Link copied!
Sign in / Sign up
76
Shares

अशी पळवा झुरळे, माश्या, ढेकूण आणि पाली

घर जुने असो किंवा नवे वेळच्या-वेळी स्वच्छता आणि साफ-सफाई केली नाही तर काही पाहुणे आपल्या घरी मुक्कामी येतात आणि मग हे पाहुणे आपल्याला चांगलेच सळो-की पळो करून सोडतात. या पाहुण्यांना घालवण्यासाठी काय उपाय करता येतील ते आपण पाहणार आहोत या

१. घरमाशा 

कितीही काळजी घेतली तरी घरमाशा घरात येतातच. त्यावर उपाय म्हणून धार्मिक कार्यामध्ये वापरला जाणारा  कापूर जाळल्यास माश्या कमी होतात. तसेच घरात चारही कोपऱ्यात  कापराच्या वड्या ठेवा .  तसेच कापसाच्या बोळ्याला एका उग्रवास असलेल्या तेलामध्ये बुडवून दरवाज्याजवळ ठेवा. तेलाच्या वासाने घरमाशा दूर पळतात. 

. झुरळे 

काळी मिरे, कांदे आणि लसूनची पेस्ट करून त्यात पाणी टाका आणि एक सोल्युशन तयार करा. ते झुरळ असलेल्या जागांवर स्प्रे करा. याचा वासाने झुरळ घर सोडून पळून जातील.

३. ढेकूणला 

 ढेकूण सापडला की त्याला न मारता पाण्यात टाक. ढेकूण मारल्यास ढेकणांचे प्रमाण वाढते कांद्याचा रस ढेकणाला मारण्यासाठी नैसर्गिक औषधी आहे. याच्या वासाने त्यांचे श्वास बंद होतो आणि ते त्वरित मरतात. हा उपाय करून ढेकूण नाही कमी झाले तर पेस्ट कंट्रोल करणे आवश्यक ठरते. 

४. पाल 

पाल म्हणलं कि सगळ्यांनाच घाबरायला होतं या पालीला घराबाहेर काढण्यासाठी डांबर गोळ्या  वॉर्डरोब अथवा वॉशबेसिनमध्ये टाका पाल येणार नाही. तसेच घरात मोरपंख ठेवा पालींना मोरपंख पाहून साप असल्याचा भास होतो, असे म्हणतात. सापच्या भीतीने त्या तेथून पळ काढतात. तसेच कांदा कापा आणि त्याला स्लाईसमध्ये लाईटजवळ टांगून द्या. कांद्यात असणाऱ्या सल्फरमुळे त्यातून खूप दुर्गंधी येते आणि पाल पळून जाते. एक स्प्रे बाटली घ्या  त्यात थोडे पाणी आणि कांद्याचा  रस आणि  लसुणचा रस मिसळा. जिथे जिथे पाल येते तिथे तो रस स्प्रे करा. पालीला हा वास त्रासदायक ठरतो आणि पाल पळून जाते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon