आणि जांभळटसर रंगाची छटा केसांना आलेली दिसेल. आणि केसांची चमक देखील वाढलेली दिसेल. हा रंग तुम्हांला काही आठवडे केसांवर राहील तुम्ही किती वेळा केस धुता यावर हे अवलंबून आहे..

काही टिप्स - 

जर तुम्हांला हलका रंग हवा असल्यास तुम्ही बीटचा ज्यूस शँम्पूमध्ये मिसळून त्याने केस धुतल्यास तुम्हांला हलका लालसर रंग मिळेल.

केस रंगवण्या व्यतिरिक्त बीटाचा रस हा केसाच्या पोषणासाठी देखील चांगला असतो.  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon