Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

अश्याप्रकारे एअर कंडिशन शिवाय घर गार केलं आहे का ?

उकडून उकडून पार बटाटा व्हायची वेळ आली हे वाक्य उन्हाळ्यात बहुतेक प्रत्येक जण एकदा तरी बोलतोच. पृथ्वीचेच तापमान बदलले आहे त्यामुळे उकाड्यातही वाढ होते आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी उकाडा जास्त जाणवतो. त्यामुळे हल्ली घरात एसी लावला जातो. अर्थात प्रत्येकाला घरात एसी लावणे शक्य नसते, शिवाय काहींना विशेषतः लहान मुलांना एसी मुळे त्रास होतो. मग एसी लावला नाही तर पंख्याच्या हवेचाही त्रास होऊ शकतो. मग उकाड्याने हैराण झाल्यावर नेमके काय करावे हे कळेनासे होते. कारण उकाड्याने झोप पूर्ण झाली नाही तर सकाळी काम करण्यास निरुत्साह वाटतो. अर्थात एसीशिवाय घर थंड ठेवता येईल आणि वीजेचा खर्च वाचवू शकतो.एसीशिवाय घर ठेवा थंड-

पडदे-

घरात जास्त उष्णता येते ती खिडक्यांमधून. अर्थात खिडक्या बंद ठेवणे हा त्यावरचा उपाय नसला तरीही खिडक्यांना जाळ्या लावणे, तसे पडदे लावून घेणे हा श्रेयस्कर उपाय आहे कारण त्यामुळे खिडक्यांमधून वाऱ्याची झुळूक येते पण खोलीतील उष्णता वाढण्यास अटकाव होतो आणि खोलीचे ग्रीन हाऊस होत नाही.

उन्हाळ्यात फिक्या रंगाचे पडदे लावले तर घरात उष्णता वाढणार नाही थंडावा राहातो.

वापर नसलेल्या खोल्या-

वापर नसलेल्या खोल्या बंद करुन ठेवल्या तर घरातील गार हवा त्या खोल्यांमध्ये जाणार नाही. रात्रीच्या वेळी ही गार हवा घरात खेळती राहू शकते.

पंख्याचा वापर-

अगदी घरगुती देशी उपाय असे याचे वर्णन आपण करु शकतो. एका बाऊल मध्ये बर्फ घेऊन तो बाऊल पंख्याचा वापर करावा. त्यामुळे पंख्याच्या हवेचा झोत त्यावर पडून गार हवा खोलीत पसरेल आणि घर एसीशिवाय मस्त गारेगार होईल.

बेडशीट-

घरात वापरत्या बेडशीट किंवा चादरी तर आपण बदलत असतोच. पण उन्हाळ्यात गाद्यांवर सुती चादरींचा वापर करावा. बकव्हिट ची उशी वापरू शकता कारण त्यात वायुवीजन होण्यासाठी नैसर्गिकरित्याच वायुवीजन होते. नेहमीच्या कॉयर आणि कापसाच्या उशांमध्ये उष्णता धरून राहते त्यामुळे बर्काव्हिटची उशी वापरावी.

घराचे तापमान-

काही घरांच्या भौगोलिक स्थानांमुळे घराच्या तापमानात वाढ होते. तिथे घामही खूप येतो मात्र तो घाम उडून जात नाही त्यामुळे तो कपड्यातच शोषला जातो.त्यामुळे घरात लहानसा ह्युमिडीफायर वापरू शकतो. ह्युमिडिफायरमुळे हवेतील जास्त आर्द्रता काढून टाकतो. त्यामुळे खोेली थंड होण्यास वाव मिळतो. उकाड्यामध्ये थोडासा दिलासा मिळू शकतो.

टेबल फॅन-

घरात एसी नसला तरीही खोली गार करण्यासाठी टेबल फॅनचा उत्तम वापर करता येऊ शकतो. टेबल फॅन जर खिडकीत लावला तर बाहेरील थंड हवा खोलीत येते आणि खोलीतील उष्ण हवा बाहेर पडते. जसे स्वयंपाकघरात एक्झॉस्ट फॅनचे काम होते तसाच हा प्रयोग करता येईल.

खिडक्यांना रिफ्लेक्टीव्ह फिल्म-

घराच्या खिडक्यांना पडदे तर आपण लावतोच. पण खिडक्यांच्या काचांमधून येणारे ऊन आपण रोखू शकतो. या उन्हातून अतीनील किरणे घरात येतात आणि त्याचा परिणाम फरशी, फर्निचरवरही होतो. त्यामुळे खिडक्यांना रिफ्लेक्टीव्ह फिल्म लावू शकतो. अर्थात त्यामुळे घरात येणारा उजेड कमी होईल.

विरुद्ध दिशेचा फॅन-

उन्हाळ्यात पंखा घड्याळ्याच्या विरुद्ध बाजूने फिरवण्याचा बदल करा येतो. त्यामुळे गार हवा खोलीत निर्माण होते.

स्वच्छतागृहात एक्झॉस्ट-

किचन तसेच स्वच्छतागृहातही एक्झॉस्ट लावावा. त्यामुळे गरम हवा घरात न राहता ती बाहेर फेकली जाते. अंघोळ करताना एक्झॉस्ट असेल तर घाम न येता छान अंघोळ करता येते.

जमिनीवर झोपा-

उन्हाळ्यात छत खूप तापते त्यामुळे रात्री बेडवर झोपतो तेव्हा खूप जास्त गरम होते. शक्यतो खाली जमीनीवर अंथरुण घालून झोपावे. त्यामुळे थंड वाटते.

रात्री खिडक्या उघड्या-

रात्री झोपताना खिडक्या उघड्या ठेवाव्या त्यामुळे घरातील उष्ण हवा बाहेर पडतेच पण रात्री तापमान थोडे कमी झाले की बाहेरची थंड हवा आत आल्याने शांंत झोप लागते. अर्थात सकाळी उन्हं यायच्या आता खिडक्या बंद करा त्यामुळे घरात उष्मा वाढणार नाही.

घरातील दिवे-

घरातील जुन्या पद्धतीचे दिवे, ट्यूबलाईट बदलण्याची हीच वेळ आहे. कारण जुन्या पद्धतीचे बल्ब, ट्यूबलाईट हे प्रकाशाबरोबर खोलीतील तापमानवाढीस हातभार लावतातच पण विजेच्या बिलातही वाढच करतात. त्यामुळे एलईडी बल्ब लावा आणि घरातील उष्मा आणि वीजेचे बिल दोन्हीत कपात करा.

झाडे-

घर मोठे आणि बैठे असेल तर घराच्या आजूबाजूला झाडे लावल्यास नैसर्गिक थंडावा घराला मिळेल यात काहीच शंका नाही. झाडांकडे पाहिल्यानंतरच व्यक्तीला थंडावा, आराम मिळतो. शिवाय सावलीमुळे एकूणच घरही थंड राहते. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावा.

घराचे तापमान कमी करताना स्वतःकडेही लक्ष द्यावे. त्यासाठी काही गोष्टी पाळाव्या.

सुती कपडे-

काही वर्षांपुर्वी जेव्हा एसी अस्तित्वात नव्हता तेव्हा उकाड्याशी दोन हात करण्यासाठी आपले आजी आजोबा काय करत असतील असाही विचार करुन पाहूया. घराचा विचार करताना आपण स्वतःमध्ये काही बदल केले तर उकाड्याचा मुकाबला नक्कीच करता येईल. कपडे वापरताना सुती कपड्यांचा वापर करावा.

थंड पेये-

घरात थंडावा आणण्याबरोबर शरीराला आतून थंडावा मिळाल्यास उकाड्याचा जास्त त्रास होणार नाही. त्यासाठी विविध सरबते, माठातील पाणी प्यावे. तसेच तुळशीचे बी, सब्जा बी यांचे पाणी प्यावे. लहान मुलांना धण्या जिऱ्याचे पाणीही द्यावे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon