Link copied!
Sign in / Sign up
18
Shares

अशी करा बिटाची वडी

बीट असे एक कंद आहे ज्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते.बीट रोजच्या आहारात वापरल्यास शरीरातील लाल पेशी वाढण्यास मदत होते. बीटमधे नैसर्गिक साखरेचे प्रमाण भरपूर असते. तरीही कॅलरीज मात्र कमी असतात. बीटाला स्वताची अशी खास चव नसते.काहीसे गोडसर लागते. या बीटचे  सॅलडमधे कच्चे, उकडून भरीत तसेच किसून कोशिंबीर, सूप , पराठे, हलवा अश्या अनेक प्रकारे आहारात घेण्यात येते. या बीटाची वडी कश्या प्रकारे करायची हे आपण पाहणार आहोत. 

साहित्य (साधारणतः १० वड्या )

१. १ कप उकडून किसलेला बीट

२. सव्वा कप साखर

३. १/२ कप खवलेला ताजा नारळ

४. पाव चमचा वेलची पुड

५. २ ते ३ चमचे तूप 

कृती 

१. बीट प्रेशर कुकरमध्ये पाणी न घालता फक्त १ ते २ शिट्ट्या करून उकडून घ्यावे. 

२.  स्टीलच्या ताटाला मागच्या बाजूला तूप लावून ठेवावे. तसेच वड्या थापायला जाड प्लास्टिकचा कागद तूप लावून तयार ठेवावा.

३.  कढईत तूप गरम करावे. त्यात साखर, नारळ आणि किसलेले बीट एकत्र करून माध्यम आचेवर गॅस ठेवावा.

४.  हे मिश्रण सारखे ढवळत राहून आटवावे. मिश्रण आधी एकदम पातळ होईल मग हळूहळू घट्टसर होईल. याला साधारण सात ते आठ मिनटे लागतात.  त्यानंतर  मिश्रण घट्ट होत आहे असं  वाटल्यावर ताटलीवर ओतावे

५.  मिश्रण तयार होत आले की  वेलची पूड घालावी. तसेच मिश्रण ताटावर घालून थापावे. सुरीला तूप लावून सुरीने चौकोनी आकारात खुणा करून घ्याव्यात. मिश्रण सुकले की वड्या मोकळ्या कराव्यात.

बंगळुरूच्या मॉमसाठी, खुशखबर 

टाईनी स्टेप नैसर्गिक घटक असणारे फ्लोर क्लीनर लॉन्च करत आहे जे आपल्यासाठी, आपल्या बाळाला आणि आपल्या घरासाठी सुरक्षित आहे. तर मग आता जंतू आणि रसायनयुक्त फ्लोर क्लीनर नाही म्हणा! प्रीलाँच ऑफरचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon